पुणे – श्री राजचंद्र मिशनच्या वतीने अहो गुरूदेव सोहळ्याचे औचित्य साधून एकाच वेळी तब्बल ६० समाजोपयोगी उपक्रमांचा घोषणा नुकतीच करण्यात आली. श्री राजचंद्र मिशन धरमपूरचे प्रणेते गुरुदेव श्री राकेशजी यांनी सामाजिक, आरोग्य, शिक्षण, मानसिक आरोग्य, पशुरुग्णालय व निवारा केंद्र, विशेष मुलांसाठी शैक्षणिक सुविधा, महिला सक्षणीकरणाचे उपक्रम…अशा क्षेत्रांत हे नवे ६० उपक्रम नजिकच्या काळात कार्यरत होतील, असे जाहीर केले.
गुरुदेव श्री राकेशजी यांच्या हिरक महोत्सवी वाढदिवसाचेही निमित्त या उद्घाषणेला लाभले होते. मुंबई येथील जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर येथे अहो गुरूदेव या विशेष सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्यासाठी उद्योग, विज्ञान, तंज्ञत्रान, आरोग्य, शिक्षण, मनोरंजन, कला, राजकारण आदी क्षेत्रांतील विविध मान्यवर आवर्जून उपस्थित होते. तसेच या सोहळ्यासाठी जगभरातील २४ देशांमधून आणि २१४ शहरांमधून मोठ्या संख्येने अनुयायी उपस्थित होते. उद्घोषित नव्या उपक्रमांमध्ये प्रामुख्याने आरोग्य, सेवाकार्य आणि अध्यात्म, या क्षेत्रांवर भर देण्यात आला आहे. कर्करोग रुग्णालय, वैद्यकीय महाविद्यालय, प्राणी रुग्णालये व निवारा केंद्रे, विशेष मुलांसाठी सुविधा केंद्रे आणि महिला सबलीकरणासाठीचे उपक्रम प्राधान्यक्रमावर असल्याचे गुरुदेवांनी जाहीर केले.
आध्यात्मिक केंद्रांसह ध्यानकेंद्रे, सहा नवीन सत्संग केंद्रे यांसह श्री गुरुदेवांच्या प्रवचनांचे विविध भाषांमध्ये प्रकाशन करण्याचा उपक्रम समाविष्ट आहे, अशी माहिती देण्यात आली. या सोहळ्याला स्वामी चिदानंद सरस्वती, बी. के. शिवानी, आनंदमूर्ती गुरूमा, भिक्खू संघसेनजी, मोरारी बापू या आध्यात्मिक गुरुंसह इन्फोसिसचे संस्थापक एन, आर. नारायणमूर्ती, टाटा सन्सचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन्, दीपक पारेख, अशोक हिंदुजा, दिलीप संघवी, संजीव कपूर, मनोज मोदी, विनोद अदानी, मंत्री मंगलप्रभात लोढा, खासदार हेमामालिनी, अभिनेते रणबीर कपूर, सोनम कपूर यांची प्रमुख उपस्थिती होती. सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय, शिक्षण व उद्योग क्षेत्रातील अनेक मान्यवरही या सोहळ्यासाठी उपस्थित होते. या नव्या समाजोपयोगी उपक्रमांच्या माध्यमातून सेवाभावाचे दर्शन घडते आणि हे प्रकल्प समाजातील सेवाभावी वृत्तीचे पुनर्जागरण करतील, अशी भावना या मान्यवरांनी यावेळी व्यक्त के
ली.
—


