Monday, August 31, 2026
Google search engine
HomeUncategorizedप्रतिबंधित विदेशी मांगूर माशांच्या संवर्धनावर संयुक्त कारवाई* *कालठण नं. १ परिसरातील...

प्रतिबंधित विदेशी मांगूर माशांच्या संवर्धनावर संयुक्त कारवाई* *कालठण नं. १ परिसरातील मांगूर माशांचे साठे नष्ट; संवर्धकांवर गुन्हे दाखल*

*

पुणे, दि. ३१ : जिल्हाधिकारी, पुणे यांनी गठीत केलेल्या समितीच्या पथक सदस्य व कर्मचाऱ्यांनी उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्राजवळ तसेच इंदापूर तालुक्यातील मौजे कालठण नं. १ परिसरात प्रतिबंधित विदेशी मांगूर (Clarias Gariepinus) माशांचे अनधिकृत संवर्धन करणाऱ्यांवर संयुक्त कारवाई केली. यावेळी मांगूर माशांचे साठे नष्ट करण्यात आले.
अनधिकृतपणे मांगूर माशांचे संवर्धन करणाऱ्यांवर भारतीय न्याय संहितेचे कलम २२३, अन्न सुरक्षा व मानके अधिनियम, २००६ मधील कलम ५९ तसेच पर्यावरण (संरक्षण) अधिनियम, १९८६ मधील कलम ३, ५ व १५ अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

मांगूर माशांमुळे मानवी आरोग्यास तसेच जलपरिसंस्थेला धोका निर्माण होऊ शकतो. हे मासे जलाशय किंवा नद्यांमध्ये गेल्यास कटला, रोहू, मृगळ यांसह स्थानिक माशांच्या प्रजातींवर परिणाम होऊन जैवविविधतेला धोका निर्माण होतो. त्यामुळे भारत सरकारच्या कृषी मंत्रालयाने १९ डिसेंबर १९९७ रोजीच्या पत्रान्वये या माशांच्या संवर्धनावर बंदी घातली आहे.

आरोग्य व पर्यावरणास हानिकारक असलेल्या मांगूर माशांचे अनधिकृत संवर्धन करू नये. अशा प्रकारचे संवर्धन आढळल्यास त्याची माहिती acfpune@gmail.com या ई-मेलवर कार्यालयास कळवावी, असे आवाहन सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय, पुणे श्रीमती अर्चना घि. शिंदे यांनी केले आहे.
00000

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments