महाराष्ट्राचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री आणि पुणे फेस्टिव्हल अॅडवाइजरी कमिटीचे चेअरमन चंद्रकांतदादा पाटील व सौ. अंजली चंद्रकांतदादा पाटील यांनी आज पुणे फेस्टिव्हलच्या श्रींचे दर्शन घेऊन श्रद्धापूर्वक आरती केली. याप्रसंगी पुणे फेस्टिव्हलचे अध्यक्ष कृष्णकुमार गोयल, जनरल सेक्रेटरी व सांस्कृतिक कार्यक्रम मुख्य संयोजक डॉ. सतीश देसाई व प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.


