Friday, August 21, 2026
Google search engine
HomeUncategorizedपेवटेक यांची पुणे ग्रँड सायकल टूर स्पर्धेच्या निविदेसाठी सल्लागार म्हणून नियुक्ती बाबत...

पेवटेक यांची पुणे ग्रँड सायकल टूर स्पर्धेच्या निविदेसाठी सल्लागार म्हणून नियुक्ती बाबत व EIL मार्फतच कामाची गुणवत्ता तपासणी करून घेणेबाबत.

पुणे -पेवटेक यांची पुणे ग्रँड सायकल टूर स्पर्धेच्या निविदेसाठी सल्लागार म्हणून नियुक्ती बाबत व
EIL मार्फतच कामाची गुणवत्ता तपासणी करून घेणेबाबत. माजी विरोधी पक्षनेते उज्वल केसकर, सुहास कुलकर्णी आणि प्रशांत बधे यांनी पुणे मनपा आयुक्त नवल किशोर राम यांच्याकडे निवेदनाद्वारे लक्ष वेधले आहे. या निवेदनात म्हटले आहे की
ग्रँड सायकल टूर ही पुण्याची मानाची सायकल स्पर्धा आहे.
१) पुणे महानगरपालिकेच्या इस्टिमेट कमिटीने ग्रँड सायकल टूर यांचे इस्टिमेट मंजूर केले.
२) त्याप्रमाणे टेंडर काढले.
३) टेंडरच्या अटी शर्ती बाबत वाद झाला.
४) वादविवाद टाळण्यासाठी आपल्याला हस्तक्षेप करून चार दिवसाची मुदतवाढ द्यावी लागली.
५) पेवटेक यांची नियुक्ती करण्याचा प्रस्ताव प्रशासनातर्फे मांडण्यात आला त्याला काल स्थायी समितीने मान्यता दिली.
६) इस्टिमेट करणे प्रेझेंटेशन करणे अटी शर्ती ठरविणे आणि टेंडरची छाननी करणे यासाठी या कंपनीची नेमणूक केल्याचे विषय पत्रावरुन स्पष्ट होते.
७) ही कामे यापूर्वीच झाली आहे त्याशिवाय टेंडर कसे निघेल ?
८) पुणे महानगरपालिकेच्या खात्यांमध्ये सक्षम अधिकारी आहेत की ज्यांना आपण खात्यामध्ये नेमले आहे.
९) DSR रेट आपल्याकडे आहेत त्याला मान्यता आहे.
१०) सायकल टूर कुठल्या कुठल्या रस्त्यावरून जाणार या रस्त्यांची यादी आपल्याकडे आहे.
११) यातले सिमेंट काँक्रीट चे किती आणि डांबराचे किती याची संपूर्ण माहिती खात्याकडे उपलब्ध आहे.
१२) प्रेझेंटेशन तयार करण्यासाठी आपले अधिकारी सक्षम नाहीत का ?
१३) काही संपूर्ण कामे या कंपनीकडून करून मग हे विषय पत्र प्रशासनाने आपल्यासमोर ठेवून आपल्या मार्फत स्थायी समिती समोर मांडले आहे हा प्रश्न आहे.
१४) गतवर्षीचे काम देखील याच कंपनीने केले त्याची त्यांनी तयार केलेली सर्व इस्टिमेट आम्ही आपल्याकडे सादर केली होती आणि आपण सांगितले की यातील जी कामे त्यांनी धरली आहेत आणि जी करणे गरजेचे नाही ती न करता रस्ते चांगले करू आम्ही आपल्या शब्दावर विश्वास ठेवला यावर्षी पुन्हा त्या कंपनीने तीच चूक केली आहे आपण एकदा इस्टिमेट चेक केले पाहिजे ते आपल्या दक्षता विभागा मार्फत.
१५) आपल्याकडे जे अधिकारी आहेत त्यांच्यापेक्षा दहा-पंधरा वर्ष लहान जूनियर अशा लोकांनी या कंपनीत ही इस्टिमेट तयार केली आहेत अशी आमची माहिती आहे.
१६) या प्रकल्पावर काम करणाऱ्या लोकांची यादी शिक्षण, अनुभव काय आहे याबाबत आपण दक्षता विभागा मार्फत अहवाल मागवून घ्यावा म्हणजे आम्ही जे सांगितले त्यात आपल्याला तथ्य आहे असे लक्षात येईल.
१७) या कामासाठी दीड कोटी रुपये सल्ला फी देणे हा पुणेकरांच्या करदात्यांच्या पैशांवर डल्ला मारण्याचा प्रकार आहे, अधिकारी आणि कंपनी या दोघांनी मिळून हे षडयंत्र रचले आहे.
१८) EIL मार्फत यांच्या कामाची तपासणी होणे आवश्यक आहे तशी आमची मागणी आहे.
१९) ज्यांना आपण सल्लागार म्हणून नेमले आहे त्यांच्याकडे कामाची गुणवत्ता तपासण्याच्या कुठल्याही सुविधा नाहीत.
२०) रस्ते करण्यासाठी डांबराचे प्रमाण हे सहा टक्के {६%} असणे आवश्यक असते, त्यामुळे रस्ते टिकाऊ आणि चांगले होतात.
२१) EIL मार्फत तपासणी केली तर ते कुठल्याही परिस्थितीत गुणवत्तेशी तडजोड करत नाहीत त्यामुळे कंत्राटदारांना ते नको असतात आणि अधिकाऱ्यांना देखील.
२२) छोट्या छोट्या कामांना आपण EIL मार्फत बिल सादर करायला सांगतो मग एवढ्या मोठ्या रकमेला EIL का नको ? पैसा पुणेकरांचा आहे अधिकारी कंत्राटदारांचा नाही.
आमची आपणास नम्र विनंती सल्लागाराला दीड कोटी रुपये सल्ला फी देण्याची गरज नसताना आणि मनपाकडे या दर्जाचे सक्षम अधिकारी असताना हा प्रस्ताव ज्यांनी ठेवला त्यांची चौकशी केली पाहिजे आणि जर ते सक्षम नसतील तर त्यांची बदली केली पाहिजे आणि कुठल्याही परिस्थितीत ईआयएल यांची गुणवत्ता तपासण्यासाठी नेमणूक केली पाहिजे.
आम्ही सन्माननीय जिल्हाधिकारी यांना देखील विनंती करणार आहोत जिल्ह्यामध्ये या इतर संस्था हे काम करणार आहेत त्यांची देखील गुणवत्तेची तपासणी केंद्र सरकारचा उपक्रम असणाऱ्या या संस्थेमार्फतच करावी. या निवेदनाच्या प्रती जिल्हाधिकारी, मनपा अतिरिक्त आयुक्त,शहर अभियंता पथ विभागाचे प्रभारी मुख्य अभियंता यांना पाठविण्यात आल्या आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments