Tuesday, September 29, 2026
Google search engine
HomeUncategorizedडीपीजीयूमध्ये करिअर एक्स्पो २०२६ चे आयोजन, २० हून अधिक नामांकित कंपन्यांकडून विद्यार्थ्यांना...

डीपीजीयूमध्ये करिअर एक्स्पो २०२६ चे आयोजन, २० हून अधिक नामांकित कंपन्यांकडून विद्यार्थ्यांना रोजगाराच्या संधी

 

 

पिंपरी, पुणे, सप्टेंबर २०२६ : डॉ. डी. वाय. पाटील ग्रुप, पुणे यांच्या ज्ञान प्रसाद ग्लोबल युनिव्हर्सिटी (DPGU) आणि डॉ. डी. वाय. पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी यांच्या संयुक्त विद्यमाने पिंपरी येथील कॅम्पसमध्ये ‘करिअर एक्स्पो २०२६’चे आयोजन करण्यात आले. या उपक्रमात २० हून अधिक नामांकित कंपन्या सहभागी झाल्याने विद्यार्थ्यांना विविध क्षेत्रांतील रोजगाराच्या संधी आणि उद्योगविश्वाच्या अपेक्षा समजून घेण्यासाठी एकाच व्यासपीठावर संधी मिळाली.

 

इंजिनीअरिंग, मॅनेजमेंट, फार्मसी, लॉ, एज्युकेशन, नर्सिंग, आर्ट्स, कॉमर्स आणि सायन्स अशा विविध शाखांमधील विद्यार्थ्यांनी एक्स्पोला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. सकाळी ८ वाजता रिबन कटिंग सोहळ्याने एक्स्पोची सुरुवात झाली. विद्यापीठ व संस्थेचे वरिष्ठ अधिकारी, प्राध्यापक, कर्मचारी आणि मान्यवरांच्या उपस्थितीत या उपक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.

 

नोंदणीद्वारे विद्यार्थ्यांना एक्स्पोमध्ये सहभागी होता आले. विविध कंपन्यांच्या प्रतिनिधींशी थेट संवाद साधत विद्यार्थ्यांनी उपलब्ध पदे, आवश्यक कौशल्ये, भरती प्रक्रिया आणि उद्योगाच्या अपेक्षांबाबत माहिती घेतली. अनेक विद्यार्थ्यांना थेट मुलाखती आणि करिअरविषयक संवादाची संधी मिळाली. विद्यार्थ्यांचा मोठा सहभाग आणि उत्साह यामुळे कॅम्पसमध्ये दिवसभर करिअरविषयक सकारात्मक वातावरण निर्माण झाले.

 

यावेळी बोलताना डॉ. सोमनाथ पी. पाटील, प्रो-चॅन्सलर, ज्ञान प्रसाद ग्लोबल युनिव्हर्सिटी (DPGU), डॉ. डी. वाय. पाटील ग्रुप, पुणे, म्हणाले, “विद्यार्थ्यांनी केवळ पदवी घेऊन बाहेर पडू नये, तर त्यांच्या भविष्यासाठी स्पष्ट दिशा आणि आत्मविश्वास असावा, हा आमचा सातत्याने प्रयत्न आहे. करिअर एक्स्पो हा त्याच दिशेने टाकलेले महत्त्वाचे पाऊल आहे. विद्यार्थी आणि उद्योगविश्वाला एका व्यासपीठावर आणल्यामुळे शैक्षणिक ज्ञान आणि प्रत्यक्ष उद्योगाच्या अपेक्षांमधील दरी कमी करण्यास मदत होते. विद्यार्थ्यांनी दाखवलेला उत्साह पाहून आनंद झाला असून, या एक्स्पोमधून अनेक विद्यार्थ्यांना निश्चितच चांगल्या संधी मिळतील, असा विश्वास आहे.”

 

डॉ. रोहिणी एस. पाटील, चीफ ऑपरेटिंग ऑफिसर, ज्ञान प्रसाद ग्लोबल युनिव्हर्सिटी (DPGU), डॉ. डी. वाय. पाटील ग्रुप, पुणे, म्हणाल्या, “करिअर एक्स्पोसारखे उपक्रम हे आमच्या संस्थेच्या उद्योगाभिमुख शिक्षणाच्या दृष्टिकोनाचे प्रतिबिंब आहेत. केवळ वर्गातील शिक्षण पुरेसे नसून विद्यार्थ्यांना उद्योगविश्वाशी थेट संवाद साधण्याची आणि प्रत्यक्ष संधी अनुभवण्याची आवश्यकता आहे. २० हून अधिक कंपन्या आणि शेकडो विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग ही आमच्यासाठी सकारात्मक बाब आहे. विद्यार्थ्यांना उद्योगासाठी सज्ज आणि भविष्यातील आव्हानांसाठी सक्षम करण्यासाठी अशा उपक्रमांचे आयोजन यापुढेही सातत्याने केले जाईल.”

 

एक्स्पोच्या यशस्वी आयोजनासाठी प्राध्यापक, प्लेसमेंट समन्वयक आणि कर्मचाऱ्यांनी कंपन्यांच्या प्रतिनिधींशी समन्वय साधत नोंदणीपासून मुलाखती आणि विद्यार्थ्यांच्या संवादापर्यंत संपूर्ण प्रक्रियेचे व्यवस्थापन केले.

 

करिअर एक्स्पो २०२६च्या माध्यमातून ज्ञान प्रसाद ग्लोबल युनिव्हर्सिटी आणि डॉ. डी. वाय. पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी यांनी उद्योगाशी जोडलेले शिक्षण, रोजगाराभिमुख कौशल्यविकास आणि विद्यार्थ्यांना सक्षम प्लेसमेंट सपोर्ट देण्याच्या आपल्या वचनबद्धतेला अधोरेखित केले आहे.

 

ज्ञान प्रसाद ग्लोबल युनिव्हर्सिटीविषयी

 

ज्ञान प्रसाद ग्लोबल युनिव्हर्सिटी (DPGU), डॉ. डी. वाय. पाटील ग्रुप, पुणे ही इंजिनीअरिंग, फार्मसी, मॅनेजमेंट, हॉस्पिटॅलिटी आणि लिबरल आर्ट्ससह विविध विद्याशाखांमध्ये अभ्यासक्रम उपलब्ध करून देणारी बहुविद्याशाखीय विद्यापीठ आहे. उद्योगाभिमुख शिक्षण, जागतिक स्तरावरील अनुभव आणि विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास यावर विद्यापीठाचा विशेष भर आहे. चार दशकांहून अधिक काळाच्या शैक्षणिक वारशाच्या बळावर डीपीजीयू विद्यार्थ्यांसाठी उद्योजकता, कौशल्यविकास आणि भविष्यातील करिअरसाठी सक्षम वातावरण निर्माण करण्याच्या दिशेने कार्यरत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments