Sunday, September 20, 2026
Google search engine
HomeUncategorizedकर्वेनगर येथील मधुसंचय गणपती मंदिरात "सामूहिक अथर्वशीर्ष पठणा" चा सोहळा मोठ्या उत्साहात...

कर्वेनगर येथील मधुसंचय गणपती मंदिरात “सामूहिक अथर्वशीर्ष पठणा” चा सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न

 

 

पुणे,

दि. २० सप्टेंबर २०२६

(प्रतिनिधी)

कर्वेनगर येथील मधुसंचय सोसायटीच्या गणपती मंदिरामध्ये महिला सामूहिक अथर्वशीर्ष समितीच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही सामूहिक “श्री गणपती अथर्वशीर्ष ” पठणाचा कार्यक्रम मधुसंचय गणपती मंदिरामध्ये अत्यंत भक्तिमय वातावरणात पार पडला.समितीचे “गणपती अथर्वशीर्ष पठण” चे यंदाचे हे १८ वे वर्ष आहे.

सुप्रसिद्ध शंख वादक मधुकर शिधये यांनी कार्यक्रमाच्या सुरवातीला शंख वादन करून मंगलमय वातावरण निर्माण केले.या कार्यक्रमास प्रमुख वक्त्या म्हणून प्रतिमा चोळकर होत्या.त्यांनी उपस्थित महिलांना “कुटुंब प्रबोधन आणि पंच परिवर्तन” या विषयावर मार्गदर्शन केले.त्यांनी कुटुंबसंस्थेचे महत्त्व,संस्कार आणि समाज परिवर्तनात महिलांची भूमिका यावर प्रकाश टाकला.

या कार्यक्रमास कर्वेनगर परिसरातील तीनशे महिलांची उपस्थिती होती.

सकाळी साडे आठ ते साडे दहा या वेळेत अथर्वशीर्ष पठण कार्यक्रम संपन्न झाला.

आरती आणि प्रसाद वाटपाने कार्यक्रमाची सांगता झाली.स्वाती हिर्लेकर ह्यांनी अथर्वशीर्ष सादर केले.

 

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मनीषा जावळे,कविता शेंडे,स्मिता लाटे,भारती जोशी,श्वेता क्षीरसागर,माधवी जोशी,ज्योत्स्ना शिंदे,समिधा मुळे यांनी परिश्रम घेतले.

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments