Friday, October 2, 2026
Google search engine
HomeUncategorized*घोडेगाव येथे जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन उत्साहात साजरा* ...

*घोडेगाव येथे जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन उत्साहात साजरा* *सेवा संकल्प अभियानांतर्गत एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाचा स्तुत्य उपक्रम; ज्येष्ठांच्या अनुभवांचा गौरव*

 

 

पुणे, दि. २: ज्येष्ठ नागरिकांच्या प्रदीर्घ अनुभवांचा सन्मान आणि त्यांच्या योगदानाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याच्या उद्देशाने एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय, घोडेगाव यांच्या वतीने सेवानिवृत्त अधिकारी-कर्मचारी संघटनेच्या सहकार्याने जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला.

 

सेवा संकल्प अभियानांतर्गत एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय घोडेगाव यांच्यामार्फत विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. इंग्रजी माध्यमाच्या शासकीय आश्रमशाळा, घोडेगाव येथे झालेल्या या कार्यक्रमाला एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी गणेश इवनाते, सहायक प्रकल्प अधिकारी प्रियंका घनवट, संदीप पाटील, रुषाली घैसास, ज्येष्ठ नागरिक, अधिकारी, कर्मचारी तसेच संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्रीमती घनवट यांनी केले. ज्येष्ठ नागरिकांच्या जीवनानुभवातून समाजाला मिळणारे मार्गदर्शन, त्यांचे सामाजिक योगदान आणि नव्या पिढीला त्यांच्या अनुभवातून मिळणारी प्रेरणा यावर कार्यक्रमातून प्रकाश टाकण्यात आला.

 

इंग्रजी माध्यमाच्या शासकीय आश्रमशाळेचे मुख्याध्यापक गणेश गावडे यांनी कार्यक्रमाचे नियोजन व व्यवस्थापन उत्कृष्टपणे पार पाडले.

ज्येष्ठांच्या अनुभवांचा सन्मान करत त्यांच्या कार्याप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा हा उपक्रम भावनिक आणि प्रेरणादायी ठरला. ज्येष्ठांचा अनुभव ही समाजाची अमूल्य शिदोरी असून, त्या अनुभवाचा सन्मान करणे हीच पुढील पिढीची खरी जबाबदारी आहे, असा संदेश या कार्यक्रमातून अधोरेखित झाला. उत्साहपूर्ण वातावरणात पार पडलेल्या या उपक्रमाने उपस्थितांच्या मनात एक सकारात्मक आणि संस्मरणीय ठसा उमटवला.

 

यावेळी सेवानिवृत्त अधिकारी-कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष भारत शिंदे, उपाध्यक्ष हनुमंत काळे, सचिव दादाभाऊ लोहकरे, सहसचिव विठ्ठल चव्हाण, रमेश दोडके,शहाजी भापकर, बापुसाहेब रौदळ, शिला साळुंके, सुनिता कांबळे, रमेश कारले, उमाजी खमसे, दत्ता मेहेर, अलका भावसार आदी पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.

०००

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments