• 5 रु. दर्शनी मूल्याच्या प्रती इक्विटी शेअरसाठी 50 रु. ते 53 रु. असा किंमतपट्टा निश्चित
• प्रमुख गुंतवणूकदाराच्या बोली/ऑफर साठीचा दिनांक शुक्रवार, 21 ऑगस्ट 2026
• बोली/ऑफर सोमवार, 24 ऑगस्ट 2026 रोजी खुली होईल आणि गुरूवार, 27 ऑगस्ट 2026 रोजी बंद होईल
• बोली किमान 283 इक्विटी शेअर्ससाठी आणि त्यानंतर 283 इक्विटी शेअर्सच्या पटीत लावता येईल
• आरएचपी लिंक: https://www.newberry.in/wp-content/uploads/2026/08/Hy-Tech-Engineers-Limited-RHP.pdf
19 ऑगस्ट 2026: हाय टेक इंजिनियर्स लिमिटेडने सोमवार, 24 ऑगस्ट 2026 पासून प्राथमिक समभाग विक्री (आयपीओ) खुली करत असल्याचे जाहीर केले. प्रमुख गुंतवणूकदाराच्या बोली/ऑफर साठीचा दिनांक शुक्रवार, 21 ऑगस्ट 2026 आहे.
प्रती इक्विटी शेअरसाठी 50 रु. ते 53 रु. असा किंमतपट्टा निश्चित करण्यात आला आहे. बोली किमान 283 इक्विटी शेअर्ससाठी आणि त्यानंतर 283 इक्विटी शेअर्सच्या पटीत लावता येईल.
या ऑफरमध्ये 600 दशलक्ष रु. (60 कोटी रु.) पर्यंतच्या एकूण मूल्याच्या इक्विटी शेअर्सचे फ्रेश इश्यू (“फ्रेश इश्यू”) तसेच विद्यमान समभागधारकांकडून 1,42,89,450 पर्यंतच्या इक्विटी शेअर्सची ऑफर फॉर सेल (Offer for Sale) समाविष्ट आहे. यामध्ये श्री. हेमंत तुकाराम मोंडकर यांच्यातर्फे 89,80,961 पर्यंतचे इक्विटी शेअर्स आणि सौ.सुरेखा हेमंत मोंडकर यांच्यातर्फे 53,08,489 पर्यंतचे इक्विटी शेअर्स आहेत.
हाय-टेक इंजिनिअर्स लिमिटेड ही विविध औद्योगिक उपयोजनांसाठी आवश्यक असलेल्या हायड्रॉलिक फिटिंग्जच्या डिझाइन, उत्पादन आणि पुरवठ्याच्या व्यवसायात कार्यरत आहे. कंपनी देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय बाजारपेठांमध्ये बिझनेस-टू-बिझनेस (B2B) मॉडेलअंतर्गत कार्यरत असून, मूळ उपकरण उत्पादक (OEMs) तसेच इतर औद्योगिक ग्राहकांच्या गरजा पूर्ण करते. चार दशकांहून अधिक काळाचा कार्यात्मक अनुभव असलेली हाय-टेक सध्या भारतात 6 उत्पादन सुविधा केंद्र चालवते. ही सुविधा केंद्रे ठाणे, शिरवळ (सातारा), कवठे (सातारा), नाशिक आणि मध्य प्रदेशातील पीथमपूर येथे 2 युनिट्समध्ये आहेत.
कंपनीच्या उत्पादन पोर्टफोलिओमध्ये मानक हायड्रॉलिक फिटिंग्ज, जसे की DIN-मेट्रिक फिटिंग्ज, JIC फ्लेअर्ड आणि फ्लेअरलेस फिटिंग्ज, O-Ring Face Seal (ORFS) फिटिंग्ज आणि कन्व्हर्जन फिटिंग्ज, तसेच ग्राहकांच्या विनिर्देशांनुसार सानुकूलित केलेल्या फिटिंग्जचा समावेश आहे. 31 मार्च 2026 रोजी हाय-टेकच्या पोर्टफोलिओमध्ये हायड्रॉलिक फिटिंग्जच्या 11,000 हून अधिक स्टॉक कीपिंग युनिट्स (SKUs) चा समावेश होता. हाय-टेकचे आंतरराष्ट्रीय पातळीवर स्थान असून तिचा विस्तार यूएसए, बेल्जियम, पोलंड, रशिया, ब्राझील, इटली, सौदी अरेबिया, हंगेरी, यूएई, थायलंड आणि जर्मनी यांसारख्या बाजारपेठांमध्ये झाला आहे.
31 मार्च 2026 रोजी संपलेल्या कालावधीसाठी कंपनीने 189.40 कोटी रु. चा कामकाजातून मिळणारा महसूल नोंदवला. यातून आर्थिक वर्षादरम्यान व्यवसायातील सातत्यपूर्ण गती दिसून येते. कंपनीने 41.68 कोटी रु. चा EBITDA आणि 22.59 कोटी रु. चा करपश्चात नफा (PAT) नोंदवला. यामधून कंपनीची आर्थिक कामगिरी, कार्यक्षमतेवर असलेला भर आणि शाश्वत वाढीवरचा केंद्रित दृष्टिकोन अधोरेखित होतो.
ऑफर:
ही ऑफर SCRR, च्या नियम 19(2)(b) आणि SEBI ICDR नियम 31 च्या अनुषंगाने केली जात आहे. ही ऑफर बुक बिल्डिंग प्रक्रियेच्या माध्यमातून केली जात असून, SEBI ICDR सुधारित नियम 6(1) च्या नियमनात आहे. त्या अंतर्गत SEBI ICDR नियमांनुसार, ऑफरच्या किमान 50% भाग पात्र संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी (“QIBs” आणि तो हिस्सा “QIB Portion”) प्रमाणबद्ध वाटपासाठी उपलब्ध असेल. तथापि आपली कंपनी, BRLMs सोबत सल्लामसलत करून, SEBI ICDR नियमांनुसार विवेकाधीन आधारावर QIB Portion पैकी 60% पर्यंत हिस्सा प्रमुख गुंतवणूकदारांसाठी (“Anchor Investor Portion”) वाटप करू शकते. यापैकी 40% हिस्सा पुढीलप्रमाणे राखीव ठेवला जाईल: (i) 33.33% देशांतर्गत म्युच्युअल फंड्ससाठी आणि (ii) 6.67% जीवन विमा कंपन्या आणि पेन्शन फंड्ससाठी, परंतु अट अशी की SEBI ICDR नियमांनुसार देशांतर्गत म्युच्युअल फंड्स, जीवन विमा कंपन्या आणि पेन्शन फंड्सकडून प्रमुख गुंतवणूकदारांना इक्विटी शेअर्स वाटप करण्यात येणाऱ्या किमतीइतक्या किंवा त्याहून जास्त किमतीवर वैध बोली प्राप्त झालेल्या असाव्यात. (यास “अँकर गुंतवणूकदार वाटप किंमत” असे संबोधले जाईल). अँकर गुंतवणूकदार हिस्स्यामध्ये अपुरी सदस्यता किंवा वाटप न झाल्यास उर्वरित इक्विटी शेअर्स नेट QIB हिस्स्यामध्ये (प्रमुख गुंतवणुकदार हिस्सा वगळून) जोडले जातील. (the “Net QIB Portion”).
ऑफर प्राईस इतक्या किंवा त्याहून अधिक किमतीला बोली मिळाल्यास QIB च्या एकूण हिश्शापैकी 5 % फक्त म्युच्युअल फंडांना वाटपासाठी उपलब्ध असतील आणि QIBचा उर्वरित हिस्सा म्युच्युअल फंडांसह अन्य सर्व QIB बोलीधारकांसाठी (प्रमुख गुंतवणुकदार वगळून) उपलब्ध करून दिला जाईल. तथापि, जर म्युच्युअल फंडांकडून एकूण मागणी नेट QIB Portion च्या 5% पेक्षा कमी असेल, तर म्युच्युअल फंड भागात वाटपासाठी उपलब्ध असलेले उर्वरित इक्विटी शेअर्स उरलेल्या Net QIB Portion मध्ये समाविष्ट करून QIBs साठी प्रमाणात वाटप केले जाईल. पुढे, ऑफर पैकी 15% पेक्षा कमी नसलेला हिस्सा बिगर संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी उपलब्ध असेल. बिगर संस्थात्मक भागापैकी (अ) एक तृतीयांश भाग 0.20 दशलक्ष रु. पेक्षा अधिक आणि 1.00 दशलक्ष रु. पर्यंत पर्यंत अर्ज आकार असलेल्या अर्जदारांसाठी राखीव असेल आणि (ब) दोन तृतीयांश भाग 1.00 दशलक्ष रु.पेक्षा अधिक अर्ज आकार असलेल्या अर्जदारांसाठी राखीव असेल. अर्थात त्यासाठी अशा कोणत्याही उप-श्रेणीतील सबस्क्राईब नसलेला भाग बिगर-संस्थात्मक बोली लावणाऱ्या दुसऱ्या उप-श्रेणीतील अर्जदारांना सेबी आयसीडीआर निर्देशांनुसार वाटप केला जाऊ शकतो. ऑफर प्राईस इतक्या किंवा त्याहून अधिक किमतीला बोली मिळाल्यास हे लागू होईल. तसेच, ऑफरच्या किमान 35% हिस्सा रिटेल वैयक्तिक बोलीदारांसाठी (“RIBs”) सेबी आयसीडीआर नियमावलीनुसार (“Retail Portion”) उपलब्ध असेल, त्यासाठी त्यांच्याकडून ऑफर किमतीएवढ्या किंवा त्यापेक्षा जास्त किमतीवर वैध बोली प्राप्त होणे आवश्यक आहे.
प्रमुख गुंतवणूकदारांखेरीज (Anchor Investors) सर्व संभाव्य गुंतवणूकदारांनी आपापल्या ASBA खात्यांचा तपशील आणि यूपीआय अर्जदारांसाठी यूपीआय आयडीसह जाहीर करून अर्जाची विहित रक्कम अॅप्लीकेशन सपोर्टेड बाय ब्लॉक अमाऊंट (“ASBA”) प्रक्रियेद्वारे करून ठेवणे बंधनकारक आहे. त्यानुसार योजनेत सहभागी करून घेण्यासाठी सर्व बोली रकमा या सेल्फ सर्टिफाइड सिंडिकेट बँक्स एससीएसबीतर्फे किंवा यूपीआय यंत्रणे अंतर्गत स्पॉन्सर बँकेतर्फे ब्लॉक करून ठेवण्यात येतील. प्रमुख गुंतवणूकदारांना त्यांच्यासाठीच्या हिश्शात “ASBA” प्रक्रीयेनुसार सहभागी होण्याची परवानगी नाही.
कंपनीचे हे इक्विटी शेअर्स बीएसई लिमिटेड (“BSE”) आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेड (“NSE एकत्रितपणे BSE सोबत “Stock Exchanges”) वर सूचीबद्ध करण्याचे प्रस्तावित आहे. ऑफरच्या उद्दिष्टासाठी NSE हे निर्देशित स्टॉक एक्सचेंज राहील.
न्यू बेरी कॅपिटल्स लिमिटेड हे या इश्युचे एकमेव बुक रनिंग लीड मॅनेजर आहेत.
येथे वापरल्या गेलेल्या परंतु परिभाषित न केलेल्या सर्व कॅपिटलाइज्ड शब्दांचा अर्थ 17 ऑगस्ट 2026च्या आरएचपी मध्ये नमूद केल्यासारखाच असेल.


