Saturday, October 3, 2026
Google search engine
HomeUncategorizedटिना शर्मा घेवारे यांना ‘कलागौरव’ पुरस्कार जाहीर!

टिना शर्मा घेवारे यांना ‘कलागौरव’ पुरस्कार जाहीर!

 

पिंपरी-चिंचवड (प्रतिनिधी), दिनांक ३ ऑक्टोबर २०२६ : वयाच्या १३व्या वर्षापासून पिंपरी-चिंचवडच्या मातीत कलाकार म्हणून आपल्या प्रवासाला सुरुवात करणाऱ्या ” बोल मै हलगी बजाऊ क्या” गाण्याच्या अभिनेत्री व सामाजिक कार्यकर्त्या टिना शर्मा घेवारे यांना ‘कलागौरव’ पुरस्कार जाहीर झाला आहे. हा पुरस्कार त्यांना रविवार, ४ ऑक्टोबर २०२६ रोजी पिंपरी-चिंचवड कलाकार संघाच्या वतीने रामकृष्ण मोरे नाट्यगृह चिंचवड येथे प्रदान करण्यात येणार आहे.

 

आपल्या जन्मभूमीत ‘कलागौरव’ पुरस्काराने सन्मानित होणे हा अभिमानाचा आणि भावनिक क्षण असल्याची भावना टिना शर्मा घेवारे यांनी व्यक्त केली. रामकृष्ण नाट्यगृहापासून वयाच्या १३व्या वर्षी आपल्या कलाप्रवासाला सुरुवात झाली.पिंपरी-चिंचवड शहरानेच आपल्याला कलाकार म्हणून ओळख दिली असून, या शहराचे आणि कलेचे ऋण फेडण्यासाठी कलाकारांसाठी काम करणे ही आपली जबाबदारी असल्याचे त्यांनी सांगितले.

 

विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांचे कलाकारांच्या कामासाठी नेहमीच मोलाचे सहकार्य लाभत असते.कलाकारांच्या अडचणी समजून घेऊन त्यांना प्रोत्साहन देणे, आवश्यक ते मार्गदर्शन करणे आणि त्यांच्या प्रश्नांना पाठबळ देण्याची भूमिका ते सातत्याने बजावत असतात.त्यांच्या सहकार्यामुळे कलाकारांसाठी काम करण्यास अधिक बळ आणि आत्मविश्वास मिळतो, असेही घेवारे यांनी स्पष्ट केले.

 

DJ शो आणि अश्लील कार्यक्रमांविरोधात राबविलेली मोहीम, कलाकारांच्या विविध प्रश्नांसाठी केलेले सामाजिक कार्य तसेच कलाक्षेत्रातील योगदानाची दखल घेऊन हा पुरस्कार जाहीर करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. या सन्मानामुळे भविष्यात आणखी ताकदीने काम करण्याची प्रेरणा मिळणार असल्याचेही त्यांनी नमूद केले.कलाकारांना योग्य व्यासपीठ मिळवून देणे, त्यांच्या प्रश्नांसाठी आवाज उठविणे आणि त्यांना पुढे नेण्यासाठी प्रयत्न करणे हे काम यापुढेही सुरूच ठेवणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली.

 

“आपल्या कामाची दखल घेतली जाते, तेव्हा आणखी जोमाने काम करण्याचे बळ मिळते. हा सन्मान माझ्यासाठी नवी ऊर्जा आणि नवी जबाबदारी आहे.दरम्यान, ‘कलागौरव’ पुरस्कार ४ ऑक्टोबर रोजी प्रदान होणार असल्याने या सन्मानाबद्दल टिना शर्मा घेवारे यांनी विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, पिंपरी-चिंचवड कलाकार संघ, रसिक प्रेक्षक, सहकारी कलाकार आणि हितचिंतकांचे मनःपूर्वक आभार मानले आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments