पुणे : परिवहन विभागाच्या नावाने ड्रायव्हिंग लायसन्स, वाहन नोंदणी, ई-चलन आदी सेवांसाठी बनावट संकेतस्थळे, अनधिकृत APK अॅप्स तसेच SMS/WhatsApp द्वारे पाठविल्या जाणाऱ्या खोट्या लिंकच्या माध्यमातून नागरिकांची आर्थिक फसवणूक व वैयक्तिक माहितीची चोरी होत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे वाहन चालक व मालकांनी केवळ परिवहन विभागाच्या अधिकृत संकेतस्थळांचाच वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
वाहन नोंदणीसाठी VAHAN (https://vahan.parivahan.gov.in, ड्रायव्हिंग लायसन्ससाठी SARATHI (https://sarathi.parivahan.gov.in, परिवहन सेवांसाठी Parivahan (https://www.parivahan.gov.inआणि ई-चलानसाठी NextGen eChallan (https://echallan.parivahan.nic.in/challan या अधिकृत संकेतस्थळांचा वापर करावा.
RTO कार्यालय किंवा परिवहन विभागाकडून WhatsApp द्वारे पेमेंट लिंक पाठविली जात नाही. “दंड त्वरित भरा”, “DL सस्पेंड होणार आहे” अशा धमकीवजा संदेशांतील लिंकवर क्लिक करू नये. RTO Services.apk, Parivahan_Update.apk, eChalan Pay.apk यांसारखे अनधिकृत APK डाउनलोड करू नयेत.
संशयास्पद संदेश किंवा लिंक प्राप्त झाल्यास नॅशलल सायबर क्राईम पोर्टल https://www.cybercrime.gov.in वर तक्रार करावी किंवा सायबर फसवणूक हेल्पलाइन १९३० वर संपर्क साधावा. तसेच जवळच्या जिल्हा सायबर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवावी.
0000


