Monday, August 31, 2026
Google search engine
HomeUncategorizedपुण्यात एडीपी इंडिया चा वार्षिक दिन सोहळा उत्साहात साजरा ...

पुण्यात एडीपी इंडिया चा वार्षिक दिन सोहळा उत्साहात साजरा २७ वर्षांच्या विकासाचा टप्पा आणि मानवी नेतृत्व, कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित कामाच्या नव्या युगाची सुरुवात

पुणे, ३० ऑगस्ट २०२६ – मानवी भांडवल व्यवस्थापन उपाययोजनांमधील आघाडीची संस्था एडीपी प्रायव्हेट लिमिटेड ने पुण्यातील जेडब्लू मॅरीयट येथे १,३५० हून अधिक कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत आपला वार्षिक दिन सोहळा साजरा केला. ‘आमचे नवे युग : मानवी नेतृत्व, कृत्रिम बुद्धिमत्तेची साथ’ या संकल्पनेखाली आयोजित या सोहळ्यात भारतातील एडीपी च्या २७ वर्षांच्या प्रवासाचा गौरव करण्यात आला. तसेच, संस्थेच्या सातत्यपूर्ण विकास आणि परिवर्तनाला चालना देणारे कर्मचारी, कल्पना आणि संस्कृती यावर प्रकाश टाकण्यात आला. पुण्यातील वार्षिक दिन सोहळ्याने एडीपी इंडिया च्या कर्मचारी-केंद्रित संस्कृतीचे दर्शन घडवतानाच, उल्लेखनीय कामगिरीची दखल घेणे, प्रतिभेचा गौरव करणे आणि कर्मचाऱ्यांना एकत्र आणण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून दिले.

कार्यक्रमात एडीपी इंडिया च्या कर्मचाऱ्यांसह कंपनीच्या सामाजिक उत्तरदायित्व विभाग तरंग च्या माध्यमातून सहाय्य मिळणाऱ्या मुलांनी विविध सांस्कृतिक सादरीकरणे केली. या माध्यमातून एडीपी समुदायातील विविध पिढ्या एकाच मंचावर आल्या. एडीपी स्टुडिओ च्या उत्साहपूर्ण संगीत सादरीकरणांसह नाट्यप्रयोग आणि दमदार ढोलवादनाने सोहळ्याची रंगत वाढवली.

या प्रसंगी बोलताना एडीपी प्रायव्हेट लिमिटेड चे व्यवस्थापकीय संचालक आणि सरव्यवस्थापक, श्री. विजय वेमुलापल्ली म्हणाले, “एडीपी इंडिया च्या उल्लेखनीय प्रवासाला आकार देणाऱ्या आणि संस्थेचे भविष्य घडवत राहणाऱ्या आमच्या कर्मचाऱ्यांचा गौरव करण्याची संधी म्हणजे वार्षिक दिन. २७ वर्षांच्या कालावधीत आम्ही १०२ कर्मचाऱ्यांपासून १३,६०० हून अधिक कर्मचाऱ्यांपर्यंतचा प्रवास केला असून, आज आम्ही नवोन्मेष आणि उच्च-मूल्याच्या कामासाठी एक धोरणात्मक केंद्र म्हणून विकसित झालो आहोत. ‘मानवी नेतृत्व, कृत्रिम बुद्धिमत्तेची साथ’ या नव्या युगात प्रवेश करत असताना, आमचे कर्मचारी आम्ही करत असलेल्या प्रत्येक गोष्टीच्या केंद्रस्थानी आहेत. मानवी क्षमतेला अधिक सक्षम करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करण्यावर आमचा भर आहे. त्याचबरोबर, कामाच्या भविष्याला आकार देणारी कौशल्ये, सर्जनशीलता आणि नेतृत्व यामध्ये आम्ही सातत्याने गुंतवणूक करत राहू.”

मानवी भांडवल व्यवस्थापन उद्योग सध्या परिवर्तनाच्या नव्या टप्प्यात प्रवेश करत आहे. संस्था मानवी संसाधने, वेतन व्यवस्थापन, मनुष्यबळ व्यवस्थापन, प्रतिभा आणि विश्लेषण यांसारख्या क्षेत्रांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा वाढता वापर करत आहेत. १४० हून अधिक देशांमधील ११ लाखांहून अधिक ग्राहकांना सेवा देणारी एडीपी वेतन व्यवस्थापन, मनुष्यबळ व्यवस्थापन, प्रतिभा, विश्लेषण आणि कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित मानव संसाधन उपाययोजनांमधील आपल्या एकात्मिक कौशल्याच्या माध्यमातून संस्थांना कामाच्या बदलत्या जगाशी जुळवून घेण्यास मदत करत आहे.

ADP विषयी (NASDAQ: ADP)

ADP आपल्या नवोन्मेष आणि कौशल्याच्या माध्यमातून ७५ वर्षांहून अधिक काळ कामाच्या जगाला आकार देत आहे. मानव संसाधन आणि वेतन व्यवस्थापन उपाययोजनांच्या क्षेत्रातील जागतिक आघाडीची संस्था म्हणून ADP आपल्या ग्राहकांसाठी आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांसाठी असलेल्या व्यावसायिक आव्हानांवर सातत्याने उपाय शोधते. लहान व्यवसायांसाठी वापरण्यास सुलभ साधनांपासून ते जागतिक उद्योगांसाठी पूर्णपणे एकात्मिक मंचांपर्यंत विविध प्रकारच्या उपाययोजना ADP उपलब्ध करून देते.

‘लोकांसाठी नेहमीच निर्मिती’ या दृष्टिकोनातून ADP चे लक्ष लोकांवर केंद्रित आहे. आपल्या अतुलनीय कृत्रिम बुद्धिमत्ता-आधारित अंतर्दृष्टी आणि सिद्ध अनुभवाच्या माध्यमातून लोकांना त्यांच्या कामात अधिक यश मिळवून देणाऱ्या नाविन्यपूर्ण उपाययोजना ADP विकसित करते. १४० हून अधिक देशांमधील ११ लाखांहून अधिक ग्राहक आपल्या कर्मचाऱ्यांना सक्षम करण्यासाठी आणि व्यवसायाला पुढे नेण्यासाठी ADP च्या उत्कृष्ट सेवांवर अवलंबून आहेत. मानव संसाधन, प्रतिभा, वेळ व्यवस्थापन, कर्मचारी लाभ, अनुपालन आणि वेतन व्यवस्थापन या क्षेत्रांमध्ये ADP सेवा प्रदान करते. अधिक माहितीसाठी ADP.com ला भेट द्या.

ADP विषयी अधिक माहितीसाठी: in.adp.com

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments