Friday, October 9, 2026
Google search engine
HomeUncategorizedएनडीआरएफ वाइव्ह्स वेल्फेअर असोसिएशनकडून एम्पॉवरसोबत सहयोगाने ‘प्रोजेक्ट निर्मल' लाँच, एनडीआरएफ जवान आणि...

एनडीआरएफ वाइव्ह्स वेल्फेअर असोसिएशनकडून एम्पॉवरसोबत सहयोगाने ‘प्रोजेक्ट निर्मल’ लाँच, एनडीआरएफ जवान आणि त्यांच्या कुटुंबियांना सर्वसमावेशक मानसिक आरोग्य व मनोसामाजिक पाठबळ देणार

 

पुणे, ऑक्टोबर ९, २०२६: एनडीआरएफ वाइव्ह्स वेल्फेअर असोसिएशनने (एनडब्ल्यूडब्ल्यूए) देशभरातील एनडीआरएफचे जवान आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी समर्पित मेंटल हेल्थ अँड सायकोसोशल सपोर्ट (एमएचपीएसएस) उपक्रम ‘प्रोजेक्ट निर्मल’ लाँच करण्यासाठी आदित्य बिर्ला एज्युकेशन ट्रस्ट (एबीईटी) अंतर्गत श्रीमती नीरजा बिर्ला यांनी स्थापन केलेल्या पॅन-इंडिया मानसिक आरोग्य सेवा प्रदाता एम्पॉवरसोबत सामंजस्य करारावर (एमओयू) स्वाक्षरी केली आहे.

आपत्तीच्या काळात एनडीआरएफच्या बचावकर्त्यांना येणारा तीव्र ताणतणाव, शारीरिक आव्हाने आणि अचानक करावी लागणारी तैनाती लक्षात घेऊन व्यावसायिक ताणतणावाचे व्यवस्थापन करणे आणि मानसिक आरोग्याविषयीचा सामाजिक कलंक दूर करणे हा या संस्थात्मक सहयोगाचा उद्देश आहे.

‘प्रोजेक्ट निर्मल’ मानसिक आरोग्याविषयी जनजागृती सत्रे, नियमित मानसिक तपासणी, वैयक्तिक व समूह समुपदेशन, टेलि-समुपदेशन, क्रायसिस इंटरव्हेन्शन, आत्महत्या प्रतिबंध आणि आवश्यक आधार यांचा समावेश असलेली सर्वसमावेशक केअर सातत्य यंत्रणा प्रदान करतो.

संपूर्ण भारतात व्यापक पोहोच सुनिश्चित करण्यासाठी प्रमुख प्रादेशिक केंद्रांमध्ये हब-आधारित टीम्स तयार केल्या जातील. याव्यतिरिक्त, मानसिक आरोग्य तज्ज्ञांद्वारे चालवली जाणारी २४/७ समर्पित बहुभाषिक हेल्पलाइन जवान आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना चोवीस तास मार्गदर्शन उपलब्ध करून देईल.

एनडब्ल्यूडब्ल्यूएच्या प्रेसिडंट श्रीमती प्रीती आनंद म्हणाल्या की, “दलाचे मनोबल, सज्जता आणि एकूण प्रतिसाद परिणामकारकता टिकवून ठेवण्यासाठी बचावकर्ते आणि त्यांच्या कुटुंबियांच्या भावनिक आरोग्याला प्राधान्य देणे आवश्यक आहे.”

या उपक्रमाबाबत मत व्यक्त करत आदित्य बिर्ला एज्युकेशन ट्रस्ट, एम्पॉवरच्या फाउंडर आणि चेअरपर्सन श्रीमती नीरजा बिर्ला म्हणाल्या, “मानसिक स्वास्थ्य हे प्रत्यक्ष प्रतिसाद सिस्टमच्या ताकदीचाच एक अविभाज्य भाग आहे हे ओळखल्याबद्दल आम्ही एनडीआरएफचे मनापासून कौतुक करतो. ‘प्रोजेक्ट निर्मल’च्या माध्यमातून एम्पॉवर एनडीआरएफ वाइव्ह्स वेल्फेअर असोसिएशनसोबत मिळून आघाडीवरील कर्मचारी आणि एनडीआरएफच्या कुटुंबियांना संरचित मानसिक आरोग्य साहाय्य पुरवण्यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल टाकत आहे. हा सहयोग एम्पॉवरच्या देशव्यापी व्हिजनची सुरुवात निदर्शनास आणतो, ज्याद्वारे चोवीस तास देशाची सेवा करणाऱ्यांसाठी मानसिक आरोग्य सेवेला पद्धतशीरपणे संस्थात्मक स्वरूप देणे आणि एकात्मिक मानसिक आरोग्य साहाय्य सिस्टम्स तयार करण्यासाठी कार्य केले जात आहे.”

केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (सीआयएसएफ), केंद्रीय राखीव पोलीस दल (सीआरपीएफ) आणि संपूर्ण महाराष्ट्रातील पोलीस दलांसह भारतातील गणवेशधारी आणि आघाडीच्या सेवांसोबत काम करण्याचा, तसेच अति-तणावाच्या वातावरणात मानसिक आरोग्य समुपदेशन व मनोसामाजिक पाठबळ पुरवण्याचा व्यापक अनुभव एम्पॉवरकडे आहे. सीआयएसएफसोबत ‘प्रोजेक्ट मन’सारख्या दीर्घकालीन उपक्रमांद्वारे एम्पॉवरने जनजागृती, वेळेत निदान, समुपदेशन, क्षमता बांधणी आणि व्यावसायिक मदतीची उपलब्धता यांना एकत्र आणणारा संस्थात्मक दृष्टिकोन विकसित केला आहे. या अनुभवाने स्पष्ट केले आहे की, मानसिक आरोग्य हे केवळ संकटकाळात तात्पुरता दिलासा देण्यापुरते मर्यादित न राहता जवानांसाठी सपोर्ट इकोसिस्टमचा अविभाज्य आणि शाश्वत भाग बनणे महत्त्वाचे आहे. या अनुभवावर आधार घेत, एम्पॉवरचा ‘प्रोजेक्ट निर्मल’ समाज आणि देशाच्या रक्षणात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या फ्रंटलाइन वर्कर्स आणि त्यांच्या कुटुंबियांच्या मानसिक आरोग्य व स्वास्थ्याला पद्धतशीरपणे दृढ करण्याच्या एम्पॉवरच्या संपूर्ण भारतातील दृष्टिकोनामधील पहिले पाऊल

ठरतो.

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments