नवीन पिन कोड्समध्ये लेह, कारगिल आणि ईशान्येकडील विविध भागांचा समावेश आहे. त्यामुळे ‘द बिग बिलियन डेज’ पहिल्यांदाच या क्षेत्रांपर्यंत पोहोचणार आहे.
● ३०% हून अधिक वाढलेली ‘पीक डिमांड’ (कमाल मागणी) हाताळण्यासाठी ‘ईकार्ट’ची शिपमेंट क्षमता वाढवण्यात आली.
● लेह, कारगिल आणि भारतातील सेवा-वंचित क्षेत्रांसह ‘ईकार्ट’ नेटवर्कमध्ये ७५० हून अधिक नवीन पिन कोड्सचा समावेश करण्यात आला आहे.
● ईकार्टच्या पूर्तता केंद्रांमध्ये २.५ कोटींहून अधिक एमएसएमई आणि विक्रेत्यांची उत्पादने उपलब्ध करून ठेवण्यात आली आहेत, तसेच प्रमुख विक्रेता केंद्रांवर ७० अतिरिक्त पिक-अप स्टेशन्सची सुविधाही उपलब्ध आहे.
● दोन महिन्यांत ३पीएल फ्रँचायझी नेटवर्क दुप्पट होऊन ६०० पर्यंत पोहोचले. त्यामुळे फ्लिपकार्ट मार्केटप्लेसच्या पलीकडेही विक्रेते आणि एमएसएमई पर्यंत राष्ट्रीय स्तरावर पोहोचणे शक्य झाले.
बंगळूर, २९ सप्टेंबर २०२६: भारतातील स्वदेशी ई-वाणिज्य बाजारपेठ असलेल्या फ्लिपकार्टने ‘द बिग बिलियन डेज’ आणि सणासुदीच्या दिवसांच्या पार्श्वभूमीवर आज ईकार्टच्या पुरवठा साखळीच्या विस्ताराची घोषणा केली. ईकार्टने देशभरात १४ दशलक्ष घनफूट गोदामाची जागा वाढवली असून साठवण क्षमता ५० टक्क्यांनी वाढवली आहे. तंत्रज्ञान आणि ऑटोमेशनमधील सुधारणांमुळे कमाल प्रक्रिया क्षमतेतही ३० टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे.
देशभरात ग्राहकांकडून जलद वितरणाची अपेक्षा केली जात असल्याने, सणासुदीच्या काळात शेवटच्या टप्प्यापर्यंत पोहोच वाढवण्यासाठी आणि ‘सेम-डे’ व ‘नेक्स्ट-डे’ वितरणाचे प्रमाण वाढवण्यासाठी विशेषतः ९०० हून अधिक अतिरिक्त डिलिव्हरी हब्स सुरू करण्यात आले आहेत. यामुळे देशभरातील ८,२०० हून अधिक ‘ईकार्ट’ सुविधांमध्ये (फुलफिलमेंट सेंटर्स, सॉर्टेशन हब्स आणि लास्ट-माईल डिलिव्हरी ऑपरेशन्सचा समावेश आहे) आणि १५० हून अधिक शहरांमधील जवळपास १,२०० ‘फ्लिपकार्ट मिनिट्स’ मायक्रो-फुलफिलमेंट सेंटर्समध्ये भर पडली आहे.
‘द बिग बिलियन डेज’ दरम्यान एमएसएमई, छोटे विक्रेते, विणकर आणि कारागीर यांना जलद वितरण सक्षम करण्यासाठी, त्यांच्या उत्पादनांचे अडीच कोटींहून अधिक युनिट्स ईकार्टच्या फुलफिलमेंट सेंटर्समध्ये आधीच ठेवण्यात आले आहेत आणि विक्रेत्यांचा वितरणाचा वेळ कमी करण्यासाठी प्रमुख विक्रेता केंद्रांमध्ये ७० अतिरिक्त पिक-अप स्टेशन्स उघडण्यात आली आहेत.
फ्लिपकार्ट मार्केटप्लेसच्या बाहेरील विक्रेते आणि एमएसएमईदेखील सणासुदीच्या काळात देशभरातील ग्राहकांना वितरण करून आपला व्यवसाय वाढवू शकतील याची खात्री करण्यासाठी ईकार्टच्या ३पीएल फ्रँचायझींची संख्या लॉन्च झाल्याच्या दोन महिन्यांतच दुप्पट होऊन ६०० झाली आहे.
‘द बिग बिलियन डेज’ आणि सणासुदीच्या काळातील खरेदीची सुविधा भारतातील अधिक ठिकाणांपर्यंत पोहोचवण्यासाठी ‘ईकार्ट’ने फ्लिपकार्टच्या सेवा-व्याप्तीमध्ये ७५० हून अधिक नवीन पिन कोड्सचा समावेश केला आहे. यात लडाखमधील लेह, जम्मू-काश्मीरमधील कारगिल, राजस्थान आणि मध्य प्रदेशातील दुर्गम भाग, तसेच ईशान्य भारतातील विविध भागांचा समावेश आहे. तसेच मिझोराममधील कमला नगर आणि झमुआंग, मेघालयातील तुरा सिटी, रेसुबेलपारा आणि राजाबाला, आणि अरुणाचल प्रदेशातील बोमडिला व तेझू यांसारख्या ठिकाणांचा समावेश होतो.
विशमास्टर्समुळेच ‘द बिग बिलियन डेज’ साजरे करणे शक्य होते आणि फ्लिपकार्टची त्यांच्याप्रती असलेली जबाबदारी केवळ डिलिव्हरीपुरती मर्यादित नाही. प्रत्येक विशमास्टरला टर्म लाईफ इन्शुरन्स, वैयक्तिक अपघात विमा आणि मेडिक्लेम लाभांचे संरक्षण मिळते; प्रत्येक सणासुदीच्या काळात संरक्षणाची पातळी सातत्याने वाढवण्यात आली आहे. फ्लिपकार्टने ‘डॉक्टर ऑन कॉल’ सेवादेखील सुरू केली आहे. त्याचा लाभ विशमास्टर्स आणि त्यांचे कुटुंबीय कधीही घेऊ शकतात.
विशमास्टर्स या सणासुदीच्या काळात आपल्या कमाईनुसार जॉइनिंग आणि रिटेन्शन बोनससाठी पात्र आहेत. तसेच, रेफरल इन्सेंटिव्हसाठीही पात्र आहेत. त्यामुळे वर्षातील सर्वाधिक मागणीच्या काळात उत्पन्नाचा अतिरिक्त स्रोत निर्माण होतो. फ्लिपकार्ट डिलिव्हरी पार्टनर्स ॲपद्वारे एआयवर चालणारी पार्श्वभूमी पडताळणी, महत्त्वाच्या तपासण्या आणि नियमांशी कोणतीही तडजोड न करता, ऑनबोर्डिंगला १० मिनिटांपेक्षा कमी वेळेत पूर्ण करते. प्रत्येक विशमास्टरची पडताळणी एकाच मानकानुसार केली जाते; हे तंत्रज्ञान त्यांना अधिक वेगाने कमाई सुरू करण्यास सक्षम करते. हेच ॲप एक प्रशिक्षण प्लॅटफॉर्म म्हणूनही काम करते, त्यामुळे नवीन कर्मचाऱ्यांना त्यांच्या पहिल्या शिफ्टपूर्वी डिलिव्हरीचे मानक माहीत असते.
फ्लिपकार्ट ग्रुपचे वरिष्ठ उपाध्यक्ष आणि पुरवठा साखळी (सप्लाय चेन) प्रमुख हेमंत बद्री म्हणाले, “दरवर्षी ‘द बिग बिलियन डेज’ ग्राहकांच्या अपेक्षांची—जसे जलद डिलिव्हरी आणि व्यापक पोहोच—पातळी उंचावते. यावर्षी लेह किंवा कारगिलमधील ग्राहकही पहिल्यांदाच ‘द बिग बिलियन डेज’चा अनुभव घेतील. ‘ईकार्ट’ आणि ‘फ्लिपकार्ट मिनिट्स’अंतर्गत आम्ही आता ८,२०० हून अधिक सुविधा चालवत आहोत; यामुळे आम्हाला सणासुदीच्या या अनुभवाचा लाभ अधिकाधिक ग्राहकांपर्यंत पोहोचवणे शक्य झाले आहे, तसेच विक्रेत्यांना अशा ग्राहकांपर्यंत पोहोचण्यास मदत होत आहे ज्यांच्यापर्यंत ते यापूर्वी पोहोचू शकले नव्हते.”
फ्लिपकार्टने सणासुदीच्या काळात अडीच लाखांहून अधिक प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगाराच्या संधी निर्माण करण्याची घोषणा केली आहे. त्यातील जवळपास ७५,००० संधी अशा लोकांसाठी आहेत जे पहिल्यांदाच नोकरीच्या क्षेत्रात प्रवेश करत आहेत. या नवीन संधींपैकी ६० टक्के संधी ‘लास्ट-माईल डिलिव्हरी’ क्षेत्रातील आहेत. हे प्रमाण जलद डिलिव्हरीवर असलेला भर आणि ‘टियर २’ व ‘टियर ३’ बाजारपेठांमध्ये ‘फ्लिपकार्ट मिनिट्स’चा होत असलेला विस्तार दर्शवते.
________________________________________
फ्लिपकार्ट ग्रुपबद्दल
फ्लिपकार्ट ग्रुप हा भारतातील एक अग्रगण्य डिजिटल कॉमर्स समूह आहे, ज्याचा पाया तंत्रज्ञानावर आधारित असून तो मजबूत आहे. यात फ्लिपकार्ट, मिंत्रा, फ्लिपकार्ट होलसेल, क्लिअरट्रिप आणि सुपर.मनी या ग्रुप कंपन्यांचा समावेश आहे. २००७ मध्ये स्थापित झालेल्या फ्लिपकार्टने लाखो विक्रेते, व्यापारी आणि लहान व्यवसायांना भारतातील डिजिटल कॉमर्स क्रांतीमध्ये सहभागी होण्यास सक्षम केले आहे. ५० कोटींहून अधिक नोंदणीकृत वापरकर्त्यांसह फ्लिपकार्टचे मार्केटप्लेस ८० हून अधिक श्रेणींमध्ये १५ कोटींहून अधिक उत्पादने उपलब्ध करते. आज या प्लॅटफॉर्मवर शॉपसी विक्रेत्यांसह १४ लाखांहून अधिक विक्रेते आहेत. तंत्रज्ञान आणि नावीन्यपूर्णतेद्वारे मूल्य प्रदान करून प्रत्येक भारतीयाला सक्षम आणि आनंदी करण्यावर लक्ष केंद्रित करून, फ्लिपकार्टने कॅश ऑन डिलिव्हरी, नो कॉस्ट ईएमआय, इझी रिटर्न्स आणि यूपीआय पेमेंट्स यांसारख्या सेवा सुरू केल्या आहेत. खरेदीपलीकडे, फ्लिपकार्ट रोजगार निर्मिती, उद्योजकांना सक्षम करणे आणि भारताची डिजिटल अर्थव्यवस्था मजबूत करणे सुरू ठेवते.
माध्यमांच्या प्रश्नांसाठी, कृपया येथे लिहा: media@flipkart.com


