*
पुणे, दि.३१: डेक्कन, सिंहगड रोड, कोथरूड, स्वारगेट, विश्रामबाग, चंदननगर, येरवडा वाहतूक विभाग अंतर्गत नो पार्किंग झोन जाहीर करण्यात आले असून त्याबाबतचे आदेश पोलीस उप आयुक्त डॉ. संदीप भाजीभाकरे यांनी निर्गमित केले आहेत.
या आदेशान्वये डेक्कन वाहतूक विभाग अंतर्गत आपटे रोड येथील धनराज सोसायटी गेट समोर दोन्ही बाजूस मिळून ५० मीटर, कमला नेहरू पार्कच्या मुख्य गेटच्या समोर दीडशे मीटर, आपटे रोड येथील भाऊसाहेब शेळके पथ मनीषा अपार्टमेंट समोर दोन्ही बाजूस २० मीटर नो पार्किंग झोन करण्यात आला आहे.
*सिंहगड रोड वाहतूक विभाग अंतर्गत नो पार्किंग झोन*
जय श्री आई माता किचन वेअर ते दक्षिणमुखी मारुती मंदिर येथे दोन्ही बाजूस १५ मीटर, नऱ्हे येथील महाराष्ट्र बँक चौकातील मल्हारगड सोसायटीकडे जाणाऱ्या रस्त्यावर २० मीटर नो पार्किंग झोन आहे.
*कोथरूड वाहतूक विभाग अंतर्गत नो पार्किंग झोन*
साम्राज्य बळवंतपुरम सोसायटी गेट नंबर १ व गेट नंबर २ च्या दोन्ही बाजूस भिंतीलगत १० मीटर दरम्यान तसेच मातोश्री आश्रम कडून गिरिजा चौकातून डावीकडील दोन्ही बाजूस २५ मीटर, डीपी रोडवरील पंडित फार्म गेट क्रमांक १ ते ३ दरम्यान रस्त्याचे दोन्ही बाजूस नो पार्किंग करण्यात येत आहे.
*येरवडा वाहतूक विभाग अंतर्गत नो पार्किंग झोन*
विश्रांतवाडी ते एअरपोर्ट या मार्गावर सिद्धेश्वर चौक ते केकाण पेट्रोल पंप पर्यंत रोडच्या डाव्या बाजूस दुचाकी व चारचाकी वाहनांसाठी समांतर पार्किंग करण्यात येत आहे. तसेच ५०९ चौकाकडून विश्रांतवाडीकडे जाणाऱ्या सिद्धेश्वर चौक पर्यंत रस्त्याच्या डाव्या बाजूस सर्व प्रकारच्या वाहनांसाठी नो पार्किंग करण्यात येत आहे.
*चंदननगर वाहतूक विभाग अंतर्गत नो पार्किंग झोन*
चंदननगर वाहतूक विभाग अंतर्गत गंगा अल्टस सोसायटी समोरील रस्त्यावर डाव्या बाजूस १०० मीटर व उजव्या बाजूस ५० मीटर नो पार्किंग झोन करण्यात येत आहे. विश्रामबाग वाहतूक विभाग अंतर्गत मौजे गोपाळ गायन समाज बिल्डिंग व लिमये होम या दोन्ही इमारती समोरील रस्त्यावर दोन्ही बाजूस १५ मीटर, राधा स्वामी सत्संग ते नाबार्ड सोसायटी रस्त्याच्या दोन्ही बाजूस पी-१ पी-२ पार्किंग करण्यात येत आहे. याबाबत नागरिकांनी काही सूचना असल्यास १३ सप्टेंबर २०२६ पर्यंत लेखी स्वरूपात कळवाव्यात, असे आवाहन डॉ. भाजीभाकरे यांनी केले आहे.
०००००


