Monday, September 28, 2026
Google search engine
HomeUncategorizedपक्क्या अनुज्ञप्तीकरिता मासिक दौऱ्याचे आयोजन*

पक्क्या अनुज्ञप्तीकरिता मासिक दौऱ्याचे आयोजन*

 

 

पुणे, दि. २८: पक्की अनुज्ञप्ती मिळण्याच्यादृष्टीने पिंपरी-चिंचवड उप प्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे माहे ऑक्टोबर २०२६ मध्ये मासिक दौऱ्याचे आयोजन करण्यात आल्याची माहिती पिंपरी चिंचवड उप प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी दिली आहे.

 

पक्क्या अनुज्ञप्तीच्या चाचणीसाठी ५,६ आणि ७ ऑक्टोबर २०२६ रोजी खेड, १२,१३ आणि १४ ऑक्टोबर रोजी मंचर, २१, २२ आणि २३ ऑक्टोबर रोजी जुन्नर, २६,२७ आणि २८ जुलै ऑक्टोबर वडगाव मावळ आणि २९ व ३० ऑक्टोबर २०२६ रोजी लोणावळा येथे मासिक दौऱ्याचे आयोजन करण्यात आले आहे. पक्क्या अनुज्ञप्तीसाठी ३० सप्टेंबर २०२६ रोजी दुपारी ५ वाजता कोटा उपलब्ध होणार आहे, असेही कळविण्यात आले आहे.

 

0000

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments