‘अनप्लग करा आणि कुठेही वापरा’ या सर्वसमावेशक मोहिमेसह सादर, ही कंपनी डासांपासून संरक्षण केवळ प्लग पॉइंटपुरते मर्यादित न ठेवता त्यापलीकडे घेऊन जाते
पुणे, 7 ऑक्टोबर 2026: भारतातील आघाडीचा बॅटरी ब्रँड एव्हररेडी इंडस्ट्रीज इंडिया लिमिटेडने (Eveready Industries India Ltd.) एव्हररेडी अल्टिमा लिक्विड व्हेपोरायझर (Eveready ULTIMA Liquid Vaporiser) सादर करत डासांपासून संरक्षण देणाऱ्या उत्पादनांच्या श्रेणीत प्रवेश केला आहे. पोर्टेबल पॉवर क्षेत्रातील आपल्या प्रस्थापित कौशल्याचा वापर करून ग्राहकांच्या बदलत्या दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी कंपनी विविध संबंधित उत्पादन श्रेणींमध्ये विस्तार करत आहे. आणि हे उत्पादन म्हणजे एव्हररेडीच्या त्या धोरणाचाच एक भाग आहे.
भारतातील घरगुती कीटकनाशक बाजाराचे मूल्य सध्या 5,000 कोटी रुपयांपेक्षा अधिक आहे; यामध्ये लिक्विड व्हेपोरायझर्सचा वाटा सुमारे 2,800 कोटी रुपये असून या श्रेणीत चांगली वाढ दिसते आहे. पारंपरिक लिक्विड व्हेपोरायझर्स हे भिंतीवरील ठरावीक प्लग पॉइंट्सना जोडून ठेवण्याच्या पद्धतीने डिझाइन केलेले असतात, पण, डास मात्र घरातील विविध भागांमध्ये संचार करू शकतात. त्यामुळे, प्लग पॉइंटच्या उपलब्धतेचे बंधन न राहता घरातील विविध ठिकाणी डासांपासून संरक्षण देऊ शकेल, अशा अधिक लवचिक उपायाची गरज आहे.
या प्रसंगी ‘एव्हररेडी इंडस्ट्रीज इंडिया लिमिटेड’चे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) श्री. अनिर्बान बॅनर्जी म्हणाले: “एव्हररेडीने ग्राहकांना नेहमीच ऊर्जा आणि सुविधा देण्याचे काम केले आहे. ग्राहकांच्या बदलत्या गरजांनुसार आमच्या उत्पादनांच्या श्रेणीचा (पोर्टफोलिओचा) विस्तार झाला आहे. डासांपासून संरक्षणाच्या क्षेत्रात आमचा प्रवेश हा याच दृष्टिकोनाचा एक स्वाभाविक विस्तार आहे; यामुळे आम्हाला पोर्टेबल आणि रिचार्जेबल पॉवरमधील आमचे कौशल्य एका नवीन श्रेणीमध्ये आणता येणे शक्य होते आहे. एव्हररेडी अल्टिमा लिक्विड व्हेपोरायझर (Eveready ULTIMA Liquid Vaporiser) – जे भारतातील पहिले पोर्टेबल लिक्विड व्हेपोरायझर आहे – या उत्पादनाद्वारे आम्ही डासांपासून संरक्षण मिळवणे अधिक सोयीस्कर आणि ग्राहकांच्या सध्याच्या जीवनशैलीशी, मुख्य म्हणजे घराच्या रचनेशी सुसंगत बनवत आहोत. या उत्पादनाचे वैशिष्ट्य म्हणजे, ग्राहकांना डासांपासून संरक्षण देणारे हे उपकरण त्यांना जिथे खरंच गरज आहे, तिथे वापरण्याची सोय देते.
डासांमुळे होणारे आजार ही अजूनही चिंतेची बाब असल्याने, घरातील विविध कोपऱ्यांमध्ये लपलेल्या डासांपासून प्रभावी संरक्षणाच्या शोधात ग्राहक असतात. 99 डास नष्ट झाले, तरी उरलेला एक डासही कुटुंबाच्या आरोग्यासाठी आणि सुरक्षेसाठी धोका निर्माण करू शकतो. डास कोपऱ्यात लपून बसू शकतात, एका खोलीतून दुसऱ्या खोलीत जाऊ शकतात आणि अशा ठिकाणी प्रवेश करू शकतात जिथे नेहमीचे प्लग-इन व्हेपोरायझर्स सतत संरक्षण देऊ शकत नाहीत. डासांपासून संरक्षणाचे अनेक पर्याय ग्राहकांकडे उपलब्ध असले, तरी स्प्रे, कॉइल्स आणि अगरबत्ती यांसारख्या तत्काळ उपाययोजनांच्या बाबतीत धूर, उग्र वास आणि वारंवार वापराची गरज अशा समस्या उद्भवू शकतात.
“अनेक दशकांपासून मोठ्या प्रमाणात स्थिर राहिलेल्या एका पद्धतीचा हा पुनर्विचार आहे. आजच्या काळातील ग्राहकांची जीवनशैली आणि जागेचा वापर करण्याची त्यांची पद्धती, यानुसार आमची त्याची रचना करतो आहोत. हे लॉन्च म्हणजे आमच्या उद्देशपूर्ण विविधीकरणाच्या व्यापक धोरणाचा एक भाग आहे – ग्राहकांच्या संबंधित आणि उदयोन्मुख गरजा पूर्ण करणाऱ्या श्रेणींमध्ये प्रवेश करणे, यासाठीच एव्हररेडी ओळखले जाते आणि आम्ही तोच विश्वास सार्थ ठरवतो आहोत,” असे श्री. बॅनर्जी पुढे म्हणाले.
ग्राहकांना डासांपासून कुठेही संरक्षण मिळावे यासाठी एव्हररेडी अल्टिमा लिक्विड व्हेपोरायझर सादर करण्यात आले आहे, जेणेकरून ते एका निश्चित प्लग पॉईंटपुरते मर्यादित राहणार नाहीत. हे पोर्टेबल लिक्विड व्हेपोरायझर बेडरूम, मुलांची खेळण्याची जागा, बाल्कनी, बाथरूम आणि प्लग पॉईंटची सोय नसलेल्या इतर ठिकाणी सहजपणे नेऊन वापरता येते. याचा वापर कार आणि प्रवासाच्या इतर बंद पर्यायांमध्येही करता येतो.
अखंड संरक्षण देण्यासाठी डिझाइन केलेले, एव्हररेडी अल्टिमा हे एकमेव लिक्विड व्हेपोरायझर आहे जे पॉवर सोर्सला प्लग लावला नसला तरी चालते, ज्यामुळे वीजपुरवठा खंडित झाल्यावरही ते कार्यरत राहते. त्याचे रिचार्जेबल स्वरूप तीन तासांपर्यंत बॅटरी बॅकअप प्रदान करते, ज्यामुळे अचानक वीजपुरवठा खंडित झाल्यावरही कुटुंबांना कोणत्याही अडथळ्याशिवाय संरक्षित राहण्यास मदत होते..
प्रगत जपानी फॉर्म्युल्यासह, डेंग्यू, चिकुनगुनिया आणि मलेरियासारख्या आजारांना कारणीभूत ठरणाऱ्या डासांपासून हे 100% संरक्षण देते.
“जुन्या लिक्विड व्हेपोरायझर्स आता प्रभावी झाले आहे; डास नाही.” या संकल्पनेवर आधारित एकात्मिक मीडिया मोहिमेद्वारे उत्पादनाचे वैशिष्ट्यपूर्ण स्वरूप जिवंत केले आहे. लिक्विड व्हेपोरायझर्स वापरण्याच्या पारंपरिक पद्धतीला ही मोहीम आव्हान देते आणि एक साधी नवीन सवय दाखवते. “अनप्लग करा आणि कुठेही वापरा.” ब्रँडच्या मुख्य ग्राहकवर्गापर्यंत पोहोचणाऱ्या डिजिटल मीडिया आणि टेलिव्हिजन चॅनेलच्या साहाय्याने, या संवादासाठीची मीडिया रणनीती बाजारपेठांमध्ये हायपरलोकल टार्गेटिंग आणि मजबूत रिटेल उपलब्धता यांचा मेळ घालते. ही मोहीम जेवण, खेळ आणि अभ्यास यांसारख्या विविध दैनंदिन प्रसंगांचे सादरीकरण या मोहिमेत होताना दिसते. ज्यामुळे पारंपरिक प्लग पॉईंटच्या पलीकडे जाऊन डासांपासून ग्राहक संरक्षण कसे मिळवू शकतात हे दिसून येते. एका व्यापक 360-डिग्री मोहिमेचा हा एक भाग आहे, ज्याची व्याप्ती प्रिंट आणि आउटडोअर मीडियामध्ये आहे.
जाहिरातीची लिंक: https://www.youtube.com/watch?si=kBpaHQww62jrOia8&v=haQWFd-AKEA&feature=youtu.be
एव्हररेडीचा (Eveready) विस्तार जवळपास 45 लाख विक्री केंद्रांपर्यंत (outlets) आहे—ज्यामध्ये वितरकांमार्फत थेट सेवा दिली जाणारी सुमारे 5 लाख विक्री केंद्रे समाविष्ट आहेत—त्यामुळे या नवीन श्रेणीसाठी भक्कम वितरण व्यवस्था उभारण्याच्या दृष्टीने कंपनीची स्थिती अत्यंत अनुकूल आहे. डासांपासून संरक्षण ही घरगुती खरेदीतील एक महत्त्वाची बाब आहे; त्यामुळे, आपल्या व्यापक वितरण जाळ्याचा वापर करून एव्हररेडी अल्टिमा लिक्विड व्हेपोरायझर (Eveready ULTIMA liquid vaporiser) ग्राहकांपर्यंत अधिक प्रभावीपणे पोहोचवण्याची संधी कंपनीला मिळाली आहे. मॉडर्न ट्रेड आणि क्विक-कॉमर्स ही देखील कंपनीसाठी विस्तारित विक्री-माध्यमे आहेत; डासांपासून सोयीस्कर आणि प्रभावी संरक्षणाच्या शोधात असलेल्या ग्राहकांपर्यंत हे उत्पादन पोहोचवण्यासाठी या माध्यमांचाही पुरेपूर वापर केला जाईल.
उत्पादनाची वैशिष्ट्ये
एव्हररेडीची निर्मिती: पेटंट-अप्लायड (पेटंटसाठी अर्ज केलेल्या) नावीन्यपूर्ण तंत्रज्ञानाद्वारे, एव्हररेडी ऊर्जा क्षेत्रातील आपल्या नैपुण्याचा वापर करून डासांपासून संरक्षण देणारे उत्पादन सादर करत आहे.
या श्रेणीतील पहिलेच उत्पादन: एव्हररेडी अल्टिमा (Eveready ULTIMA) हे एकमेव असे लिक्विड वेपोरायझर आहे जे प्लग पॉइंटला न जोडताही चालू शकते. यामुळे बेडरूम, मुलांची खेळण्याची जागा, बाल्कनी, बाथरूम आणि जिथे प्लग पॉइंटची सोय नाही अशा इतर जागांवर, तसेच कारमध्ये आणि प्रवासादरम्यानही डासांपासून संरक्षण मिळवणे अधिक सोयीचे ठरते.
प्रगत जपानी फॉर्म्युला: डेंग्यू, चिकुनगुनिया आणि मलेरिया पसरवणाऱ्या डासांपासून 100% संरक्षण.
3 तासांपर्यंत बॅटरी बॅकअप: रिचार्ज करता येण्याजोग्या डिझाइनमुळे वीज नसतानाही वापर करणे शक्य.
Type-C चार्जिंग: लॅपटॉप, पॉवर बँक किंवा कारचा वापर करून हे सहजपणे रिचार्ज करता येते.
विविध प्रकार आणि माध्यमांमध्ये उपलब्ध: एव्हररेडी अल्टिमा पोर्टेबल लिक्विड वेपोरायझरची किंमत ₹299 आहे. या श्रेणीमध्ये ‘प्लग-इन लिक्विड वेपोरायझर’ आणि 2, 4 तसेच 6 च्या पॅकमध्ये मिळणारी रिफिल्स यांचाही समावेश आहे. ही उत्पादने ई-कॉमर्स, मॉडर्न ट्रेड (मोठी रिटेल दुकाने/मॉल) आणि स्थानिक दुकाने अशा
सर्व माध्यमांतून उपलब्ध आहेत.


