Thursday, September 3, 2026
Google search engine
HomeUncategorizedविशेष मतदार यादी पुनरिक्षणासाठी पुणे विभागात ‘मतदार यादी निरीक्षक' तथा विभागीय आयुक्त...

विशेष मतदार यादी पुनरिक्षणासाठी पुणे विभागात ‘मतदार यादी निरीक्षक’ तथा विभागीय आयुक्त यांचे जिल्हानिहाय दौरे*

 

 

 

पुणे, दि. ३ : भारत निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार पुणे महसूल विभागातील पाच जिल्ह्यांसाठी विभागीय आयुक्त शीतल तेली- उगले यांची ‘मतदार यादी निरीक्षक’ (Electoral Roll Observer) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. विशेष सखोल पुनरिक्षण २०२६ अंतर्गत दावे व हरकती स्वीकारण्याच्या टप्प्यात मतदार यादी निरीक्षक श्रीमती शीतल तेली यांचे मंगळवार दिनांक ८ ते १० सप्टेंबर या कालावधीत जिल्हानिहाय दौरे आयोजित करण्यात आले आहेत.

 

 

 

निरीक्षकांच्या दौऱ्याच्या एक दिवस आधी संबंधित जिल्ह्याचे नोडल अधिकारी जिल्ह्यास भेट देऊन प्राथमिक तपासणी व पूर्वतयारीचा आढावा घेणार आहेत. त्यानुसार नोडल अधिकारी व मतदार यादी निरीक्षक यांच्या प्रथम भेटीचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.

 

 

दौरा कार्यक्रमानुसार

मतदार यादी निरीक्षक तथा विभागीय आयुक्त सोलापूर येथे सकाळच्या सत्रात व सांगली येथे दुपारच्या सत्रात ८ सप्टेंबर रोजी, कोल्हापूर येथे सकाळच्या सत्रात व सातारा दुपारच्या सत्रात ९ सप्टेंबर रोजी व पुणे येथे १० सप्टेंबर रोजी आढावा घेतील.

 

 

नोडल अधिकाऱ्यांनी निरीक्षकांच्या भेटीपूर्वी संबंधित जिल्ह्यात उपस्थित राहून भारत निवडणूक आयोगाने दिलेल्या पहिल्या भेटीच्या चेकलिस्टनुसार सर्व बाबींची पडताळणी करावी, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

 

यामध्ये मतदान नोंदणी अधिकारी, सहायक मतदान नोंदणी अधिकारी तसेच मतदान केंद्रस्तरीय अधिकारी पदांची उपलब्धता, दावे-हरकती अर्जांची स्थिती तसेच स्वीप उपक्रम आदींची माहिती अद्ययावत असल्याची खात्री करावी.

 

 

 

मतदार यादी निरीक्षकांच्या दौऱ्यादरम्यान जिल्ह्यातील विद्यमान खासदार, आमदार आणि मान्यताप्राप्त राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींची विशेष बैठक आयोजित करण्यात यावी. तसेच सर्व संबंधित निवडणूक अधिकारी यांची आढावा बैठक घेण्यात येणार आहे.मतदारसंघातील काही मतदान केंद्रांना (Polling Stations) प्रत्यक्ष भेट देऊन कामाचा तसेच फॉर्म वितरणाचा आढावा घेण्यात येणार आहे.

 

 

याशिवाय भारत निवडणूक आयोगाने निर्धारित केलेल्या यादीनुसार आवश्यक सांख्यिकी माहिती तयार ठेवून निरीक्षकांच्या भेटीवेळी सादर करावी. सर्व जिल्हाधिकारी व नोडल अधिकाऱ्यांनी निर्धारित वेळापत्रकाची नोंद घेऊन संबंधित निर्देशांनुसार तात्काळ कार्यवाही करावी, अशा सूचना सह आयुक्त तुषार ठोंबरे यांनी दिल्या आहेत.

 

०००

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments