Monday, September 21, 2026
Google search engine
HomeUncategorizedह्युंदाई मोटर ग्रुप तर्फे ह्युंदाई सीओई मोबिलिटी इनोव्हेशन आयडियाथॉन

ह्युंदाई मोटर ग्रुप तर्फे ह्युंदाई सीओई मोबिलिटी इनोव्हेशन आयडियाथॉन

पुणे,21 सप्टेंबर 2026 : भारतातील भविष्यातील मोबिलिटी इकोसिस्टीम प्रती आपली कटिबद्धता दर्शवत ह्युंदाई मोटर ग्रुप तर्फे ह्युंदाई सेंटर ऑफ एक्सलन्स (ह्युंदाई सीओई) मोबिलिटी इनोव्हेशन आयडियाथॉन आणि रिसर्च सिनर्जी फोरम हे दोन प्रमुख उद्योग शिक्षण सहयोगी उपक्रम ह्युंदाई सीओई अंतर्गत सुरू केले आहेत. या उपक्रमाच्या माध्यमातून सात विद्यापीठांमधील विद्यार्थी,प्राध्यापक आणि संशोधक एकत्र येऊन यामुळे भविष्यातील मोबिलिटी तंत्रज्ञानामध्ये नवोपक्रम,ज्ञान आदान-प्रदान आणि प्रतिभा विकासासाठी एक व्यासपीठ तयार होईल.

 

मोबिलिटी इनोव्हेशन आयडियाथॉन हे सप्टेंबर ते डिसेंबर 2026 दरम्यान सुरू राहणार असून ह्युंदाई सीओई सदस्य विद्यापीठांना एनहान्स्ड इन – व्हेइकल एक्सपिरियन्स थीम अंतर्गत नवीन कल्पना विकसित करण्यासाठी आमंत्रित केले गेले आहे.इंडिया स्मार्ट इंटरॲक्शन,एआय पॉवर्ड आणि डिजिटल इन – व्हेइकल एक्सपिरियन्स, नेक्स्ट जनरेशन इन व्हेईकल इंटरफेस आणि स्मार्ट व्हॅल्यू इनोव्हेशन या चार गटात संकल्पना सादर केल्या जाऊ शकतात

.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments