Saturday, September 5, 2026
Google search engine
HomeUncategorizedकारगिल युद्धातील शौर्यपूर्ण नेतृत्वासाठी बीरेंद्र सिंह धनोआ यांना ‘थोरले बाजीराव पेशवे शौर्य...

कारगिल युद्धातील शौर्यपूर्ण नेतृत्वासाठी बीरेंद्र सिंह धनोआ यांना ‘थोरले बाजीराव पेशवे शौर्य पुरस्कार’ जाहीर राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांच्या हस्ते ९ सप्टेंबर रोजी पुरस्कार प्रदान सोहळा

पुणे : थोरले बाजीराव पेशवे यांच्या ३२६व्या जयंतीनिमित्त थोरले बाजीराव पेशवे प्रतिष्ठानच्या वतीने देण्यात येणारा ‘थोरले बाजीराव पेशवे शौर्य पुरस्कार २०२६’ एअर चीफ मार्शल बीरेंद्र सिंह धनोआ यांना जाहीर झाला आहे. राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांच्या हस्ते बुधवार, दिनांक ९ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता कोथरूड येथील बाल शिक्षण मंदिर, मएसो सभागृहात पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे, अशी माहिती प्रतिष्ठानचे सचिव कुंदनकुमार साठे यांनी दिली.

 

या कार्यक्रमासाठी एअर मार्शल (निवृत्त) भूषण गोखले, पेशव्यांचे वंशज पुष्करसिंह पेशवा आणि बेलराईज इंडस्ट्रीज लिमिटेडच्या कार्यकारी संचालिका सुप्रिया बडवे, प्रमुख वक्ते डॉ. आदित्य अभ्यंकर यांची उपस्थिती राहणार आहे.

 

बीरेंद्र सिंह धनोआ यांनी जून १९७८ मध्ये भारतीय वायुदलाच्या लढाऊ वैमानिक दलात कारकीर्दीस सुरुवात केली. मिग-२१, जग्वार, मिग-२९ आणि सुखोई-३० एमकेआय यांसह विविध लढाऊ विमानांचे त्यांनी उड्डाण केले असून, तीन हजारांहून अधिक तासांचा उड्डाणाचा अनुभव आहे. ते ‘अ’ श्रेणीचे उड्डाण प्रशिक्षक होते.

 

१९९९च्या कारगिल युद्धात धनोआ हे मिग-२१ लढाऊ विमानांच्या अग्रभागी तैनात असलेल्या हल्लेखोर लढाऊ विमानांच्या पथकाचे प्रमुख होते. त्यांच्या नेतृत्वाखाली डोंगराळ प्रदेशात दिवस-रात्र हवाई हल्ल्यांच्या मोहिमा राबविण्यात आल्या. या शौर्यपूर्ण नेतृत्वासाठी त्यांना युद्ध सेवा पदक आणि वायू सेना पदकाने गौरविण्यात आले.

 

वायुदलातील प्रदीर्घ कारकीर्दीत त्यांनी लढाऊ हवाई कारवाया, युद्धनियोजन, गुप्तचर विभाग तसेच पूर्व, पश्चिम आणि दक्षिण-पश्चिम वायुदल कमांडमध्ये महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळल्या. ते वायुदलाचे उपप्रमुखही होते.

 

१ जानेवारी २०१७ रोजी त्यांनी भारतीय वायुदलाचे २२वे प्रमुख म्हणून पदभार स्वीकारला. ३० सप्टेंबर २०१९पर्यंत त्यांनी ही जबाबदारी सांभाळली. त्यांच्या कार्यकाळात फेब्रुवारी २०१९मध्ये बालाकोट येथे हवाई कारवाई करण्यात आली. मे २०१९मध्ये त्यांनी तिन्ही संरक्षण दलांच्या प्रमुखांच्या समितीचे अध्यक्षपदही स्वीकारले.

 

धनोआ यांना परम विशिष्ट सेवा पदक, अति विशिष्ट सेवा पदक, युद्ध सेवा पदक आणि वायू सेना पदक अशा विविध सन्मानांनी गौरविण्यात आले आहे. लढाऊ वैमानिकापासून वायुदल प्रमुखापर्यंत विविध महत्त्वाच्या जबाबदाऱ्या पार पाडलेली त्यांची कारकीर्द शौर्य आणि नेतृत्वासाठी उल्लेखनी

य ठरली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments