पुणे, दि.२८: स्वर्गीय आमदार अण्णासाहेब पाटील यांची ९३ वी जयंती जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, पुणे येथे उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या प्रारंभी अण्णासाहेब पाटील यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी अण्णासाहेब पाटील यांच्या सामाजिक कार्याचे तसेच माथाडी कामगार चळवळीतील योगदानाचे स्मरण करण्यात आले. आर्थिक मागास विकास महामंडळाच्या विविध योजना, कर्ज सुविधा व व्याज परतावा याबाबत लाभार्थींना माहिती देण्यात आली. युवकांनी स्वयंरोजगार व उद्योजकतेकडे वळून आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावे, तसेच अण्णासाहेब पाटील यांचा विचार व वारसा पुढे न्यावा, असे आवाहन करण्यात आले.
कार्यक्रमास कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाचे अधिकारी, महामंडळाचे समन्वयक तसेच लाभार्थी उपस्थित होते.
०००


