Friday, September 18, 2026
Google search engine
HomeUncategorizedटी. आर. इंगळे स्मृती स्पर्धेत धनश्री सोनवणे, जोआना डेळके, इकरा शेख आणि...

टी. आर. इंगळे स्मृती स्पर्धेत धनश्री सोनवणे, जोआना डेळके, इकरा शेख आणि सोनाली काकडे प्रथम कै. डॉ. टी. आर. इंगळे स्मृती राष्ट्रीय व्याख्यान व पोस्टर सादरीकरण स्पर्धेचा समारोप

पुणे : सर परशुरामभाऊ महाविद्यालयाच्या रसायनशास्त्र विभाग आणि इंगळे परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कै. डॉ. टी. आर. इंगळे स्मृती राष्ट्रीय संशोधनपर व्याख्यान व पोस्टर सादरीकरण स्पर्धेचा समारोप झाला. व्याख्यान स्पर्धेत धनश्री सोनवणे आणि जोआना डेळके यांनी प्रथम क्रमांक मिळविला. पोस्टर सादरीकरणाच्या पदव्युत्तर गटात इकरा शेख, तर पीएच.डी. गटात सोनाली काकडे यांनी प्रथम क्रमांक मिळविला. रसायनशास्त्र : उज्ज्वल उद्याची निर्मिती या विषयावर आयोजित या उपक्रमात विविध विद्यापीठे आणि संशोधन संस्थांमधील विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला.

 

यावेळी आयआयएसईआर चे प्रा. डॉ. अरविंद नातू प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. समारंभाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अविनाश मोहरील होते. इंगळे परिवाराच्या वतीने कै. डॉ. टी. आर. इंगळे यांचे कनिष्ठ सुपुत्र मुकुंद इंगळे आणि वर्षा इंगळे उपस्थित होत्या. विज्ञान शाखेच्या उपप्राचार्या डॉ. सुनीता जाधव, रसायनशास्त्र विभागप्रमुख डॉ. वंदना आरबाळे-तोरणे तसेच स्पर्धेचे परीक्षक सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे डॉ. एन. आर. धात्रक आणि एच. व्ही. देसाई कॉलेजचे डॉ. जी. एस. गुगळे उपस्थित होते.

 

प्रा. अरविंद नातू म्हणाले, टी. आर. इंगळे यांचा संशोधनप्रवास विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी आहे. त्यांच्या संशोधनातील जिद्द, चिकाटी आणि प्रयोगशीलता वैशिष्ट्यपूर्ण होती. संशोधनासाठी आवश्यक साधनसामग्री मर्यादित असतानाही डॉ. इंगळे यांनी आपले संशोधनकार्य सुरू ठेवले. प्रयोगशाळेत दिवस-रात्र मेहनत घेत त्यांनी संशोधनाची वाटचाल केली. त्यांच्या या कार्यामुळे त्यांना राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा (एनसीएल), पुणे तसेच पर्ड्यू विद्यापीठ, अमेरिका येथे कार्य करण्याची संधी मिळाली. त्यांचा हा संशोधनप्रवास विद्यार्थी आणि प्राध्यापकांसाठी आदर्शवत असल्याचे प्रा. नातू यांनी सांगितले.

 

मुकुंद इंगळे म्हणाले, विद्यार्थ्यांनी संशोधनासोबत कृत्रिम बुद्धिमत्तेचे ज्ञान आत्मसात करावे. विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात झपाट्याने बदल होत असून आगामी काळात कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आणि संगणकीय तंत्रज्ञानाची भूमिका महत्त्वाची राहणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी आपल्या संशोधन क्षेत्रासोबतच एआय आणि संगणक तंत्रज्ञानाचे ज्ञान प्राप्त करून घेणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

 

प्राचार्य डॉ. अविनाश मोहरील म्हणाले, राष्ट्रीय स्तरावरील या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल रसायनशास्त्र विभाग आणि इंगळे परिवाराचे महाविद्यालयातर्फे आभार मानतो. कै. डॉ. टी. आर. इंगळे यांच्या स्मृती जपत गेल्या तीन दशकांपासून सुरू असलेला हा उपक्रम विद्यार्थ्यांमध्ये संशोधनाची आवड, वैज्ञानिक दृष्टिकोन आणि सादरीकरण कौशल्य विकसित करण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरत असल्याचे त्यांनी सांगितले. डॉ. सायली पाटील यांनी दोन दिवसांच्या स्पर्धेचा आढावा घेत सर्वांचे आभार मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. मानसी राठोड यांनी केले.

 

व्याख्यान स्पर्धेतील विजेते

 

प्रथम क्रमांक : सोनवणे धनश्री दीपक – न्यू आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स कॉलेज, अहमदनगर; डेळके जोआना राहुल – नौरोसजी वाडिया कॉलेज, पुणे.

 

द्वितीय क्रमांक : पाटील दिशा दिलीप – स. प. महाविद्यालय, पुणे; गुप्ता धनू संतोष – स. प. महाविद्यालय, पुणे.

 

तृतीय क्रमांक : पुंड प्रथेमेश संजय – न्यू आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स कॉलेज, अहमदनगर; शेख इरफान सदाशिव – स. प. महाविद्यालय, पुणे.

 

उत्तेजनार्थ : बोथरा मिताली निलेश – बी. जे. एस. आर्ट्स, सायन्स अँड कॉमर्स कॉलेज; गायकवाड निकित संतोष – एम. एस. जी. कॉलेज, मालेगाव.

 

पोस्टर सादरीकरण स्पर्धेतील विजेते

 

पदव्युत्तर गट :

प्रथम क्रमांक – इकरा इरफान शेख (पूना कॉलेज); द्वितीय क्रमांक – कुलकर्णी मनीष (स. प. महाविद्यालय); तृतीय क्रमांक – सोनिया खान (फर्ग्युसन कॉलेज, पुणे); उत्तेजनार्थ – मोरे यश राजेश (संदीप विद्यापीठ, नाशिक).

 

पीएच.डी. गट :

प्रथम क्रमांक – काकडे सोनाली (सीएसआयआर, पुणे); द्वितीय क्रमांक – अब्राहम अथिरा (एनसीएल); तृतीय क्रमांक – कामठे धनश्री (स. प. महाविद्यालय); उत्तेजनार्थ – अभिलाषा बारुच (सीएसआयआर-नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन) आणि शर्मा शुभी (दयालबाग एज्युके

शनल इन्स्टिट्यूट, आग्रा).

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments