भारताची विकास गाथा आता केवळ मोजक्या मेट्रो शहरांपुरती मर्यादित राहिलेली नसून शहरांचे व्यापक नेटवर्क देशाची भावी आर्थिक शक्ती म्हणून उदयास येत आहे.
मुंबई, ऑगस्ट २१, २०२६: डन अँड ब्रॅडस्ट्रीटने आज एप्रिल-जून २०२६ साठी आपला सिटी व्हिटॅलिटी इंडेक्स (सीव्हीआय) जाहीर केला. हा इंडेक्स सॅटेलाइटद्वारे मिळणारा अर्थ ऑब्झर्व्हेशन डेटा आणि आर्थिक निर्देशांकांचा वापर करून देशभरातील ८०० पेक्षा जास्त जिल्ह्यांमधील आर्थिक गतिशीलतेचा मागोवा घेतो. या निष्कर्षांनुसार पुण्याला भारतातील सर्वात गतिमान मेट्रो शहर म्हणून अव्वल स्थान मिळाले आहे, तर दक्षिण २४ परगणा हे सर्वात प्रबळ कामगिरी करणारे उदयोन्मुख शहर ठरले आहे. या निष्कर्षांमधून निदर्शनास येते की, प्रस्थापित मेट्रो शहरे अर्थव्यवस्थेला मजबूत पकड देत असली, तरी वाढती उदयोन्मुख शहरे देशभरातील आर्थिक उपक्रमांमध्ये मोठे योगदान देत आहेत.
प्रमुख निष्कर्ष खालीलप्रमाणे:
आयटी सेवा, प्रगत उत्पादन, ऑटोमोबाईल उद्योग, शिक्षण आणि नाविन्यतेवर आधारित आर्थिक उपक्रमांमधील आपल्या वैविध्यपूर्ण ताकदीच्या बळावर पुण्याने भारतातील सर्वात गतिमान मेट्रो शहर म्हणून आपले अव्वल स्थान कायम ठेवले आहे.
मेट्रो शहरांमध्ये कोलकात्याने सर्वात प्रबळ वाढीचा वेग नोंदवला आहे, जो वेगवान आर्थिक हालचाली आणि गुंतवणुकीच्या शक्यता दर्शवतो; तर अहमदाबादने एकूण क्रमवारीत दुसरे स्थान पटकावले आहे.
उदयोन्मुख शहरांच्या क्रमवारीत दक्षिण २४ परगणा अव्वल स्थानी राहिला, त्यापाठोपाठ उत्तर २४ परगणा आणि ठाणे यांचा क्रमांक लागतो. यामधून भारतातील पारंपारिक मेट्रो केंद्रांच्या पलीकडील जिल्ह्यांचे वाढते आर्थिक महत्त्व अधोरेखित होते.
जयपूर, नाशिक, सूरत, मुर्शिदाबाद आणि रंगारेड्डी हे जिल्हे आपली आर्थिक पकड सातत्याने मजबूत करत असून प्रादेशिक विकासात महत्त्वाचे योगदान देत आहेत.
गेल्या दशकात दीमापूर, पंचमहाल, आनंद, अयोध्या, रामपूर, बस्ती, शामली, बौद्ध, औरंगाबाद आणि कोडरमा यांसारख्या अनेक जिल्ह्यांनी सातत्याने उत्कृष्ट कामगिरी केली आहे, ज्यातून २०१२ च्या दुसऱ्या तिमाहीपासून त्यांची निरंतर आर्थिक स्थिरता आणि दीर्घकालीन वाढीची गती दिसून येते.
भारताच्या शहरीकरणाचा प्रवास अधिक सर्वसमावेशक आणि भौगोलिकदृष्ट्या विविधता असणाऱ्या टप्प्यात प्रवेश करत आहे, जिथे उदयोन्मुख शहरांमध्ये व्यवसाय, गुंतवणूक, गुणवत्ता आणि पायाभूत सुविधांचा विकास अधिक प्रबळ वेगाने विस्तारत आहे. भविष्यातील संधी ओळखू इच्छिणाऱ्या आणि संसाधनांचे प्रभावी वाटप करू इच्छिणारे गुंतवणूकदार, उद्योग, विकासक आणि धोरणकर्ते यांच्यासाठी या नवीन विकास कॉरिडॉर्सची माहिती असणे अधिकाधिक महत्त्वाचे ठरेल.
डन अँड ब्रॅडस्ट्रीट इंडियाचे मुख्य अर्थतज्ज्ञ (चीफ इकॉनॉमिस्ट) डॉ. अरुण सिंग म्हणाले, “नवीन सिटी व्हिटॅलिटी इंडेक्स भारताच्या विकासाच्या प्रवासातील एक महत्त्वाचा संरचनात्मक बदल अधोरेखित करतो. पुण्यासारखी मेट्रो शहरे आर्थिक विस्तार आणि उत्पादकतेला चालना देत असली, तरी मोठ्या संख्येने उदयोन्मुख शहरे आणि जिल्हे गुंतवणूक, नवीन उद्योगांची निर्मिती आणि रोजगार निर्मितीमध्ये महत्त्वपूर्ण योगदान देत आहेत. दक्षिण आणि उत्तर २४ परगणा सारख्या केंद्रांचा उदय आर्थिक गती व्यापक भौगोलिक क्षेत्रात कशी पसरत आहे हे दर्शवतो. भारताच्या या वाढत्या विकास पायाचा विस्तार भविष्यातील पायाभूत सुविधांची मागणी, भांडवली प्रवाह, नागरी विकास आणि रोजगाराच्या संधींना आकार देण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावेल, ज्यामुळे प्रादेशिक स्पर्धात्मकता आर्थिक प्रगतीचा प्रबळ चालक बनेल.”
डन अँड ब्रॅडस्ट्रीटच्या एप्रिल-जून २०२६ च्या सिटी व्हिटॅलिटी इंडेक्समध्ये पुण्याचा अव्वल क्रमांक कायम; भारताची विकास गाथा मेट्रो शहरांच्या पलीकडे विस्तारत असल्याचे अधोरेखित
RELATED ARTICLES


