Wednesday, November 25, 2026
Google search engine
HomeUncategorizedजीएसकेकडून रिलॅप्स्ड/रिफ्रॅक्टरी मल्टिपल मायलोमाच्या उपचारांसाठी सीडीएससीओ-मंजूर ब्लेनरेप लाँच

जीएसकेकडून रिलॅप्स्ड/रिफ्रॅक्टरी मल्टिपल मायलोमाच्या उपचारांसाठी सीडीएससीओ-मंजूर ब्लेनरेप लाँच

 

 

ब्लेनरेपला यापूर्वी किमान एक उपचार घेतलेल्या प्रौढ रुग्णांमध्ये पुन्हा उद्भवलेल्या (रिलॅप्स्ड) किंवा उपचारांना दाद न देणाऱ्या (रिफ्रॅक्टरी) मल्टिपल मायलोमासाठी कॉम्बिनेशन थेरपी म्हणून भारतात मंजूरी मिळाली आहे.

मल्टिपल मायलोमा जागतिक स्तरावर दुसरा सर्वात सामान्य रक्ताचा कर्करोग आहे, २०२४ मध्ये जगभरात या आजाराच्या १,९६,००० हून अधिक नवीन केसेस नोंदवल्या गेल्या आहेत, ज्यात भारतातील १७,५२९ नवीन केसेसचा समावेश आहे. हा आजार सामान्यतः उपचार करण्यायोग्य मानला जातो, पण पूर्णपणे बरा होत नाही.

ब्लेनरेपच्या लाँचमुळे जीएसकेची भारतातील तिसरी प्रिसिजन ऑन्कोलॉजी थेरपी सादर झाली आहे, तसेच दुर्लक्षित वैद्यकीय गरजा असलेल्या क्षेत्रांमध्ये प्रगत कर्करोग उपचारांची उपलब्धता सुधारण्याची कंपनीची कटिबद्धता अधिक दृढ झाली आहे.

या थेरपीला ड्रीम-७ (DREAMM-7) आणि ड्रीम-८ (DREAMM-8) फेज III वैद्यकीय चाचण्यांतील प्रबळ पुराव्यांचे पाठबळ आहे, ज्यामध्ये आजार न वाढता जगण्याचा कालावधी सध्याच्या प्रमाणित उपचारांच्या तुलनेत जवळपास तिप्पट झाल्याचे दिसून आले आहे.

मुंबई, २४ नोव्हेंबर २०२६: ग्लॅक्सोस्मिथक्लाइन फार्मास्युटिकल्स लिमिटेडने (जीएसके इंडिया) आज भारतात ब्लेनरेप (बेलांटामॅब मॅफोडोटिन)च्या लाँचची घोषणा केली. यापूर्वी किमान एक उपचार पद्धती घेतलेल्या आणि पुन्हा उद्भवलेल्या (रिलॅप्स्ड) किंवा उपचारांना दाद न देणाऱ्या (रिफ्रॅक्टरी) मल्टिपल मायलोमाच्या प्रौढ रुग्णांसाठी कॉम्बिनेशन थेरपी म्हणून हे औषध सादर करण्यात आले आहे. मल्टिपल मायलोमासाठी बी-सेल मॅच्युरेशन अँटीजेनला (बीसीएमए) लक्ष्य करणारे जगातील पहिले मंजूर अँटीबॉडी-ड्रग कॉन्ज्युगेट (एडीसी) म्हणून ब्लेनरेप भारतातील रुग्णांसाठी नवीन उपचार पद्धती आणते आणि महत्त्वाच्या ड्रीम (DREAMM) क्लिनिकल प्रोग्रॅममधील प्रबळ पुराव्यांवर आधारित नाविन्यपूर्ण थेरपीची उपलब्धता विस्तारते.

मल्टिपल मायलोमा हे गंभीर जागतिक आरोग्य आव्हान आहे. ग्लोबोकॅनच्या आकडेवारीनुसार २०२४ मध्ये जगभरात या आजाराच्या १,९६,००० हून अधिक नवीन केसेस नोंदवल्या गेल्या आहेत. भारतात सर्व नवीन कर्करोगाच्या केसेसमध्ये मल्टिपल मायलोमाचे प्रमाण १.१ टक्‍के आहे. पण वाढते आयुर्मान, सुधारित आरोग्यसेवा आणि वेगाने होणारे शहरीकरण यांमुळे भविष्यात मल्टिपल मायलोमाचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे.

भारतातील मल्टिपल मायलोमा उपचारांच्या विशिष्ट परिस्थितीमुळे हे आव्हान अधिकच गुंतागुंतीचे बनते. पाश्चात्य देशांतील लोकसंख्येच्या तुलनेत भारतातील रुग्णांमध्ये या आजाराचे निदान एक दशक लवकर होते आणि हा आजार वारंवार पुन्हा उद्भवणारा असल्यामुळे आजारावर दीर्घकाळ नियंत्रण ठेवू शकणाऱ्या उपचारांची येथे नितांत गरज आहे. तसेच, भारतातील शहरे आणि विभागांनुसार विशेष वैद्यकीय पायाभूत सुविधांच्या उपलब्धतेमध्ये मोठी तफावत असू शकते, ज्यामुळे विविध ऑन्कोलॉजी उपचार केंद्रांमध्ये दिल्या जाऊ शकतील अशा उपचार पर्यायांची आवश्यकता असते. ब्लेनरेप-आधारित उपचार पद्धती पुन्हा उद्भवलेल्या किंवा उपचारांना दाद न देणाऱ्या मल्टिपल मायलोमाच्या व्यापक रुग्णगटामध्ये लक्षणीय आणि दीर्घकालीन आजार नियंत्रण दर्शवून या गरजा पूर्ण करतात.

ब्लेनरेपला ड्रीम (ड्रायव्हिंग एक्सलन्स इन अॅप्रोचेस टू मल्टिपल मायलोमा) क्लिनिकल प्रोग्रॅममधील व्यापक पुराव्यांचे पाठबळ आहे, ज्यामध्ये ड्रीम-७ आणि ड्रीम-८ या महत्त्वाच्या फेज III अभ्यासांचा समावेश आहे. या दोन्ही चाचण्यांमध्ये, पुन्हा उद्भवलेल्या किंवा उपचारांना दाद न देणाऱ्या मल्टिपल मायलोमाच्या द्वितीय-स्तरीय आणि त्यानंतरच्या उपचारांमध्ये ब्लेनरेप-आधारित उपचार पद्धतींनी आजार न वाढता जगण्याच्या कालावधीत वैद्यकीयदृष्ट्या महत्त्वपूर्ण सुधारणा आणि एकूण जगण्याच्या कालावधीत उत्साहवर्धक परिणाम दर्शवले आहेत.

ड्रीम-७ चाचणीमध्ये, ब्लेनरेप-आधारित उपचार पद्धतीने [ब्लेनरेपसोबत बोर्टेझोमिब आणि डेक्सामेथासोन (BorDex)] ३६.६ महिन्यांचा सरासरी प्रोग्रेशन-फ्री सर्व्हायव्हल (पीएफएस) साध्य केला, जो दारातुमुमॅब-आधारित तुलनात्मक उपचार पद्धतीच्या [दारातुमुमॅब आणि BorDex] १३.४ महिन्यांच्या तुलनेत खूप अधिक आहे. तसेच तुलनात्मक पद्धतीच्या तुलनेत आजार वाढण्याचा किंवा मृत्यूचा धोका ५९ टक्‍के कमी झाल्याचे दिसून आले. ड्रीम-८ चाचणीमध्ये, ब्लेनरेप-आधारित उपचार पद्धतीने [ब्लेनरेप (बेलांटामॅब मॅफोडोटिन) सोबत पोमालिडोमाइड आणि डेक्सामेथासोन (PomDex)] ३२.६ महिन्यांचा सरासरी पीएफएस साध्य केला, जो पोमालिडोमाइड-आधारित तुलनात्मक पद्धतीच्या [बोर्टेझोमिब आणि PomDex] १२.५ महिन्यांच्या तुलनेत खूप अधिक आहे, तसेच यामध्ये आजार वाढण्याचा किंवा मृत्यूचा धोका ५१ टक्‍के कमी झाल्याचे दिसून आले.

जीएसके इंडियाचे मॅनेजिंग डायरेक्टर भूषण अक्षिकर म्हणाले, “भारतातील कर्करोगाचा वाढता भार रुग्ण, कुटुंबे आणि देशाच्या आरोग्य व्यवस्थेवर वाढता ताण निर्माण करत आहे, ज्यामुळे सातत्यपूर्ण नाविन्यता आणि प्रगत उपचार पर्यायांची व्यापक उपलब्धता यांवर अधिक भर देण्याची गरज अधोरेखित होते. जीएसकेमध्ये, आमची अत्यंत महत्त्वाच्या आणि अपूर्ण वैद्यकीय गरजा असलेल्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करून वैविध्यपूर्ण विज्ञानाच्या माध्यमातून कर्करोग उपचारांची दिशा बदलण्याची महत्त्वाकांक्षा आहे.”

ते पुढे म्हणाले, “गेल्या वर्षी आम्ही घन गाठींच्या (सॉलिड ट्यूमर्स) उपचारांसाठी जेम्पर्ली आणि झेजुलाद्वारे देशात आमचा ऑन्कोलॉजी प्रवास सुरू केला. ब्लेनरेपच्या लाँचसह आम्ही हेमॅटो-ऑन्कोलॉजी (रक्ताचा कर्करोग) क्षेत्रात विस्तार करत आहोत आणि प्रगत कर्करोग असलेल्या अधिकाधिक रुग्णांप्रती आमची कटिबद्धता अधिक दृढ करत आहोत. मल्टिपल मायलोमासह जगणाऱ्या व्यक्तींसाठी आजार पुन्हा उद्भवणे हा उपचार प्रवासाचा वारंवार येणारा भाग असू शकतो8, आणि आम्ही त्यांच्या उपचारांच्या प्रत्येक टप्प्यावर त्यांना पाठबळ देण्यासाठी कटिबद्ध आहोत.”

वैद्यकीय वैशिष्ट्यांच्या पलीकडे जाऊन ब्लेनरेप सोयीस्कर आणि लवचिक उपचारांचा अनुभव देते. ही थेरपी बाह्यरुग्ण विभागात (ओपीडी) अवघ्या ३० मिनिटांच्या इन्फ्युजनद्वारे दिली जाते1 आणि यासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल होण्याची गरज भासत नाही, ज्यामुळे नियमित वैद्यकीय प्रक्रियेत रुग्णांना ही प्रगत थेरपी सहज उपलब्ध होऊ शकते.

जीएसके इंडियाच्या मेडिकल अफेअर्सच्या ईव्हीपी डॉ. शालिनी मेनन म्हणाल्या, “गेल्या दशकातील ऑन्कोलॉजीमधील सर्वात महत्त्वाच्या घडामोडींपैकी एक म्हणजे आजाराच्या जीवशास्त्रावर आधारित तयार केलेल्या थेरपींचा उदय होय. ब्लेनरेपची वेगळी कार्यपद्धती या थेरपीला विशेष बनवते. ही पद्धती थेट अँटी-मायलोमा क्रियेसोबत रोगप्रतिकारशक्तीचा प्रभावी वापर करते, ज्यामुळे सखोल आणि दीर्घकाळ टिकणारे परिणाम साध्य होण्यास मदत होते. भारतातील रुग्णांसाठी कर्करोग उपचारांमधील ही अत्यंत महत्त्वाची प्रगती आहे.”

ब्लेनरेपची सुरक्षितता आणि सहनशीलता सुस्पष्ट आहे, तसेच यामध्ये डोळ्यांशी संबंधित अंदाज बांधता येण्याजोगे आणि पूर्ववत होऊ शकणारे दुष्परिणाम दिसू शकतात, ज्यांचे व्यवस्थापन सुरुवातीपासून उपचार प्रक्रियेत समाविष्ट केलेल्या प्रस्थापित डोस मॉडिफिकेशन नियमांद्वारे केले जाऊ शकते. पात्र रुग्ण उपचारांची परवडणारी क्षमता आणि उपलब्धता सुधारण्यासाठी डिझाइन केलेल्या जीएसकेच्या फिनिक्स पेशंट सपोर्ट प्रोग्रॅमचा

लाभ घेऊ शकतात

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments