Thursday, September 10, 2026
Google search engine
HomeUncategorizedपुण्यात राष्ट्रीय काँक्रीट दिन व अभियंता दिन सोहळ्या निमित्त आयोजित प्रदर्शनाचा ...

पुण्यात राष्ट्रीय काँक्रीट दिन व अभियंता दिन सोहळ्या निमित्त आयोजित प्रदर्शनाचा शुभारंभ शंभरहून अधिक कॉलेजचा समावेश, विध्यार्थ्यानी सादर केले विविध प्रोजेक्ट प्रदर्शनात ३,००० हून अधिक विद्यार्थी, अभियंते, उद्योग प्रतिनिधी आणि राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय कंपन्यांचा उत्स्फूर्त सहभाग

पुणे, : राष्ट्रीय काँक्रीट दिन व अभियंता दिनानिमित्त आयोजित दोन दिवसीय प्रदर्शन आणि सोहळा २०२६ चा आज अनंतराव पवार कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड रिसर्च (APCOER), पर्वती, पुणे येथे उत्साहपूर्ण वातावरणात शुभारंभ झाला. या दोन दिवसीय भव्य कार्यक्रमास ३,००० हून अधिक विद्यार्थी, व्यावसायिक अभियंते, उद्योग प्रतिनिधी, प्रदर्शक, प्रायोजक आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली.

या वर्षीच्या सोहळ्याची “काँक्रीटमधील नवकल्पनांच्या माध्यमातून शाश्वत भारताची उभारणी” संकल्पना आहे असून या कार्यक्रमाच्या उद्घाटन समारंभास श्रीमती प्रमिला गायकवाड, सरचिटणीस, ABMSP, पुणे या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. तसेच डॉ. हनुमंत धुमाळ, कार्यकारी संचालक, MKVDC, जलसंपदा विभाग, महाराष्ट्र शासन, डॉ. सौ. सुषमा कुलकर्णी, Principal Advisor, MIT-WPU, श्री. धैर्यशील वांडेकर, खजिनदार, ABMSP, पुणे, अॅड. भगवानराव साळुंखे, खजिनदार, ABMSP, पुणे, श्री. प्रदीप वाल्हेकर, अध्यक्ष, पुणे RMC असोसिएशन, अभियंता युसूफ ए. एस. इनामदार, प्रमुख संयोजक, राष्ट्रीय काँक्रीट दिन कार्यक्रम डॉ. सचिन काटे, सचिव, पुणे RMC असोसिएशन तसेच ICI, IGS, MBVA आणि इतर अनेक व्यावसायिक, शैक्षणिक व उद्योग संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

काँक्रीटची गरज पाहता ग्रीन काँक्रीट सह विविध काँक्रीटच्या प्रात्यक्षितचा अनुभव विध्यार्थ्यांना भेटावं याच उद्देशाने या दोन दिवसीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच या वेळी प्रोजेक्टची स्पर्धा ही आयोजित घेण्यात आली आहे . इंगीनीरिंग करीत असेलेल्या विध्यार्थ्यांच्या कौशल्यास वाव मिळावे म्हणून या परिषदेचे उद्देश आहे.

 

 

सरकार, शिक्षण क्षेत्र, व्यावसायिक संस्था आणि बांधकाम उद्योगातील मान्यवरांची उपस्थिती ही काँक्रीट तंत्रज्ञान, शाश्वत बांधकाम आणि भारताच्या पायाभूत विकासासाठी सर्व संबंधित घटकांना एका व्यासपीठावर आणण्याच्या या उपक्रमाचे महत्त्व अधोरेखित करणारी ठरली.

३,००० हून अधिक विद्यार्थ्यांचा सहभाग

या सोहळ्याचे प्रमुख आकर्षण म्हणजे ३,००० हून अधिक अभियांत्रिकी विद्यार्थ्यांचा सहभाग. विद्यार्थ्यांना उद्योग क्षेत्रातील तज्ज्ञ, अभियंते, तंत्रज्ञान कंपन्या आणि वरिष्ठ व्यावसायिकांशी थेट संवाद साधण्याची संधी या माध्यमातून मिळाली आहे.

कार्यक्रमामध्ये विविध तांत्रिक स्पर्धा, तांत्रिक परिसंवाद, ज्ञानविनिमय सत्रे आणि उद्योग–विद्यार्थी संवाद आयोजित करण्यात आले आहेत. यामुळे विद्यार्थ्यांना शैक्षणिक ज्ञानासोबतच प्रत्यक्ष उद्योगातील तंत्रज्ञान, प्रक्रिया आणि नव्या संधींची माहिती मिळत आहे.

काँक्रीट तंत्रज्ञान, बांधकाम, पायाभूत सुविधा, यंत्रसामग्री, डिजिटल तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता, स्ट्रक्चरल इंजिनिअरिंग आणि सुरक्षितता यांसारख्या आधुनिक विषयांवरही या कार्यक्रमातून मार्गदर्शन केले आहे.

 

भव्य बांधकाम व पायाभूत सुविधा प्रदर्शन चे उद्घाटन

उद्घाटन समारंभानंतर मान्यवरांच्या हस्ते Construction & Infrastructure Exhibition चे प्रदर्शनस्थळी फित कापून औपचारिक उद्घाटन करण्यात आले.

या भव्य प्रदर्शनामध्ये भारतातील तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरील नामांकित कंपन्या सहभागी झाल्या असून, बांधकाम व पायाभूत सुविधा क्षेत्रातील अत्याधुनिक उत्पादने, यंत्रसामग्री, उपकरणे, तंत्रज्ञान आणि विविध नाविन्यपूर्ण उपाययोजनांचे प्रदर्शन करण्यात येत आहे.

प्रदर्शनामध्ये विशेषतः :

* रेडी-मिक्स काँक्रीट व काँक्रीट तंत्रज्ञान

* बांधकाम यंत्रसामग्री व उपकरणे

* काँक्रीट पंप व बॅचिंग सोल्युशन्स

* बांधकाम रसायने

* विद्युत व अत्याधुनिक बांधकाम उपकरणे

* शाश्वत बांधकाम तंत्रज्ञान

* संरचनात्मक अभियांत्रिकी व सुरक्षितता

* विनाशविरहित चाचणी (NDT)

* डिजिटल बांधकाम व कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) तंत्रज्ञान

* पायाभूत सुविधा विकासासाठी उपाययोजना

यांसह विविध अत्याधुनिक तंत्रज्ञानांचे प्रदर्शन व प्रात्यक्षिके आयोजित करण्यात आली आहेत.

राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय कंपन्यांच्या सहभागामुळे हे प्रदर्शन उद्योग–शिक्षण–व्यावसायिक क्षेत्रातील संवाद, तंत्रज्ञानाची देवाणघेवाण आणि नवीन व्यावसायिक संधी निर्माण करणारे महत्त्वपूर्ण व्यासपीठ ठरत आहे.

 

सरकार, उद्योग, शिक्षण आणि अभियंता क्षेत्र एकाच व्यासपीठावर

राष्ट्रीय काँक्रीट दिन व अभियंता दिन सोहळा २०२६ चा मुख्य उद्देश शासकीय यंत्रणा, अभियंते, RMC उत्पादक, कंत्राटदार, विकासक, वास्तुविशारद, सल्लागार, उत्पादक, तंत्रज्ञान कंपन्या, शैक्षणिक संस्था आणि विद्यार्थी यांना एकत्र आणून ज्ञान, तंत्रज्ञान आणि अनुभवांची देवाणघेवाण करण्यासाठी प्रभावी व्यासपीठ उपलब्ध करून देणे हा आहे.

भारताच्या वेगाने विकसित होत असलेल्या पायाभूत सुविधा क्षेत्रासाठी शाश्वत, गुणवत्तापूर्ण, सुरक्षित आणि तंत्रज्ञानाधारित बांधकाम पद्धतींची गरज लक्षात घेऊन या कार्यक्रमामध्ये नवकल्पना, तंत्रज्ञान आणि कौशल्य विकासावर विशेष भर देण्यात आला आहे.

आयोजकांच्या मते, राष्ट्रीय काँक्रीट दिन हा केवळ एक उत्सव नसून, भारताच्या पायाभूत विकासासाठी अधिक सक्षम, तंत्रज्ञानाधारित आणि शाश्वत बांधकाम परिसंस्था निर्माण करण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण उपक्रम आहे.

राष्ट्रीय काँक्रीट दिन व अभियंता दिन सोहळा २०२६ हा कार्यक्रम ११ सप्टेंबर २०२६ रोजीही सुरू राहणार असून, तांत्रिक सत्रे, विद्यार्थ्यांच्या स्पर्धा, प्रदर्शन, उद्योग संवाद, पारितोषिक वितरण आणि समारोप समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments