पुणे, दि. ११: पुणे पिंपरी चिंचवड व बारामती कार्यक्षेत्रातील ऑटोरिक्षांकरिता एक सप्टेंबर पासून भाडे दरवाढ लागू करण्यात आलेली आहे. या अनुषंगाने कॅलिब्रेशन झालेल्या ऑटो रिक्षांची मीटर तपासणी शनिवार दिनांक १२ सप्टेंबर रोजी सकाळी ८ ते ४ या वेळेत अलंकार पोलीस स्टेशनसमोर, कर्वेनगर येथे होणार असल्याची माहिती प्रादेशिक परिवहन कार्यालयाने कळवली आहे.
००००


