Friday, September 11, 2026
Google search engine
HomeUncategorizedभारताच्या नेक्स्ट-जेन स्पेस इनोव्हेटर्सची जडणघडण : ला फाउंडेशन डसॉल्ट सिस्टीम्स, इंडियाच्या पुण्यातील...

भारताच्या नेक्स्ट-जेन स्पेस इनोव्हेटर्सची जडणघडण : ला फाउंडेशन डसॉल्ट सिस्टीम्स, इंडियाच्या पुण्यातील नवीन एरोस्पेस स्कूल उपक्रमाचा समारोप

माय फर्स्ट एरोस्पेस प्रोग्रॅम” हा अनेक शहरांमध्ये राबवला जाणारा एक स्टेम (STEM) उपक्रम आहे; बेंगळुरू, चेन्नई, गुरुग्राम आणि पुणे येथील 150 शालेय विद्यार्थ्यांना रॉकेट्स, क्यूबसॅट्स

(CubeSats) आणि रोव्हर्स यांची रचना, चाचणी, निर्मिती तसेच प्रक्षेपण करण्यास सक्षम करण्यासाठी हा उपक्रम त्यांना प्रेरित करतो.

 

 

 

पुणे / बेंगळुरू — 10 सप्टेंबर 2026— ला फाऊंडेशन डसॉल्ट सिस्टिम्स, इंडियाने आज त्यांच्या “माय फर्स्ट एरोस्पेस प्रोग्राम” या महत्त्वपूर्ण STEM उपक्रमाच्या अंतिम टप्प्याची घोषणा केली; या उपक्रमाची सांगता पुण्यात होत आहे. तरुण पिढीला घडवण्यासाठी आणि अंतराळ क्षेत्राबाबत तसेच त्यासंबंधीच्या वाढत्या शैक्षणिक संधींविषयी त्यांच्यात कुतूहल जागृत करण्यासाठी हा उपक्रम आखण्यात आला होता. अनेक शहरांमध्ये राबवल्या गेलेल्या या उपक्रमाने बेंगळुरू, चेन्नई, गुरुग्राम आणि पुणे या चार प्रमुख तंत्रज्ञान केंद्रांमधील 13 ते 16 वयोगटातील 150 शालेय विद्यार्थ्यांना प्रेरित केले आहे.

 

 

 

 

 

अंतराळ क्षेत्रात कार्यरत असलेली सोसायटी फॉर स्पेस एज्युकेशन रिसर्च अँड डेव्हलपमेंट (SSERD) या ना-नफा तत्त्वावर चालणाऱ्या संस्थेच्या सहकार्याने ला फाऊंडेशन डसॉल्ट सिस्टिम्स, इंडिया

हा उपक्रम राबवते आहे.

 

 

 

 

 

संपूर्ण भारतात हा उपक्रम एक अनुभवात्मक शैक्षणिक मार्ग उपलब्ध करून देतो, जो विद्यार्थ्यांना एका नियोजनबद्ध मार्गाने मार्गदर्शन करतो. डसॉल्ट सिस्टेम्सच्या कुशल स्वयंसेवकांच्या मदतीने,

मूलभूत STEM संकल्पना समजून घेण्यापासून ते त्यांच्या कल्पनांना मूर्त रूप देण्यासाठी 3D तंत्रज्ञानाचा वापर करण्यापर्यंत सहभागी प्रगती करतात.

 

 

 

 

 

प्रत्यक्ष कृतीतून शिकणे आणि आभासी पडताळणी यांचा मेळ घालून, विद्यार्थी रॉकेटरी, उपग्रह आणि रोव्हरशी संबंधित संपूर्ण उपक्रमांद्वारे महत्त्वपूर्ण समस्या-निवारण, सर्जनशीलता आणि सहयोगी

अभियांत्रिकी कौशल्ये विकसित करतात. हा उपक्रम म्हणजे ला फॉन्डेशन डसॉल्ट सिस्टेम्सचा पाया आहे. ही भारतातील एक व्यापक शैक्षणिक परिसंस्था असून, ती भारतातील विकसित होत असलेल्या अवकाश परिसंस्थेमध्ये प्राथमिक शालेय शिक्षणाला उच्च-स्तरीय उद्योग सज्जता कार्यक्रमांशी

जोडण्यासाठी तयार करण्यात आली आहे.

 

 

 

 

 

“विज्ञान आणि अभियांत्रिकीमधील जिज्ञासेचे सुरुवातीपासून संगोपन करणे हे अंतराळ क्षेत्रात भारताची प्रगती टिकवून ठेवण्यासाठी अत्यावश्यक आहे. कनेक्टनेक्स्ट-इंडस्ट्री रेडीनेस फॉर स्पेस

आणि क्यूबसॅट डिझाइन अँड डेव्हलपमेंट अशा विद्यापीठाच्या उपक्रमांशी शालेय शिक्षणाला जोडून, आम्ही विविध शाखांमधील विद्यार्थी आणि शिक्षकांना देशाच्या अंतराळविषयक महत्त्वाकांक्षांमध्ये सक्रियपणे योगदान देण्यासाठी सक्षम करत आहोत,” असे

ला फाँडेशन डसॉल्ट सिस्टेम्स, इंडियाच्या संचालक मंडळाचे अध्यक्ष सुदर्शन मोगासाले म्हणाले.

 

 

 

 

 

“भारताचे अंतराळातील भविष्य हे शालेय वर्गांमध्येच घडवले जाईल, यावर आमचा विश्वास आहे. ‘माय फर्स्ट एरोस्पेस प्रोग्राम’ हे सिद्ध करतो की, जेव्हा आपण १३ वर्षांच्या मुलाला रॉकेट किंवा

क्यूबसॅट बनवण्याची साधने देतो, तेव्हा आपण केवळ STEM शिकवत नाही, तर आपण त्यांच्या करिअरला चालना देत असतो. तसेच त्यांना शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करण्यासाठी एक प्रबळ प्रेरणा देतो. त्याच वेळी, आपण कौशल्ये विकसित करत आहोत आणि न्यूस्पेस इंडियासाठी प्रतिभावान

मनुष्यबळ तयार करत आहोत,” असे सोसायटी फॉर स्पेस एज्युकेशन, रिसर्च अँड डेव्हलपमेंटच्या (एसएसईआरडी) सह-संस्थापक आणि विश्वस्त निखिता चड्डे म्हणाल्या.

 

 

 

 

 

शालेय शिक्षणापलीकडे, ला फाँडेशन डसॉल्ट सिस्टेम्स, अवकाश क्षेत्रात उच्च शिक्षणाचा सहभाग अधिक दृढ करत आहे. आपल्या कनेक्टनेक्स्ट-इंडस्ट्री रेडीनेस फॉर स्पेस या कार्यक्रमाचा एक भाग म्हणून,

ही संस्था तांत्रिक प्रशिक्षण आणि मार्गदर्शनाद्वारे पदवीपूर्व विद्यार्थी आणि शिक्षकांना राष्ट्रीय कॅनसॅट व मॉडेल रॉकेट्री स्पर्धांमध्ये सहभागी होण्यास सक्षम करते. तसेच, ही संस्था पदवीपूर्व विद्यार्थ्यांना व्हर्च्युअल ट्विन तंत्रज्ञानाचा वापर करून अवकाश मोहिमांचे

अभियांत्रिकी आणि क्यूबसॅट्सची रचना करण्यासाठी भविष्यासाठी आवश्यक कौशल्ये प्रदान करते.

 

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments