९ ऑक्टोबर २०२६ पुणे
पुणे स्त्री आरोग्य संघटना, नॅशनल मेडिकोस ऑर्गनायझेशन, रोटरी क्लब आणि विश्वकल्याण भारती ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येणाऱ्या जनसेहत सेतू उपक्रमांतर्गत ९ ऑक्टोबर २०२६ रोजी पुणे शहरातील विविध वस्त्या, क्लिनिक्स व रुग्णालयांमध्ये ६० ठिकाणी मोफत महिला आरोग्य तपासणी व मधुमेह तपासणी शिबिरे आयोजित करण्यात आली. या शिबिरांमधून 2००० हून अधिक महिलांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली, तसेच महिलांना मोफत वैद्यकीय सल्ला व आवश्यक औषधोपचार देण्यात आले. या महिन्यातील शिबिरामध्ये मधुमेह, रक्तातील साखरेचे प्रमाण, रक्तदाब तपासणी, पोषणविषयक मूल्यांकन, रक्तक्षयाबाबत जनजागृती तसेच स्तनांच्या स्वयं तपासणीविषयी मार्गदर्शन करण्यात आले.
जनसेहत सेतू उपक्रमाचे उद्घाटन १० एप्रिल २०२६ रोजी पुण्यातील विमाननगर येथील मॅटकेअर मॅटर्निटी अँड चाइल्ड हॉस्पिटलमध्ये माननीय केंद्रीय मंत्री श्री मनसुखजी मांडवीया आणि महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक आरोग्यमंत्री माननीय श्री प्रकाश आबिटकर यांच्या उपस्थितीत करण्यात आले होते. या उपक्रमाद्वारे डॉक्टरांनी दर महिन्यातील एक दिवस गरजू महिलांच्या मोफत आरोग्यसेवेसाठी देणे, ही संकल्पना राबविण्यात येत आहे. त्यानुसार दर महिन्याच्या ९ तारखेला पुणे व पिंपरी-चिंचवड परिसरातील विविध ठिकाणी मोफत महिला आरोग्य शिबिरे घेतली जात आहेत.
मॅटकेअर मॅटर्निटी अँड चाइल्ड हॉस्पिटलमध्ये डॉ. अमोल लुणकड व त्यांच्या वैद्यकीय टीमच्या पुढाकारातून आयोजित शिबिरातही महिलांची मोफत तपासणी व औषधवाटप करण्यात आले. महिलांच्या आरोग्याच्या विविध पैलूंवर दर महिन्याला विशेष भर देण्यात येतो, अशी माहिती संयोजकांनी दिली. महिलांचे आरोग्य सुदृढ असेल तर कुटुंब आणि समाज निरोगी राहतो. समाजातील प्रत्येक महिलेला गुणवत्तापूर्ण आरोग्यसेवा मिळावी, हा या उपक्रमाचा उद्देश असल्याचे आयोजकांनी सांगितले. “निरोगी महिला – निरोगी कुटुंब – निरोगी समाज” हेच जनसेहत सेतू उपक्रमाचे प्रमुख ध्ये
य आहे.


