Thursday, August 27, 2026
Google search engine
HomeUncategorizedएमपी स्टील लिमिटेडचा सेबीकडे डीआरएचपी (DRHP) दाखल

एमपी स्टील लिमिटेडचा सेबीकडे डीआरएचपी (DRHP) दाखल

डीआरएचपी लिंक: https://mpsteelindia.com/wp-content/uploads/2026/08/Draft-Red-Herring-Prospectus.pdf

स्टेनलेस-स्टील उत्पादनांच्या निर्मितीमध्ये कार्यरत असलेल्या ‘एमपी स्टील लिमिटेड’ने (MPL) ‘इनिशिअल पब्लिक ऑफरिंग’ (IPO) द्वारे निधी उभारण्यासाठी ‘सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया’ (SEBI) कडे आपला ‘ड्राफ्ट रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस’ (DRHP) दाखल केला आहे.

‘ब्लॅक’ आणि ‘ब्राइट’ अशा प्रकारची स्टेनलेस स्टील उत्पादने ही कंपनी पुरवते; यामध्ये गोल, षटकोनी, चौरस, अँगल आणि सपाट (फ्लॅट) बार्स किंवा पट्ट्यांचा, तसेच फोर्जिंग इंगॉट्स, चॅनल्स, फास्टनर्स आणि इतर पूरक उत्पादनांचा समावेश आहे. कंपनी प्रामुख्याने ‘बी-टू-बी’ (B2B) क्षेत्रात कार्यरत असून, संरक्षण, औषधनिर्माण, पायाभूत सुविधा, वाहन उद्योग, हार्डवेअर, जहाजबांधणी, बंदरे, ऊर्जा प्रकल्प आणि रिफायनरी यांसारख्या विविध औद्योगिक क्षेत्रातील व्यापारी आणि उत्पादकांना आपली उत्पादने पुरवते.

31 मार्च 2026 पर्यंत, कंपनीने 413.41 कोटी रुपयांचे उत्पन्न आणि 15.81 कोटी रुपयांचा कर-पश्चात नफा (PAT) नोंदवला.

गुजरातच्या मेहसाणा येथे कंपनीचा उत्पादन प्रकल्प स्थित असून तो सुमारे 80,374 चौरस मीटर क्षेत्रावर विस्तारलेला आहे; यामध्ये सुमारे 32,492 चौरस मीटरच्या वापरात नसलेल्या क्षेत्राचाही समावेश आहे. या प्रकल्पाला ISO 9001:2015 मानांकन प्राप्त झाले आहे. 31 मार्च 2026 रोजी, कंपनीची ‘इंगॉट’ (ingot) उत्पादन क्षमता 19,151 MTPA, ‘रोलिंग’ (rolling) क्षमता 63,030 MTPA आणि ‘ब्राइट बार’ (bright bar) क्षमता 27,500 MTPA इतकी होती.

डीआरएचपीनुसार, प्रस्तावित IPO मध्ये 950 दशलक्ष रुपये (95 कोटी रुपये) पर्यंतच्या इक्विटी शेअर्सच्या नवीन इश्यूचा आणि प्रवर्तकांकडून (Promoters) 2307,290 पर्यंतच्या इक्विटी शेअर्सच्या ‘ऑफर फॉर सेल’चा (OFS) समावेश आहे.

सध्या ही कंपनी आपल्या व्यापारी नेटवर्कद्वारे आणि थेट विक्रीद्वारे सोळा राज्ये व तीन केंद्रशासित प्रदेशांमध्ये आपल्या उत्पादनांची विक्री करते. तसेच,आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील संयुक्त अरब अमिराती (UAE), जर्मनी, तुर्की, इजिप्त, ब्राझील आणि पोलंड या प्रमुख निर्यात बाजारपेठांसह कंपनीची उत्पादने एकवीस देशांमध्ये निर्यात केली जातात.

नवीन समभाग विक्रीतून मिळणाऱ्या निव्वळ रकमेचा वापर कंपनी आपल्या नियोजित ‘बॅकवर्ड इंटिग्रेशन’चा एक भाग म्हणून ‘बिलेट्स’ निर्मितीचा प्रकल्प उभारण्यासाठी, तसेच वाढीव खेळत्या भांडवलाची काही गरज भागवण्यासाठी आणि सामान्य कॉर्पोरेट उद्देशांसाठी करणार आहे.

मोनार्क नेटवर्थ कॅपिटल लिमिटेड ही या इश्यूसाठी एकमेव बुक रनिंग लीड मॅनेजर आहे, तर केफिन टेक्नॉलॉजीज लिमिटेड ही या ऑफरसाठी रजिस्ट्रार आहे

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments