Tuesday, September 1, 2026
Google search engine
HomeUncategorizedएमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे स्पष्टीकरण

एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे स्पष्टीकरण

एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी सदैव विद्यार्थी हित जोपासत आलेले आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाऊ नये यासाठी या वर्षी विशेष परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते. यासंदर्भात पालक आणि विद्यार्थ्यांशी प्रशासनाने वेळोवेळी संवाद साधला होता.

विशेष परीक्षेमध्ये काही विद्यार्थी उत्तीर्ण झाले. परंतु जे विद्यार्थी या परीक्षेत उत्तीर्ण झाले नाहीत, त्यांना बाहेरच्या काही संघटनेने एमआयटी प्रशासनाच्या विरोधात भडकवण्याचे काम केले, जे अतिशय निंदनीय आहे.

आज विद्यापीठात घडलेल्या घटनेत विद्यार्थी आणि प्राध्यापक यांच्यात कोणताही वाद झाला नव्हता. सोशल मीडियावर ज्या पद्धतीने विद्यापीठाच्या विरोधातील क्लिप्स प्रसारित झाल्या, त्या अतिशय चुकीच्या आहेत. यामधून विद्यापीठाची बदनामी केली जात आहे. घटनेमध्ये संबंधित संघटनेच्याच काही कार्यकर्त्यांनी प्रशासनाच्या काही अधिकाऱ्यांवर हात उगारला आहे. यात विद्यार्थ्यांचा आणि शिक्षकांचा कसलाही सहभाग नाही.

आज घडलेली घटना अवांछित, अनधिकृत आणि बेकायदेशीर आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments