Saturday, September 19, 2026
Google search engine
HomeUncategorizedलोकसंवाद 2026 ' च्या कार्यक्रमातून गणेश उत्सवात आपले सरकार पोर्टल बाबत जनजागृती*...

लोकसंवाद 2026 ‘ च्या कार्यक्रमातून गणेश उत्सवात आपले सरकार पोर्टल बाबत जनजागृती* *शासनाच्या आपले सरकार सेवा केंद्राचा नागरिकांनी लाभ घ्यावा*         *- अविनाश लोहार*

 

 

पुणे दि. 18-माहिती व जनसंपर्क विभागा अंतर्गत जिल्हा माहिती कार्यालयातर्फे आखिल शिवतेज तरुण मंडळ,

केसनंद फाटा, वाघोली येथे लोकसंवाद हा कार्यक्रम पार पडला. यावेळी आपले सरकार पोर्टल बाबत सविस्तर माहिती दिली.

 

आपले सरकार सेवा केंद्र हे डिजिटल सेवा केंद्र असून हे सेवा केंद्र शहरी व ग्रामीण भागातील नागरिकांना विविध शासकीय महसूल सेवा एकाच ठिकाणी मिळण्यासाठी सुरू करण्यात आलेले आहे. याची प्रमुख वैशिष्ठे आणि सेवा म्हणजे शासकीय दाखले,जन्म मृत्य नोंदणी प्रमाणपत्र, विवाह नोंदणी प्रमाणपत्र, ना हरकत प्रमाणपत्र, वयोमर्यादा किंवा इतर ग्रामपंचायत दाखले यांचा समावेश असतो. तसेच विविध शासकीय योजनांचे अर्ज, कागदपत्रे अपलोड करणे आणि अर्जाची स्थिती तपासणे ही सुविधा आपले सरकार सेवा केंद्रामध्ये उपलब्ध असते. वीज पाणी व इतर युटिलिटी बिल भरण्याचीही सुविधा असते. याबाबतच्या अधिक माहिती साठी आपले सरकार पोर्टल किंवा ग्रामविकास विभाग महाराष्ट्र या वेबसाईट वर भेट देऊन अधिक माहिती घेण्यात यावी.

 

जास्तीत जास्त नागरिकांनी आपले सरकार पोर्टल बाबतच्या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन शासकीय कर्मचारी श्री. अविनाश लोहार यांनी यावेळी केले.

 

यावेळी मंडळाचे अध्यक्ष आबिद शेख, उपाध्यक्ष सागर, इतर सदस्य व परिसरातील नागरिक उपस्थित होते.

00000

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments