मुंबई, ऑक्टोबर १, २०२६: कोटक महिंद्रा बँक लिमिटेडने (“कोटक” किंवा “बँक”) आज जाहीर केले की, भारतीय रिझर्व्ह बँकेने (“आरबीआय”) अनुप कुमार साहा यांची बँकेचे मॅनेजिंग डायरेक्टर आणि चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर (“एमडी आणि सीईओ”) म्हणून १ जानेवारी २०२७ पासून पुढील तीन वर्षांच्या कालावधीसाठी नियुक्ती करण्यास मान्यता दिली आहे. बँकेचे संचालक मंडळ या नियुक्तीला अंतिम स्वरूप देण्यासाठी आणि सदस्यांची मंजूरी मिळवण्यासाठी आगामी काळात पुढील आवश्यक प्रक्रिया सुरू करेल.
अनुप सध्या कोटक महिंद्रा बँकेचे होल-टाइम डायरेक्टर (एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर) आहेत. ते जानेवारी २०२६ मध्ये बँकेत रुजू झाले आहेत आणि मार्च २०२६ पासून रिटेल बँक, डेटा अॅनालिटिक्स आणि मार्केटिंग या विभागांचे कामकाज पाहत आहेत.
कोटक महिंद्रा बँकेच्या संचालक मंडळाचे अध्यक्ष सी. एस. राजन म्हणाले, “आम्ही भारतीय रिझर्व्ह बँकेच्या मंजूरीचे स्वागत करतो. अनुप यांच्याकडे बँकिंग आणि आर्थिक सेवा क्षेत्राचा दांडगा अनुभव आहे. आपल्या सध्याच्या भूमिकेतून ते बँकेच्या व्यवसायात आधीपासूनच सक्रियपणे कार्यरत आहेत. बँक आपल्या प्रबळ पायावर सातत्याने प्रगती करत असताना बँकेचे स्थान अधिक दृढ करण्यासाठी आणि शाश्वत वाढ साधण्यासाठी आम्हाला अनुप यांच्या नेतृत्वाची मोठी मदत होईल. संचालक मंडळाच्या वतीने, मी कोटकला वाढीच्या पुढील टप्प्यावर नेण्यासाठी अनुप यांना शुभेच्छा देतो.”
कोटक महिंद्रा बँकेचे मॅनेजिंग डायरेक्टर आणि सीईओ अशोक वासवानी म्हणाले, “अनुप हे अनुभवी आर्थिक सेवा प्रमुख आहेत. त्यांना विविध व्यवसाय, ग्राहक वर्ग आणि संचालन कार्यपद्धतींचा सखोल अनुभव आहे. कोटकमध्ये रुजू झाल्यापासूनव त्यांनी आमच्या टीम्ससोबत जवळून काम केले आहे आणि आगामी संधींविषयीची स्पष्ट समज दर्शवली आहे. मला पूर्ण विश्वास आहे की, अनुप कोटकच्या प्रबळ पायावर पुढील वाटचाल करतील, ग्राहकांशी असलेले संबंध अधिक दृढ करतील आणि एका उद्दिष्टाने व शिस्तीने बँकेला पुढे नेतील. मी त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देतो.”
अनुप कुमार साहा म्हणाले, “माझ्यावर दाखवलेल्या विश्वासाबद्दल मी संचालक मंडळाचा आभारी आहे आणि कोटक महिंद्रा बँकेचे नेतृत्व करण्याची संधी मिळाल्याबद्दल मला अत्यंत आनंद होत आहे. कोटककडे सक्षम फ्रँचायझी, विश्वासार्ह ब्रँड आणि संपूर्ण संस्थेमध्ये अत्यंत प्रतिभावान कर्मचारी आहेत. ग्राहकांशी संबंध अधिक पक्का करण्यासाठी, अविरतपणे उद्दिष्टे साध्य करण्यासाठी, तसेच भागधारक आणि आमच्या सर्व संबंधितांसाठी शाश्वत मूल्य निर्माण करण्यासाठी मी माझ्या सहकाऱ्यांसोबत काम करण्यास उत्सुक आहे. ग्राहकांसाठी योग्य काम करण्यावर आणि त्यांना उत्तम सेवा देण्यावर आमचे लक्ष नेहमीप्रमाणे केंद्रित राहील.”
अनुप यांच्याकडे ३२ वर्षांहून अधिक काळाचा व्यावसायिक अनुभव आहे, त्यामध्ये बँकिंग आणि गैर-बँकिंग आर्थिक संस्थांमधील आर्थिक सेवा क्षेत्रातील २५ वर्षांच्या अनुभवाचा समावेश आहे. कोटकमध्ये रुजू होण्यापूर्वी त्यांनी बजाज फायनान्स लिमिटेडमध्ये विविध वरिष्ठ नेतृत्व पदांवर जबाबदारी सांभाळली, ज्यामुळे त्यांची मॅनेजिंग डायरेक्टर आणि सीईओ पदावर नियुक्ती झाली. त्यापूर्वी, आयसीआयसीआय बँक लिमिटेडमधील १४ वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी रिटेल सिक्युअर्ड अॅसेट्स, बिझनेस इंटेलिजन्स, रिटेल व रुरल कलेक्शन्स, क्रेडिट कार्ड्स आणि रिटेल स्ट्रक्चर्ड फायनान्स यांसारख्या विविध व्यवसाय व विभागांचे नेतृत्व केले.
आपल्या कारकिर्दीच्या सुरुवातीला अनुप यांनी जीई कॅपिटलमध्ये क्रेडिट कार्ड्स, सेल्स आणि अॅनालिटिक्स विभागात, तसेच भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेडमध्ये प्रॉडक्शन इंजिनिअरिंग विभागात काम केले. त्यांनी आयआयटी खडगपूरमधून इंजिनिअरिंगची बी.टेक पदवी आणि आयआयएम लखनौमधून एमबीए शिक्षण पूर्ण केले
आहे.


