१९ डिसेंबर २०२३ – भारतातील शहरीकरण आणि शाश्वत गतीशीलतेवरील वाढत्या फोकससह शुद्ध परिवहन पर्यायांचा अवलंब महत्त्वाचे बनले आहे. देश इलेक्ट्रिक आणि हायड्रोजन सेल-आधारित वेईकल्सच्या दिशेने वाटचाल करत असताना उत्सर्जन कमी करण्यासाठी अंतरिम उपायाची नितांत गरज आहे. यासाठी ‘ट्रान्झिशन फ्यूएल’ म्हणून ओळखले जाणारे नॅचरल गॅस अत्यंत उपयुक्त आहे. टाटा मोटर्स ही भारतातील आघाडीची ऑटोमोबाइल कंपनी नॅचरल गॅस-पॉवर्ड वेईकल्सच्या विकासाप्रती सक्रियपणे योगदान देत आहे. आपले कौशल्य आणि नाविन्यतेप्रती कटिबद्धतेचा लाभ घेत टाटा मोटर्स भारतातील शाश्वत परिवहनाप्रती परिवर्तनाला आकार देण्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावत आहे.
नीति आयोगाच्या अहवालाच्या मते, २०५० पर्यंत भारतातील रस्त्यांवरील ट्रक्सच्या संख्येत चौपट वाढ होण्याचा अंदाज आहे, ज्यामधून नॅचरल गॅस-आधारित इंधनांच्या दिशेने परिवर्तनाची गरज दिसून येते. हे परिवर्तन पर्यावरण, सार्वजनिक आरोग्य आणि व्यावसायिक वाहन उद्योगामधील आर्थिक स्थिरतेसाठी महत्त्वाचे आहे. उत्सर्जनामध्ये कपात व ऊर्जा सुरक्षिततेप्रती कटिबद्ध असलेला भारत सक्रियपणे कम्प्रेस्ड नॅचरल गॅस (सीएनजी) ला चालना देत आहे. सीएनजीमधून आर्थिक फायदे मिळण्यासह भारतातील क्रूड ऑईल आयातीचा खर्च कमी होईल. नाविन्यता व शाश्वत परिवहन सोल्यूशन्सप्रती समर्पित टाटा मोटर्स अधिक पर्यावरणदृष्ट्या अनुकूल व कार्यक्षम परिवहन सिस्टमप्रती भारताच्या महत्त्वाकांक्षांशी बांधील राहत व्यावसायिक वाहन क्षेत्रात सीएनजीच्या अवलंबतेला गती देण्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावते. अहवालानुसार, महाराष्ट्रात 750 हून अधिक सीएनजी स्टेशन आहेत, जे स्वच्छ इंधन पर्यायांच्या व्यापक उपलब्धतेमध्ये योगदान देतात.
भारत या परिवर्तनाला पाठिंबा देण्यासाठी आपल्या नॅचरल गॅस पायाभूत सुविधेमध्ये धोरणात्मक गुंतवणूक करत आहे, तसेच २०३० पर्यंत १७,००० कार्यरत सीएनजी स्टेशन्सची योजना आहे. गॅस ग्रिड, अतिरिक्त एलएनजी टर्मिनल्स आणि बायो-सीएनजीसाठी SATAT योजना यांसारख्या राष्ट्रीय उपक्रमांचा मोठ्या प्रमाणात नॅचरल गॅस उपलब्ध करून देण्याचा मनसुबा आहे. नवीन नॅचरल गॅस किंमत यंत्रणेप्रती सरकारच्या मान्यतेमुळे पेट्रोल व डिझेलच्या तुलनेत सीएनजी किफायतशीरपणामध्ये अधिक वाढ होत आहे, जे भारतातील शाश्वत परिवहन प्रवासामधील मोठे पाऊल आहे.
टाटा मोटर्सच्या ट्रक्स विभागाचे उपाध्यक्ष व व्यवसाय प्रमुख श्री. राजेश कौल म्हणाले, ”टाटा मोटर्समध्ये आम्ही शाश्वत इंधनांच्या परिवर्तनामध्ये अग्रस्थानी आहोत. आमची सीएनजी-पॉवर्ड व्यावसायिक वाहनांची व्यापक श्रेणी आणि २०४५ पर्यंत नेट झीरो एमिशन्स संपादित करण्याप्रती आमच्या कटिबद्धतेसह आम्ही शाश्वत लॉजिस्टिक्सचे नेतृत्व करत आहोत. ऑटो एक्स्पो २०२३ येथे आमच्या नॅचरल गॅस, इलेक्ट्रिक व हायड्रोजन पर्यायांच्या प्रदर्शनामधून परिवहनाच्या उज्ज्वल भविष्याला आकार देण्याप्रती आमची कटिबद्धता दिसून येते. अनुकूल कार्यसंचालन खर्च व वाढत्या उपलब्धतेमुळे सीएनजी-पॉवर्ड वाहनांसाठी मागणी वाढत असताना आम्हाला विश्वास आहे की, नॅचरल गॅस उद्योगाच्या शून्य-उत्सर्जन वाहनांच्या दिशेने प्रवासात महत्त्वाची भूमिका बजावेल. सहयोगाने, आम्ही हरित व अधिक कार्यक्षम भविष्याच्या दिशेने वाटचाल करत आहोत.”


