पुणे : श्रीयश एज्युकेशन फाउंडेशन व मुत्काई सोशल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने पर्यावरण दिन व शिक्षक दिनाचे औचित्य साधून विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा राज्यस्तरीय सन्मान सोहळा २०२६ आयोजित करण्यात आला आहे.
हा सोहळा मंगळवार, २२ सप्टेंबर २०२६ रोजी सायंकाळी ४.३० वाजता एस. एम. जोशी सभागृह, श्रमिक पत्रकार भवन शेजारी, गांजवे चौक, नवी पेठ, पुणे येथे होणार आहे.
कार्यक्रमास उद्योगपती व समाजसेवक उत्तमराव शिंदे सरकार, अभिनेते देव गिल, माईंड पावर ट्रेनर दत्ता कोहितकर, डस्टोन इंजिनिअर वर्क प्रा. लि.च्या संचालिका वर्षा राजेंद्र वेधीकर, यशस्विनी विकास प्रतिष्ठानच्या अध्यक्षा सुनीता राजाराम डांगे तसेच कामगार नेते मुंबईचे उमेश शिंदे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष मा. श्री. एस. एस. सावंत सर असून, मुख्य आयोजक म्हणून सुप्रिया एस. सावंत व प्रमोद गोळे यांचे योगदान आहे.
विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा राज्यस्तरीय सन्मान करण्यात येणार असून, सामाजिक व पर्यावरणविषयक कार्याला प्रोत्साहन देण्याचा या उपक्रमाचा उद्देश आहे.


