Friday, October 2, 2026
Google search engine
HomeUncategorizedस्वच्छता ही सेवा अभियानातून जलसंधारणाला बळ*

स्वच्छता ही सेवा अभियानातून जलसंधारणाला बळ*

 

 

*PMKSY 2.0 अंतर्गत पाणलोट क्षेत्रात स्वच्छता, जलसंधारण व लोकसहभागावर भर*

 

पुणे, दि.२: प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना ; पाणलोट विकास घटक २ अंतर्गत “स्वच्छता ही सेवा २०२६” अभियान “स्वच्छ भारत, विकसित भारत” या संकल्पनेतून राबविण्यात आले. या अभियानाच्या माध्यमातून स्वच्छतेसोबतच जलसंधारण आणि जलस्रोतांच्या संवर्धनाला विशेष प्राधान्य देण्यात आले.

 

अभियानांतर्गत पाणलोट क्षेत्रातील जलसंधारण संरचनांची स्वच्छता व देखभाल, पावसाच्या पाण्याचे संकलन व संवर्धन, शोष खड्डे व पुनर्भरण खड्ड्यांना प्रोत्साहन तसेच नाले, ओढे, तलाव आणि शेततळ्यांचे संरक्षण यांसारखी विविध कामे करण्यात आली.

“एक दिवस, एक तास, एक साथ” या उपक्रमांतर्गत श्रमदानातून नागरिकांचा सक्रिय सहभाग नोंदविण्यात आला.

 

वृक्षारोपण व वृक्षसंवर्धनाच्या माध्यमातून पर्यावरण संवर्धनालाही चालना देण्यात आली. ग्रामस्थ, शेतकरी, बचतगट, युवक आणि विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेत स्वच्छता व जलसंधारणाच्या कार्याला हातभार लावला.

“स्वच्छ जलस्रोत : सुरक्षित जलस्रोत!” या संदेशातून स्वच्छता आणि जलसंधारण यांचा परस्पर संबंध अधोरेखित करण्यात आला.

 

स्वच्छ जलस्रोतांचे संरक्षण, पाण्याचा कार्यक्षम वापर आणि पाणलोट क्षेत्राचे संवर्धन यामुळे भविष्यातील जलसुरक्षेला बळकटी मिळणार आहे.

कामाची निर्मिती, नियमित देखभाल आणि लोकसहभाग या त्रिसूत्रीच्या माध्यमातून जलसंधारणाची कामे अधिक परिणामकारक व शाश्वत करण्याचा संकल्प या अभियानातून करण्यात आला. स्वच्छता, जलसंधारण आणि लोकसहभाग यांच्या एकत्रित प्रयत्नांतून पाणलोट क्षेत्र अधिक स्वच्छ, सक्षम आणि जलसमृद्ध करण्याचा संदेश या अभियानाने दिला.

 

००००

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments