Friday, August 28, 2026
Google search engine
HomeUncategorizedयामाहा वायझेडएफ-आर२ चे भारतात जागतिक पदार्पण; आर-सिरीजच्या नव्या अध्यायाचे अनावरण

यामाहा वायझेडएफ-आर२ चे भारतात जागतिक पदार्पण; आर-सिरीजच्या नव्या अध्यायाचे अनावरण

चेन्नई, २७ ऑगस्ट २०२६: इंडिया यामाहा मोटर (आयवायएम) प्रायव्हेट लिमिटेडने आज भारतात जागतिक स्तरावर पहिल्यांदाच सादर होत असलेल्या ऑल-न्यू वायझेडएफ-आर२ च्या लाँचची घोषणा केली, ज्यामुळे देशातील कंपनीचा प्रतिष्ठित आर-सिरीज पोर्टफोलिओ अधिक दृढ झाला आहे. Rs. 2,30,500 (एक्स-शोरूम, दिल्ली) सुरू होणाऱ्या किमतीत उपलब्ध असलेली वायझेडएफ-आर२ यामाहाची आपली प्रीमियम मोटरसायकल श्रेणी वाढवण्याची आणि भारतातील रायडर्सच्या बदलत्या आकांक्षा पूर्ण करणारी उत्पादने देण्याची कटिबद्धता अधोरेखित करते.

ऑल-न्यू वायझेडएफ-आर२ अत्यंत स्पर्धात्मक २००सीसी सेगमेंटमध्ये यामाहाची पहिली ऑफर आहे, जी प्युअर सुपर स्पोर्ट परफॉर्मन्स, प्रगत तंत्रज्ञान आणि दैनंदिन वैविध्‍यततेचा शोध घेणाऱ्या नवीन पिढीच्या रायडर्ससाठी डिझाइन करण्यता आली आहे. संपूर्णपणे नवीन प्लॅटफॉर्मवर तयार केलेली आणि जपानमध्ये भारतातील टीम्ससोबत सहयोगाने विकसित व इंजिनिअर केलेल्या नवीन इंजिनद्वारे समर्थित वायझेडएफ-आर२ उत्तम कार्यक्षमता, आत्मविश्वास देणारे हँडलिंग आणि यामाहाच्या रेसिंग इंजिनिअरिंगचा मेळ साधते.

वाढत्या आकांक्षा, बदलती जीवनशैली आणि प्रीमियम मोबिलिटी उपायांना मिळणारी पसंती यामुळे भारतातील प्रीमियम मोटरसायकल बाजारपेठ वेगाने विकसित होत आहे. २००सीसी सेगमेंट सर्वात वेगाने वाढणारी श्रेणी म्हणून उदयास आली आहे, जी उच्च पातळीवरील कार्यक्षमता आणि मालकीहक्क अनुभवाकडे वळू इच्छिणाऱ्या रायडर्सना आकर्षित करत आहे. हा बदल यामाहासाठी आपला संपूर्ण मोटरसायकल व्यवसाय अधिक दृढ करण्याची आणि देशातील अत्यंत आशादायक बाजारपेठेत आपला विस्तार करण्याची मोठी संधी निर्माण करतो. या विकसित होत असलेल्या श्रेणीसाठी खास तयार केलेली वायझेडएफ-आर२ पॉवर, चपळता आणि दैनंदिन रायडिंगमध्ये उत्तम संतुलन साधते, ज्यामुळे ही मोटरसायकल ट्रॅक, महामार्ग आणि रोजच्या प्रवासासाठी तितकीच सक्षम ठरते.

ऑल-न्यू वायझेडएफ-आर२ तीन व्हेरियंट्स आणि पाच आकर्षक रंग पर्यायांमध्ये उपलब्ध असेल, ज्यामुळे रायडर्सना त्यांच्या रायडिंग शैलीला आणि व्यक्तिमत्त्वाला साजेशी मोटरसायकल निवडता येईल. वायझेडएफ-आर२ चे बेस व्हेरियंट मेटलिक ब्लॅक आणि डार्क ब्लुइश ग्रे या रंगांमध्ये उपलब्ध असेल, ज्यामध्ये ऑल-ब्लॅक फ्रंट व रिअर व्हील्ससह मॅट-फिनिश सीट देण्यात आली आहे, जी या मोटरसायकलला आकर्षक लुक देते. यापुढील, वायझेडएफ-आर२ चे दुसरे व्हेरियंट तिसऱ्या जनरेशनच्या बाय-डायरेक्शनल क्विक शिफ्टरने सज्ज आहे आणि मॅट व्हाईट पर्ल व रेसिंग ब्लू या रंग पर्यायांमध्ये सादर केले आहे. यामध्ये बॉडी-कलर अलॉय व्हील्स, मॉडेल-विशेष ग्राफिक्स आणि प्रीमियम फिनिशिंग समाविष्ट आहे, जे या मोटरसायकलच्या स्पोर्टी लूकला अधिक अधोरेखित करते.

या श्रेणीतील टॉप व्हेरियंट वायझेडएफ-आर२एम एक्सक्लुझिव्ह मेटलिक ग्रे रंगात उपलब्ध आहे, जे सर्वोत्तम सुपर स्पोर्ट अनुभव शोधणाऱ्या रायडर्ससाठी डिझाइन केले गेले आहे. क्विक शिफ्टर व्यतिरिक्त, यात प्रीमियम ३डी एम्बॉस्ड एम्ब्लेम, फॉक्स स्व्हेड-फिनिश सीट, सिल्व्हर-फिनिश स्विंगआर्म आणि शॉट-ब्लास्टेड मफलर एंड कॅप समाविष्ट आहे, जे यामाहाच्या फ्लॅगशिप आर१ च्या हाय-ग्लास फिनिशची आठवण करून देते. एम व्हेरियंटमध्ये अॅडजस्टेबल फ्रंट फोर्क, रिअर शॉकर्स, क्लच लेव्हर आणि ब्रेक लेव्हर देण्यात आले आहेत, ज्यामुळे रायडर्सना त्यांच्या आवडीनुसार अधिक नियंत्रण आणि उत्तम रायडिंग गतीशीलता मिळते.

सर्व व्हेरियंट्समध्ये वायझेडएफ-आर२ १७-इंच व्हील्स, ट्रॅक्शन कंट्रोल सिस्टम (टीसीएस), असिस्ट अँड स्लिपर क्लच, सिलेक्टेबल रायडिंग मोडसह यामाहा राइड कंट्रोल (वायआरसी), ३७ मिमी अपसाइड-डाऊन (यूएसडी) फ्रंट फोर्क्स आणि प्रमाणित म्हणून ड्युअल-चॅनेल एबीएस या सर्व कार्यक्षमता आणि सुरक्षा तंत्रज्ञानाने सज्ज आहे.

रेसिंगपासून प्रेरित स्टायलिंग

यामाहाच्या आधुनिक जागतिक आर-सिरीज मोटरसायकल्सवरून प्रेरणा घेत ऑल-न्यू वायझेडएफ-आर२ मध्ये वैशिष्ट्यपूर्ण सुपर स्पोर्ट स्टायलिंगसह आकर्षक आणि एरोडायनामिक डिझाइन देण्यात आली आहे. वेग, चपळता आणि सुस्पष्टता दर्शवण्यासाठी प्रत्येक भाग उत्तम प्रकारे कोरला गेला आहे, ज्यामुळे ही मोटरसायकल उभी असतानाही अत्यंत आकर्षक दिसते.

पुढील बाजू ड्युअल एलईडी पोझिशन लाईट्स आणि कॉम्पॅक्ट बाय-फंक्शनल एलईडी हेडलाईटने सुसज्ज आहे, ज्यामुळे वायझेडएफ-आर२ ला विशिष्ट लुक मिळतो, जो थेट यामाहाच्या प्रतिष्ठित आर-सिरीज परंपरेशी जोडला जातो. R9 च्या एरोडायनामिक्सवरून प्रेरित होऊन यातील फ्रंट फेअरिंग आणि बॉडीवर्क उत्तम प्रकारे डिझाइन केले गेले आहे, ज्यामुळे वाऱ्याचा प्रवाह योग्य प्रकारे नियंत्रित केला जाईल आणि उच्च वेगातही स्थिरता मिळेल. मागील बाजूस YZF-R1 वरून प्रेरित ब्लॉक-स्टाईल एलईडी टेललाईट आणि मोटोजीपी स्टाइल स्विंगआर्म या मोटरसायकलच्या प्रीमियम स्पोर्टी लूकला आणि यामाहाच्या ओळखीला अधिक दृढ करतात.

चपळतेसाठी डिझाइन केलेला ऑल-न्यू प्लॅटफॉर्म

ऑल-न्यू प्लॅटफॉर्मवर डिझाइन करण्यात आलेली वायझेडएफ-आर२ हलकी, चपळ, आत्मविश्वास देणारे हँडलिंग आणि उत्तम रायडिंग अनुभव देण्यासाठी इंजिनिअर केली गेली आहे. याच्या केंद्रस्थानी नवीन उच्च-टणक स्टील ट्यूब डायमंड फ्रेम आहे, जी मजबूती आणि कमी वजनामध्ये उत्तम संतुलन साधते. यामुळे मोटरसायकलचे एकूण वजन (कर्ब वेट) फक्त १४९ किलोग्रॅम ठेवण्यात यश आले आहे आणि ही श्रेणीमधील सर्वात हलकी मोटरसायकल ठरते.

यामाहाच्या प्रसिद्ध वायझेडएफ-आर6 च्या चेसिस आकारावरून प्रेरणा घेऊन या नवीन फ्रेमची रचना उत्तम प्रकारे करण्यात आली आहे, ज्यामुळे विविध परिस्थितींमध्ये आणि सर्व प्रकारच्या रायडर्सना सहज व सोपे हँडलिंग मिळते. या चेसिसमध्ये अतिरिक्त माउंटिंग पॉइंटसह फोर-पॉइंट इंजिन माउंटिंग सिस्टम वापरली आहे, जी फ्रेम आणि इंजिनमधील स्थिरता कमी करून चेसिसची स्थिरता, फीडबॅक आणि कॉर्नरिंग परफॉर्मन्स सुधारण्यास मदत करते.

कार्यक्षमतेसाठी डिझाइन करण्यात आलेले नवीन २०४सीसी इंजिन

ऑल-न्यू वायझेडएफ-आर२ मध्ये पूर्णपणे विकसित केलेले २०४सीसी, लिक्विड-कूल्ड, ४-स्ट्रोक, डीओएचसी, सिंगल-सिलिंडर, ४-व्हॉल्व्ह, फ्युएल-इंजेक्‍टेड इंजिन देण्यात आले आहे, जे उत्तम कार्यक्षमता आणि दैनंदिन रायडिंगचा मेळ साधते. हे नवीन पॉवरट्रेन सेगमेंटमधील सर्वोत्तम २६.५ पीएस पॉवर आणि १९.१ एनएम पीक टॉर्क निर्माण करते, ज्यामुळे जलद अॅक्सिलरेशन, स्मूथ पॉवर डिलिव्हरी आणि उच्च स्पीडमध्येही दमदार परफॉर्मन्स मिळतो. याच्या केंद्रस्थानी यामाहाच्या फ्लॅगशिप R1 वरून घेतलेले डायमंड-लाइक कार्बन (डीएलसी) कोटिंगसह फिंगर फॉलोअर रॉकर आर्म आणि व्हॉल्व्हट्रेन तंत्रज्ञान वापरले आहे. ही नाविन्यपूर्ण यंत्रणा घर्षण कमी करते, ज्यामुळे व्हॉल्व्हट्रेनचे वजन कमी होऊन कार्यक्षमता, टिकाऊपणा आणि त्वरित रेव्ह होणारा परफॉर्मन्स मिळतो, जो यामाहाच्या स्पोर्टी ओळखीला दर्शवतो.

हलकी चेसिस आणि विश्वासार्ह सस्पेंशन

चपळता आणि उत्तम नियंत्रणासाठी इंजिनिअर केलेल्या वायझेडएफ-आर२ मध्ये फक्त १४ किलोग्रॅम वजन असलेली हलकी स्टील फ्रेम देण्यात आली आहे. ही सुधारित फ्रेम रचना वजन कमी ठेवताना मजबूती वाढवते, ज्यामुळे सोपे हँडलिंग, तीक्ष्ण कॉर्नरिंग आणि रायडरला अधिक आत्मविश्वास मिळतो.

चेसिसला पूरक म्हणून यामध्ये ३७ मिमी अपसाइड-डाऊन (यूएसडी) फ्रंट फोर्क्स आणि रिअर मोनोशॉक सस्पेंशन सेटअप दिला आहे, जो विविध रस्त्यांवर उत्कृष्ट पकड देतो. खड्डे आणि खराब रस्ते सहज सहन करण्यासाठी डिझाइन केलेले हे सस्पेंशन चेसिसची स्थिरता, अचूक हँडलिंग आणि आरामदायी प्रवासाचा उत्तम समतोल साधते, ज्यामुळे शहरी रस्ते आणि वीकेंडच्या लाँग राइड्सवर सुरक्षित व आनंददायी प्रवासाचा अनुभव मिळतो.

स्मार्ट कनेक्टिव्हिटी आणि रायडिंग मोड

वायझेडएफ-आर२ मध्ये सोयीसुविधा, कनेक्टिव्हिटी आणि रायडिंगचा उत्तम अनुभव देण्यासाठी अनेक प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. ५-इंच आकर्षक आणि फुल-कलर टीएफटी डिस्प्ले रायडिंगशी संबंधित आवश्यक माहिती आणि नेव्हिगेशन स्पष्टपणे दर्शवतो. तर स्मार्ट की सिस्टम (एम व्हेरियंटमध्ये उपलब्ध) चावीशिवाय डिवाईस वापरण्याची सुविधा देते. याशिवाय, यात यामाहा राइड कंट्रोल (वायआरसी)मुळे तीन रायडिंग मोड मिळतात. वायआरसीद्वारे रायडर्सना स्ट्रीट, स्पोर्ट्स आणि रेन मोड्स निवडण्याचा पर्याय मिळतो, ज्यामुळे रस्त्याची परिस्थिती आणि आवडीनुसार मोटरसायकलची कार्यक्षमता सेट करता येते.

या लाँचबद्दल मत व्यक्त करत यामाहा मोटर इंडिया ग्रुपचे अध्यक्ष श्री हाजिमे आओटा म्हणाले, ” वायझेडएफ-आर२ चे लाँच यामाहाच्या दीर्घकालीन वाढीच्या धोरणामधील एक महत्त्वाचा टप्पा आहे.वायझेडएफ-आर२ ही केवळ एका नवीन सेगमेंटमधील एन्ट्री नाही, तर ही मोटरसायकल यामाहा आर-सिरीजच्या ओळखीशी जोडलेल्या रायडर्ससाठी खास तयार केली आहे. अस्सल आर-सिरीज डीएनए, हलका परफॉर्मन्स आणि उत्तम इंधन कार्यक्षमता (मायलेज) यांचा मेळ साधत ही मोटरसायकल आमच्या सुपरस्पोर्ट विश्वात प्रवेश करण्याचा उत्साहवर्धक मार्ग प्रदान करते. जागतिक आर-सिरीज प्रमुख मोटरसायकलींपासून प्रेरित आणि पूर्णपणे नव्या प्लॅटफॉर्मवर डिझाइन करण्यात आलेली वायझेडएफ-आर२ भारतातील इंजिनिअरिंग कौशल्यावरील आणि यामाहाच्या जागतिक उत्पादन धोरणामधील भारताच्या वाढत्या भूमिकेतील आमचा विश्वास दर्शवते.”

“आम्ही भारतातील आमच्या आर-सिरीज ग्राहकांच्या अढळ विश्वासाबद्दल आणि आवडीबद्दल अत्यंत आभारी आहोत, ज्यांच्यामुळे आर-सिरीज देशातील यामाहाच्या सर्वात लोकप्रिय मोटरसायकल फॅमिलीपैकी एक बनली आहे. आज भारतातील रस्त्यांवर एक दशलक्षहून अधिक आर-सिरीज मोटरसायकल धावत आहेत. हे नाते आम्हाला नवनिर्मिती आणि परफॉर्मन्सची व्याप्ती वाढवण्यासाठी सातत्याने प्रेरित करते. आम्हाला पूर्ण विश्वास आहे की, YZF-R2 हा वारसा पुढे नेईल, या सेगमेंटमध्ये नवीन मानदंड प्रस्थापित करेल आणि यामाहा रायडर्सच्या नवीन पिढीला प्रेरित करेल.”

ऑल-न्यू YZF-R2 सप्टेंबर २०२६ च्या मध्यापासून भारतातील सर्व ब्लू स्क्वेअर (बीएसक्यू) डीलरशिप्सवर उपलब्ध होईल.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments