पुणे – एस एम जोशी पुलावरील गणपती विसर्जन घाटावर असलेल्या फलकावरील छत्रपती शिवाजी महाराज आणि लोकमान्य टिळक यांची चित्रे जीर्ण झाली असून ती तातडीने बदलावी अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे प्रदेश प्रवक्ते संदीप खर्डेकर यांनी पुण्याचे मनपा आयुक्त नवल किशोर राम यांच्याकडे केली आहे.याविषयी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की आत्ता एस एम जोशी पुलावरून पत्रकार संघाकडे येताना एक अत्यंत दुर्दैवी आणि दुःखद दृश्य दिसलगणरायाच्या स्वागतासाठी जसं संपूर्ण शहर सजलंय तसंच दीड दिवसाच्या बाप्पा पासून शेवटच्या दिवसापर्यंत म्हणजेच अनंत चतुर्दशी पर्यंत “बाप्पा” ला निरोप देण्यासाठी विसर्जन घाट ही सजलेत. मस्त रंगरंगोटी, फ्लेक्स इ ने घाटांना नव झळाळी प्राप्त झालीये.
मात्र एस. एम जोशी पुलावरील विसर्जन घाटाच्या फलकावरील छत्रपती शिवाजी महाराज आणि लोकमान्य बाल गंगाधर टिळक यांचे चित्र मात्र जीर्ण शिर्ण अवस्थेत आहे हे बहुधा प्रशासनाच्या कार्यक्षम अधिकाऱ्यांच्या नजरेतून सुटलेले दिसतंय.
कृपया त्वरित ह्या फलकावरील चित्र बदलावेत अशी आग्रही मागणी करत आहे.


