Wednesday, September 23, 2026
Google search engine
HomeUncategorizedगणेश विसर्जनासाठी पुणे शहरात २६ ठिकाणी वाहनतळांची व्यवस्था*

गणेश विसर्जनासाठी पुणे शहरात २६ ठिकाणी वाहनतळांची व्यवस्था*

 

 

पुणे, दि.२३ : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गणेश विसर्जनाच्या दिवशी होणारी नागरिकांची मोठी गर्दी लक्षात घेऊन महापालिकेने विविध ठिकाणी वाहनतळांची व्यवस्था केली आहे. विसर्जन मिरवणुकी दरम्यान शहरातील प्रमुख मार्गांवर वाहतूक वाढणार असल्याने नागरिकांनी उपलब्ध करून देण्यात आलेल्या वाहनतळांचा वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

 

२५ सप्टेंबर रोजी सकाळी ९ वाजल्यापासून गणेश विसर्जनासाठी नागरिक मोठ्या संख्येने बाहेर पडण्याची शक्यता आहे. दुचाकी तसेच चारचाकी वाहनांसाठी स्वतंत्र ठिकाणी पार्किंगची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. उपलब्ध वाहनतळांमध्ये न्यू इंग्लिश स्कूल, रमणबाग; शिवाजी आखाडा वाहनतळ; देसाई कॉलेज; हमालवाडा,पत्र्यामारुती चौकाजवळ; गोगटे प्रशाला; एस एस पी एम मैदान, आरटीओ चौक; एस. पी. कॉलेज; पीएमपीएमएल मैदान, पुरम चौका जवळ; पेशवे पार्क सारसबाग; हरजीवन हॉस्पी समोर, सावरकर चौक; पाटील प्लाझा पार्किंग; पर्वती ते दांडेकर पूल; दांडेकर पूल ते गणेशमळा या ठिकाणांचा समावेश आहे.

 

याशिवाय गणेशमळा ते राजाराम पूल, निलायम टॉकीज, बीएमसीसी कॉलेज मैदान, आबासाहेब गरवारे कॉलेज, संजीवनी मेडिकल कॉलेज मैदान, फर्ग्युसन कॉलेज, जैन हॉस्टेल बीएमसीसी रोड मैदान, मराठवाडा कॉलेज, पेशवे पथ, रानडे पथ, काँग्रेस हाऊस रोड, न्यू इंग्लिश स्कूल टिळक रोड आणि नदीपात्रातील भिडे पूल ते गाडगीळ पूल या ठिकाणीही वाहनतळाची व्यवस्था करण्यात आली आहे.

 

गणेश विसर्जनाच्या दिवशी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी नागरिकांनी शक्यतो सार्वजनिक वाहतुकीचा वापर करावा आणि वाहनतळाच्या ठिकाणीच वाहने उभी करून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन पोलीस उप आयुक्त डॉ. संदीप भाजीभाकरे यांनी केले आहे.

०००

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments