• पॉपआईज®️ ने भारतातील सर्वात मोठा पनीर प्रकार लाँच केला आहे, ज्यामध्ये पाच वेगवेगळ्या आंतरराष्ट्रीय चवींचा समावेश आहे.
• हा नवीन प्रकार ब्रँडच्या शाकाहारी श्रेणीला अधिक खास बनवतो आणि भारतातील अत्यंत लोकप्रिय घटकाला त्याची खास बोल्ड चव प्रदान करतो.
• कॉमेडियन आकाश गुप्ता यामध्ये असून ही मोहीम एका बोल्ड फ्लेव्हर चॅलेंजद्वारे भारतातील व्यक्तींचे पनीरवरील प्रेम साजरी करते.
राष्ट्रीय, 26 ऑगस्ट २०२६: पॉपआईज®️ या जगभरात प्रसिद्ध असलेल्या आणि लुईझियानामध्ये सुरुवात झालेल्या फ्राईड चिकन ब्रँडने आज भारतातील त्यांची सर्वात मोठी पनीर बर्गर श्रेणी ‘५ बोल्ड फ्लेव्हर्स ऑफ पनीर’च्या लाँचची घोषणा केली. ब्रँडची शाकाहारी श्रेणी अधिक खास बनवण्यासाठी तयार केलेली ही नवीन श्रेणी पाच वेगवेगळ्या चवींचे अनुभव एकत्र आणते, ज्यामध्ये पॉपआईज®️ची खास बोल्ड चव आणि भारतातील अत्यंत आवडता घटक यांना एकत्र करण्यात आले आहे.
भारतातील शाकाहारी खाद्यपदार्थांचे क्षेत्र पारंपारिक पर्यायांच्या पलिकडे विकसित होत आहे, जिथे ग्राहक परिचित चव न सोडता अधिक विविधता, आंतरराष्ट्रीय चवी आणि नवीन अनुभवांचा शोध घेत आहेत. पनीर दीर्घकाळापासून देशातील सर्वात पसंतीचा शाकाहारी घटक राहिला आहे, ज्यामुळे पॉपआईज®️ ला त्यांची जागतिक स्तरावरील चवींची तज्ज्ञता अधिकाधिक ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यासाठी हा उत्तम पर्याय मिळाला आहे.
या नवीन श्रेणीमध्ये बोल्ड पनीर, क्लासिक पनीर, अमेरिकन मेयो पनीर बर्स्ट, हॅबानेरो पनीर बर्स्ट आणि कोरियन पनीर बर्स्ट यांचा समावेश आहे. यामुळे ही कोणत्याही क्यूएसआर ब्रँडने देशात ऑफर केलेली सर्वात मोठी पनीर बर्गर श्रेणी बनली आहे. क्लासिक चवीपासून ते जागतिक स्तरावरील फ्लेव्हर्सपर्यंत प्रत्येक बर्गर ग्राहकांना पनीरचा आस्वाद घेण्यासाठी अधिक पर्याय देण्यासोबत पॉपआईज®️ ज्यासाठी ओळखला जातो ती बोल्ड चव देण्यासाठी तयार करण्यात आला आहे.
या लाँचबद्दल मत व्यक्त करत पॉपआईज®️ इंडियाचे ईव्हीपी आणि चीफ बिझनेस ऑफिसर विभोर गुप्ता म्हणाले, “पॉपआईज®️मध्ये आमचा विश्वास आहे की, बोल्ड फ्लेव्हर कधीही पर्यायांच्या अभावामुळे मर्यादित राहू नये. आम्ही आमच्या प्रसिद्ध चिकनसाठी ओळखले जात असलो, तरी भारतातील शाकाहारी ग्राहक देखील त्यांच्या जेवणात तीच उत्सुकता, विविधता आणि आनंदाचा शोध घेत आहेत हे आम्ही ओळखतो. पनीर देशातील सर्वात आवडता घटक आहे आणि ‘५ बोल्ड फ्लेव्हर्स ऑफ पनीर’द्वारे आम्ही परिचित असलेली आवडती चव आणि आंतरराष्ट्रीय फ्लेव्हर्स एकत्र आणत आहोत, जे आम्हाला इतरांपेक्षा वेगळे ठरवते. आमचे पनीरचे हे आतापर्यंतचे सर्वात मोठे लाँच आहे आणि भारतातील ग्राहकांसाठी अधिक प्रबळ व समर्पक शाकाहारी पोर्टफोलिओ तयार करण्याच्या दिशेने हे महत्त्वाचे पाऊल आहे.”
हे लाँच अधिक प्रभावी करण्यासाठी पॉपआईज®️ने कॉमेडियन आकाश गुप्ता यांच्यासोबत सहयोग केला आहे, ज्यांचे पनीरवरील अतीव प्रेम या मोहिमेच्या केंद्रस्थानी आहे. या डिजिटल-केंद्रित मोहिमेमध्ये ब्रँड भारतातील सर्वात उत्कृष्ट पनीर बर्गर अनुभव देऊ शकतो का, हे शोधण्यासाठी आकाश पॉपआईजचे चॅलेंज स्वीकारताना दिसतात. इन्फ्लुएन्सर सहयोग आणि सोशल मीडिया उपक्रमांच्या पाठिंब्याने या मोहिमेचा उद्देश पॉपआईज®️चा संस्कृती-केंद्रित विपणन दृष्टिकोन अधिक दृढ करण्यासोबत बोल्ड शाकाहारी फ्लेव्हर्सभोवती चर्चा निर्माण करणे हा आहे.
पॉपआईज®️मध्ये, बोल्ड फ्लेव्हर नेहमी प्रत्येक नवीन प्रयोगाच्या केंद्रस्थानी राहिले आहे. या सर्वात मोठ्या पनीर लाँचद्वारे ब्रँड पॉपआईज®️ला जागतिक स्तरावर लोकप्रिय बनवलेली आपली खास चव प्रदान करत भारतातील विविध खाद्य पसंतींचा आदर करणाऱ्या पर्यायांसह आपला मेनू अधिक समृद्ध करत आहे.
पॉपआईज®️ कडून ‘५ बोल्ड फ्लेव्हर्स ऑफ पनीर’सह पनीर बर्गरचे नवे रूप सादर; ही आतापर्यंतची सर्वात मोठी शाकाहारी श्रेणी
RELATED ARTICLES


