Thursday, October 1, 2026
Google search engine
HomeUncategorizedवी बिझनेस आणि सिस्कोची भागीदारी; उद्योगांच्या नेटवर्क आधुनिकीकरणाला देणार गती

वी बिझनेस आणि सिस्कोची भागीदारी; उद्योगांच्या नेटवर्क आधुनिकीकरणाला देणार गती

 

 

 

 

हायब्रिड नेटवर्किंग, मल्टि-क्लाउड इंटिग्रेशन आणि इंटिग्रेटेड सिक्युरिटीच्या माध्यमातून हायब्रिड एसडी-वॅन कंपन्यांना त्यांच्या पायाभूत सुविधांचे आधुनिकीकरण करण्यास मदत करेल.

सुरक्षित, वेगवान आणि पुढे वाढवता येण्याजोगे एंटरप्राइझ नेटवर्क प्रदान करण्यासाठी ‘सिस्को मेराकी’च्या प्रगत आणि सुरक्षित मल्टी-वॅन क्षमतांची ‘वी बिझनेस’च्या मॅनेज्ड कनेक्टिविटीसोबत सांगड.

 

क्लाउडचा वाढता वापर आणि विखुरलेल्या व्यावसायिक कामकाजामुळे सध्याच्या ‘एआय युगात’ कंपन्यांसाठी नेटवर्क ही एक अत्यंत महत्त्वाची पायाभूत सुविधा बनत आहे, ज्यामुळे सुरक्षित, पुढे वाढवता येईल अशा आणि इंटेलिजेंट नेटवर्किंगच्या मागणीत वाढ होत आहे. उद्योग क्षेत्रातील अंदाजानुसार, भारतातील एसडी-वॅन बाजारपेठ २०.५% चक्रवाढ वार्षिक विकास दराने वाढून २०३१ पर्यंत १४.६ अब्ज अमेरिकन डॉलर्सवर पोहोचण्याचा अंदाज आहे. या वेगाने विस्तारणाऱ्या बाजारपेठेत आपले स्थान अधिक मजबूत करत, आघाडीची दूरसंचार कंपनी ‘वी’ची एंटरप्राइज शाखा असलेल्या ‘वी बिझनेस’ने ‘सिस्को’सोबत धोरणात्मक भागीदारीची आज घोषणा केली. आपल्या हायब्रिड एसडी-वॅन पोर्टफोलिओचा विस्तार करण्यासाठी वी बिझनेस सिस्कोच्या ‘मेराकी’चा वापर करणार आहे.

 

 

 

‘वी बिझनेस’ने २०२३ मध्ये सुरु केलेले ‘हायब्रिड एसडी-वॅन’ सोल्यूशन कंपन्यांना त्यांच्या ‘वाईड एरिया नेटवर्क’ (वॅन) पायाभूत सुविधांचे आधुनिकीकरण करण्यास मदत करते. हे सोल्यूशन एसडी-वॅन, सिक्युरिटी आणि मल्टि-क्लाउड इंटिग्रेशन एकत्रित आणते. तसेच, लीज्ड लाईन्स, ब्रॉडबँड आणि सेल्युलर नेटवर्क अशा विविध कनेक्टिविटी पर्यायांसह एंड-टू-एंड मॅनेज्ड सर्व्हिसेसच्या माध्यमातून ते पुरवले जाते.

 

 

 

‘वी बिझनेस हायब्रिड एसडी-वॅन’ सोल्यूशन हे ‘सिस्को मेराकी’ वर आधारित आहे. मेराकीचे सिंगल डॅशबोर्ड हे ॲप्लिकेशन आणि परफॉर्मन्स अवेअर राउटिंग, सिक्युरिटी, तसेच इन-बिल्ट वाय-फाय आणि सेल्युलर कनेक्टिव्हिटीचा वापर करून ग्राहकांसाठी त्यांच्या एसडी-वॅनचे व्यवस्थापन करणे सोपे करते.

 

 

 

‘वी बिझनेस’च्या देशव्यापी कनेक्टिविटीच्या पाठबळामुळे कंपन्यांना सिंगल पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट, प्रोॲक्टिव्ह मॉनिटरिंग, लाईफसायकल मॅनेजमेंट आणि युनिफाइड सर्व्हिस एक्सपिरियन्ससह पूर्णपणे मॅनेज्ड हायब्रिड एसडी-वॅन सेवेचा लाभ मिळतो. सर्व्हिस-बेस्ड मॉडेलवर आधारित असलेले हे सोल्यूशन कंपन्यांना सुरुवातीची मोठी भांडवली गुंतवणूक न करता, त्यांच्या गरजेनुसार नेटवर्कचा विस्तार करण्याची सुविधा देते.

 

 

 

भागीदारीबद्दल बोलताना वोडाफोन आयडिया लिमिटेडचे मुख्य एंटरप्राइज बिझनेस ऑफिसर एम. पी. सुनील कुमार म्हणाले, “आजच्या काळात कंपन्यांना अशा सुरक्षित आणि वेगवान नेटवर्किंग सोल्यूशन्सची गरज आहे, जे त्यांच्या बदलत्या धोरणात्मक उद्दिष्टांशी थेट सुसंगत असतील. प्रगत क्लाउड-मॅनेज्ड एसडी-वॅन, वायर्ड व वायरलेस नेटवर्किंग आणि इन-बिल्ट सिक्युरिटी एकत्रित करून आम्ही कंपन्यांना त्यांच्या विखुरलेल्या नेटवर्क्सचे केंद्रीभूत पद्धतीने व्यवस्थापन करण्याची आणि त्यांचे कामकाज अत्यंत सोपे करण्याची सुविधा देतो. आमची देशव्यापी कनेक्टिव्हिटी, क्लाउड-मॅनेज्ड नेटवर्किंग क्षमता, पूर्णपणे मॅनेज्ड सेवा आणि एंड-टू-एंड सपोर्ट यांच्या एकत्रित बळावर, सिस्कोसोबतची आमची भागीदारी आमच्या ग्राहकांना लवचिक, पुढे वाढवता येण्याजोगे आणि भविष्यासाठी सज्ज नेटवर्क्स तयार करण्यास सक्षम करेल.”

 

 

 

सिस्को इंडिया आणि साऊथ एशियाचे मॅनेजिंग डायरेक्टर, पार्टनर ऑर्गनायझेशन, अशोक शिवशंकर म्हणाले, “आपण आता ‘एआय-फर्स्ट’ युगात प्रवेश करत असताना, आधुनिक एंटरप्राइज नेटवर्क हे इंटेलिजेंट, सुरक्षित आणि सतत होणाऱ्या बदलांना सामोरे जाण्यासाठी सज्ज असणे आवश्यक आहे. ‘वी बिझनेस’सोबत एकत्रितपणे आम्ही कंपन्यांना त्यांच्या नेटवर्कचे आधुनिकीकरण करण्यास मदत करत आहोत. आमचे हे मॅनेज्ड हायब्रिड एसडी-वॅन सोल्यूशन कंपन्यांना डिजिटल परिवर्तनाचा वेग वाढवण्यासोबतच अधिक वेगवान, पुढे विस्तार करण्याची क्षमता आणि कामातील कार्यक्षमता प्रदान करेल.”

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments