Saturday, September 19, 2026
Google search engine
HomeUncategorizedगुप्त माहिती, बदललेला मार्ग, थरारक पाठलाग आणि रात्रभर कायदेशीर प्रक्रिया चाकण...

गुप्त माहिती, बदललेला मार्ग, थरारक पाठलाग आणि रात्रभर कायदेशीर प्रक्रिया चाकण येथे ₹१.१३ कोटींचा प्रतिबंधित गुटखा जप्त

 

 

अन्न व औषध प्रशासनाला मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे प्रतिबंधित गुटख्याची वाहतूक करणाऱ्या टाटा ट्रकचा माग काढण्यासाठी १८ सप्टेंबर २०२६ दुपारी ०२ वाजता कारवाईला सुरुवात करण्यात आली. मध्य प्रदेशातून समृद्धी महामार्गाने भिवंडी, ठाणे येथे येण्याची माहिती असलेला हा ट्रक नियोजित मार्ग बदलून संगमनेरमार्गे पुण्याच्या दिशेने जात असल्याचे आढळून आले.

वाहनाने मार्ग बदलल्याचे लक्षात येताच, त्याच्या संभाव्य मार्गांवर अन्न व औषध प्रशासनाची पथके तातडीने सक्रिय करण्यात आली. ठाणे विभागाचे पथक मुरबाडच्या दिशेने, तर पुणे विभागाचे पथक राजगुरुनगर येथे तैनात करण्यात आले.

राजगुरुनगर टोलनाक्यावर अन्न सुरक्षा अधिकारी श्री. लक्ष्मीकांत सावळे यांनी गाडी आडवी लावून तो थांबविण्याचा प्रयत्न केला. मात्र, चालकाने वाहन न थांबवता ट्रक तसाच पुढे दामटला.

यानंतर सुरू झाला थरार पाठलाग

श्री. सावळे यांनी ट्रकचा पाठलाग सुरू ठेवला शेवटी स्थानिक पोलिसांच्या मदतीने चाकण-तळेगाव चौक येथे अखेर ट्रकला शिताफीने अडविण्यात आले. सुमारे सहा तासांच्या या पाठलागानंतर, रात्री सुमारे ८ वाजता ट्रक ताब्यात घेण्यात आला.ट्रकची तपासणी केली असता, महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेला विविध कंपन्यांचा पानमसाला, सुगंधित तंबाखू (गुटखा) तसेच वाहतुकीसाठी वापरण्यात आलेले वाहन असा एकूण ₹१,१३,५४,६०० किमतीचा मुद्देमाल आढळून आला. त्यानंतर अन्न सुरक्षा अधिकारी यांनी संपूर्ण मुद्देमाल जप्त करण्यात आला.

 

जप्त केलेला मुद्देमाल तपशील खालीलप्रमाणे :

 

क्र.

प्रतिबंधित अन्नपदार्थ

बाजार भावप्रमाणे किंमत (रु)

 

 

रजनीगंधा फ्लेवर्ड पानमसाला

२९,९५,२००/-

 

 

तुळशी रॉयल जाफरानी जर्दा

९,६०,०००/-

 

 

तानसेन सुगंधित पानमसाला

२४,९४,८००/-

 

 

टी.ओ. प्रिमियम जर्दा

२,६४,६००/-

 

 

आर.एम.डी. पानमसाला

२६,४०,०००/-

 

 

ट्रक क्रमांक MH 18 BZ 2350

२०,००,०००/-

 

 

एकूण जप्त साठा किंमत

१,१३,५४,६००/-

 

 

मात्र कारवाई तेथेच थांबली नाही. जप्तीची प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर संबंधितांविरुद्ध कायदेशीर कारवाईची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती. कागदपत्रांची पूर्तता, जप्तीची नोंद आणि इतर आवश्यक कायदेशीर प्रक्रिया रात्रभर करण्यात आली. अखेर १९ सप्टेंबर २०२६ सकाळी १० वाजता सदर प्रकरणी अन्न सुरक्षा अधिकारी, पुणे यांनी चाकण उत्तर पोलिस स्टेशन, पिंपरी चिंचवड येथे वरील सर्व संबंधितांविरुद्ध BNS 123, 223, 274, 275, 3 (5)and 26(2)(i), 26(2)(iv), 27(3)(e), 30(2)(a) and 59 of FSS Act २००६ अन्वये फिर्याद नोदविलेली आहे.

आरोपींची नावे आणि गुन्ह्याचे स्वरूप:

१. नफीस मेहबूब खान (वय ४०, रा. हरियाणा) – वाहनचालक.

२. निलेश राठी (रा. खामगाव, जि. बुलढाणा) – मालक/पुरवठादार.

३. अरुण पाटील (रा. जळगाव) – मालक/पुरवठादार.

४. मे. J.M.D. Enterprises (धुळे) – वाहन मालक.

५. संजय माटा (रा. इंदूर, मध्य प्रदेश) – वाहतूकदार.

हा प्रकार केवळ अन्न सुरक्षा कायद्याचे उल्लंघन नसून, सार्वजनिक आरोग्याशी खेळणारा एक संघटित आणि सातत्यपूर्ण बेकायदेशीर व्यापार असल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत आहे. त्यामुळे या गुन्ह्यातील आरोपींचे पूर्वगुन्हे, पुरवठा साखळी आणि आर्थिक व्यवहार तपासून, दोषी आढळल्यास त्यांच्याविरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम, १९९९ (MCOCA) अंतर्गत कडक कारवाई करण्यासाठी सक्षम प्राधिकाऱ्यांकडे प्रस्ताव सादर करण्याची विनंती अन्न व औषध प्रशासनातर्फे पोलिसांना करण्यात आली आहे.

ही कारवाई केवळ प्रतिबंधित पदार्थाची वाहतूक रोखण्यापुरती मर्यादित नसून, अशा बेकायदेशीर पुरवठा साखळीविरुद्ध सातत्यपूर्ण आणि कायदेशीर कारवाई करण्याच्या प्रशासनाच्या भूमिकेचा भाग आहे.

 

अन्न व औषध प्रशासनाकडून प्रतिबंधित व आरोग्यास घातक अन्नपदार्थांची विक्री, साठवणूक व वाहतूक करणाऱ्यांविरुद्ध यापुढेही कठोर व सातत्यपूर्ण कारवाई करण्यात येणार असून, नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने अशा बेकायदेशीर प्रकारांना आळा घालण्यासाठी विभागामार्फत विशेष मोहीम राबविण्यात येत आहे.

अन्न पदार्थांच्या दर्जाबाबत तक्रार नोंदणीसाठी:

अन्नपदार्थाच्या दर्जाबाबत अथवा गैरप्रकाराबाबत तक्रारीसाठी टोल-फ्री क्रमांक १८००२२२३६५ तसेच Food & Drug Grievance Portal (https://complaints.mahafda.in) वर संपर्क साधावा.

प्रशासनाचे आवाहन:

“महाराष्ट्रात अन्नपदार्थाच्या गुणवत्तेबाबत व कायद्याच्या अंमलबजावणीबाबत शासन अत्यंत कठोर आहे. ग्राहकांच्या आणि जनतेच्या आरोग्याशी खेळ कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतला जाणार नाही. मुदतबाह्य किंवा फेरफार केलेल्या अन्नपदार्थांची विक्री/साठवणूक करणाऱ्यांवर अशीच कठोर कायदेशीर कारवाई चालू राहील.

– तुकाराम मुंढे, आयुक्त, अन्न व औषध प्रशासन, महाराष्ट्र राज्य

तात्काळ व्यापक प्रसिद्धीसाठी

 

सह आयुक्त (अन्न), मुख्यालय

 

अन्न व औषध प्रशासन , (म.रा)

 

 

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments