‘वी पे हैं सब वीआईपी’ या आपल्या नवीन ब्रँड वचनाला अनुसरून ‘वी’ ने आज आपल्या ग्राहकांसाठी एका मोठ्या सुविधेची घोषणा केली आहे. आता ‘वी’ ग्राहकांना परदेश प्रवासात कोणतीही अतिरिक्त फी न देता निःशुल्क इंटरनॅशनल रोमिंग मिळेल. कंपनीच्या प्रमुख पोस्टपेड, प्रीपेड आणि एंटरप्राइज प्लॅन्सवर ही सुविधा उपलब्ध असून, यामुळे १७० पेक्षा जास्त देशांमध्ये प्रवास करत असताना ‘वी’ ग्राहक आणि त्यांचे कुटुंबीय सहज व पूर्णपणे निःशुल्क एकमेकांच्या संपर्कात राहू शकतील.
गेल्या अनेक दशकांपासून, परदेश प्रवासात मोबाईल कनेक्टिव्हिटी चालू ठेवणे म्हणजे एक डोकेदुखी ठरत होती. यासाठी प्रवाशांना एकापेक्षा जास्त सिम कार्ड्स बाळगावी लागणे, प्रवासाला निघण्यापूर्वी स्थानिक किंवा ट्रॅव्हल सिम खरेदी करावे लागणे, आपला मूळ भारतीय मोबाईल नंबर वापरण्याची सोय गमावणे, महत्त्वाचे बँक किंवा लॉगिन ओटीपी न मिळणे, असुरक्षित सार्वजनिक वाय-फायवर अवलंबून राहणे, कागदपत्रांची कटकट किंवा अवाढव्य रोमिंग बिलांची चिंता यासारख्या अनेक समस्यांचा सामना करावा लागत होता. मात्र, ‘वी’ आता या संपूर्ण अनुभवात आमूलाग्र बदल घडवून आणत आहे आणि आपल्या ग्राहकांसाठी परदेश प्रवास अतिशय सोपा व सुलभ करत आहे.
‘वी’ने आता आपल्या प्लॅन्समध्येच ‘निःशुल्क इंटरनॅशनल रोमिंग’ समाविष्ट केले असून, याद्वारे परदेशातील कनेक्टिविटी अत्यंत सोपी, सर्वसमावेशक, विनाव्यत्यय आणि चिंतामुक्त केली आहे. ग्राहक वापरत असलेल्या प्लॅननुसार, पोस्टपेड, प्रीपेड आणि एंटरप्राइज ग्राहकांना आता वर्षभरात ३ परदेश प्रवासांपर्यंत मोफत इंटरनॅशनल रोमिंगचा आनंद घेता येईल. यामध्ये वेगवेगळ्या आंतरराष्ट्रीय डेटा मर्यादा आणि आऊटगोइंग कॉलिंग मिनिट्स मिळतील, ज्याद्वारे ग्राहकांची वर्षाला तब्बल ९,००० रुपयांपर्यंत बचत होईल.
‘वी पे सब हैं वीआईपी’ या आपल्या नवीन ब्रँड मोहिमेला अनुसरून, ‘वी’ आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी इंटरनॅशनल रोमिंगची सुविधा अधिक सुलभ व सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवत आहे. वैयक्तिक, कौटुंबिक आणि व्यावसायिक प्रवाशांचा विचार करून तयार करण्यात आलेली ही सुविधा पोस्टपेड, प्रीपेड आणि कॉर्पोरेट प्लॅन्स वापरणाऱ्या ग्राहकांसाठी परदेशातील कनेक्टिविटी सोपी करते. ग्राहक ‘वी ॲप’मधून ही सेवा अगदी सहजपणे ॲक्टिवेट करू शकतात.
इस सुविधेच्या लाँचप्रसंगी बोलताना ‘वी’चे मुख्य विपणन अधिकारी अवनीश खोसला म्हणाले, “आमच्यासाठी ‘वी पे सब हैं वीआईपी’ ही केवळ एक जाहिरात मोहीम नसून, ते एक वचन आहे; जे आम्ही सर्वसमावेशक आणि सार्थक सेवासुविधांच्या माध्यमातून ग्राहकांच्या आयुष्यात प्रत्यक्ष आणत आहोत. आंतरराष्ट्रीय प्रवासातील बंधने दूर करणे ही या दिशेने टाकलेल्या अनेक पावलांपैकी पहिली पायरी आहे. सामान्यतः असा अर्थ घेतला जातो की, आंतरराष्ट्रीय रोमिंग म्हणजे अतिरिक्त रोमिंग पॅक खरेदी करणे किंवा तिथे गेल्यावर नवीन स्थानिक सिम किंवा ट्रॅव्हल ई-सिम घेणे, आणि हा खर्चिक प्रकार मानला जातो. मात्र, आम्ही आमच्या प्रमुख ‘वी’ प्लॅन्समध्येच इन-बिल्ट सुविधा म्हणून मोफत इंटरनॅशनल रोमिंग देऊन एक क्रांतिकारी पाऊल उचलत आहोत. ‘प्रवासाला निघताना रोमिंग पॅक खरेदी करा’ या जुन्या विचारसरणीकडून बाहेर पडून ‘तुमचा वी नंबर परदेशातही तुमची साथ देईल, पूर्णपणे निःशुल्क’ याकडे झालेला हा एक सोपा पण अत्यंत महत्त्वपूर्ण बदल आहे. ‘वी पे सब हैं वीआईपी’चा नेमका हाच अर्थ आहे; ग्राहकांच्या रोजच्या जगण्यातील खरी अडचण ओळखून, एका क्रांतिकारी आणि महत्त्वपूर्ण सुविधेद्वारे ती सोडवणे आणि प्रत्येक ग्राहकाला व्हीआयपी असल्याची जाणीव करून देणे.”
अभिनेता शाहरुख खान यांचा सहभाग असलेल्या एका नवीन टीव्ही जाहिरातीच्या माध्यमातून ही संकल्पना प्रेक्षकांसमोर आणली गेली आहे. या जाहिरातीच्या व्हिडिओमध्येही मूळ मोहिमेची मजेशीर शैली कायम ठेवण्यात आली आहे. यामध्ये शाहरुख खान आपल्या नेहमीच्या विनोदी पद्धतीने एका गोड भ्रमात वावरताना दिसतात; त्यांना असे वाटत असते की ‘वी’ने केवळ त्यांच्यासाठीच इंटरनॅशनल रोमिंग निःशुल्क केले आहे. मात्र, जाहिरात जशी पुढे सरकते, तशी इतर ग्राहकांना जाणीव होते की ही मोफत इंटरनॅशनल रोमिंग सेवा केवळ शाहरुख खान यांच्यासाठी नसून सर्व ग्राहकांसाठी उपलब्ध आहे.
या नवीन सुविधेअंतर्गत, पात्र प्लॅन्स वापरणाऱ्या ग्राहकांना निःशुल्क इंटरनॅशनल रोमिंगसह इतर अनेक फायद्यांचा आनंद घेता येईल. यामध्ये ₹५०१ पासून सुरू होणारे पोस्टपेड प्लॅन्स, वार्षिक प्रीपेड अनलिमिटेड डेटा प्लॅन्स आणि एंटरप्राइज ग्राहकांसाठी ₹४५१ पासून सुरू होणाऱ्या कॉर्पोरेट प्लॅन्सचा समावेश आहे.
या सुविधेचा लाभ घेणे खूप सोपे आहे. ‘वी ॲप’ सुरू करून ‘इंटरनॅशनल रोम-फ्री प्लॅन्स’ निवडल्यास आपल्या परदेश प्रवासात मोफत आंतरराष्ट्रीय कनेक्टिविटीचा आनंद घेता येईल. आपल्या प्लॅननुसार ‘वी’ आपल्याला नेहमी कनेक्टेड ठेवेल, या पूर्ण आत्मविश्वासाने ग्राहक निर्धास्तपणे प्रवास करू शकतील.
या नाविन्यपूर्ण सुविधेमधून ‘वी’ पुन्हा एकदा टेलिकॉम उद्योग क्षेत्रातील प्रस्थापित नियमांना आव्हान देत आहे. तसेच, प्रत्येकालाच प्रीमियम आणि चिंतामुक्त अनुभव मिळायला हवा, हे आपले वचन कंपनी खऱ्या अर्थाने पूर्ण करत आहे.
अधिक माहितीसाठी कृपया येथे भेट द्या: www.myvi.in/allarevip/roamfree
कॅम्पेन पाहण्यासाठी लिंक: https://youtu.be/Iwulhn37vtY?
si=PdA9EMATTqAck-Zr


