Tuesday, August 18, 2026
Google search engine
HomeUncategorizedशनिवारवाड्यावर पर्यटकांच्या दृष्टीने व्यवस्थांमध्ये सुधारणा व्हावी माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर :...

शनिवारवाड्यावर पर्यटकांच्या दृष्टीने व्यवस्थांमध्ये सुधारणा व्हावी माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर : थोरले बाजीराव पेशवे प्रतिष्ठानतर्फे श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांच्या ३२६व्या जयंतीनिमित्त अश्वारूढ पुतळ्यास पुष्पहार

पुणे : बाजीराव पेशवे हे अजिंक्य सेनापती होते. त्यांनी लढलेल्या एकाही लढाईत पराभव पत्करला नाही. त्यांच्या पराक्रमाचा आणि जाज्वल्य इतिहासाचा वारसा पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचविण्याची गरज आहे. शनिवारवाड्यावर पूर्वी सुरू असलेला लाईट अँड साउंड शो पुन्हा सुरू करण्यात यावा. तसेच शनिवारवाड्याच्या परिसरातील काही व्यवस्थांमध्ये सुधारणा करण्याची आवश्यकता आहे. बाहेरून मोठ्या संख्येने पर्यटक शनिवारवाडा पाहण्यासाठी येतात. त्यामुळे पर्यटकांसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याची गरज आहे, असे मत माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी व्यक्त केले.

थोरले बाजीराव पेशवे प्रतिष्ठानतर्फे श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांच्या ३२६व्या जयंतीनिमित्त शनिवारवाड्यावरील पेशव्यांच्या अश्वारूढ पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, आमदार हेमंत रासने, उपमहापौर परशुराम वाडेकर, नगरसेविका स्वप्नाली पंडित, कुणाल टिळक, मिलिंद एकबोटे, पेशव्यांचे वंशज पुष्करसिंह पेशवा, ज्येष्ठ इतिहास संशोधक पांडुरंग बलकवडे, प्रतिष्ठानचे सचिव कुंदनकुमार साठे, श्रीकांत नगरकर, मकरंद माणकीकर, विश्वनाथ भालेराव, सचिन टापरे मोरेश्वर गांगल आदी उपस्थित होते.

हेमंत रासने म्हणाले, श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांचा जाज्वल्य इतिहास सगळ्यांपर्यंत पोहोचला पाहिजे. शनिवारवाडा त्याच्या मूळ सातमजली स्वरूपात पूर्ववत करण्याची आपली सातत्यपूर्ण मागणी आहे. सातमजली वाडा पूर्ववत करणे हीच खरी स्मृतिजतनाची कृती ठरेल.

कुंदनकुमार साठे म्हणाले, पालखेड येथे बाजीराव पेशवे यांच्या युद्धस्मारकाचे काम प्रगतीपथावर आहे. बाजीराव पेशवे यांच्या पुढील जयंतीपर्यंत विधानभवनात त्यांचे तैलचित्र लावले गेले पाहिजे. त्यासाठी सगळ्यांनी मिळून प्रयत्न करायला हवेत.

परशुराम वाडेकर, मिलिंद एकबोटे, कुणाल टिळक, पांडुरंग बलकवडे यांनी मनोगत व्यक्त केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments