Monday, October 12, 2026
Google search engine
HomeUncategorizedक्विक हील फाऊंडेशनकडून सायबर शिक्षित गाव उपक्रम लाँच, अर्जुनी गावाला भारतातील पहिले...

क्विक हील फाऊंडेशनकडून सायबर शिक्षित गाव उपक्रम लाँच, अर्जुनी गावाला भारतातील पहिले सायबर-सुरक्षित गाव बनवण्याचा संकल्प

 

‘सायबर शिक्षा, सायबर सुरक्षा’ उपक्रमांतर्गत राबवला जाणारा हा प्रमुख उपक्रम जनजागृती, घरोघरी जाऊन संवाद आणि प्रत्यक्ष डिजिटल सुरक्षा उपायांच्या माध्यमातून संपूर्ण गावाला सायबर-सुरक्षित करण्यासाठी कार्य करेल.

पुणे, १२ ऑक्टोबर २०२६: क्विक हील फाऊंडेशन या जागतिक सायबर सुरक्षा सोल्यूशन्स प्रदाता क्विक हील टेक्नॉलॉजीस लिमिटेडच्या सीएसआर शाखेने कोल्हापूरमधील अर्जुनी गावात ‘सायबर शिक्षित गाव’ उपक्रम दाखल केला आहे.यया गावाला भारतातील पहिले सायबर-सुरक्षित गाव बनवण्याचा मनसुबा आहे. क्विक हील फाऊंडेशनचा प्रमुख उपक्रम ‘सायबर शिक्षा, सायबर सुरक्षा’चा भाग म्हणून राबवला जाणारा हा उपक्रम सायबर सुरक्षेबाबत संपूर्ण समुदायाला एकत्र आणणारा दृष्टिकोन स्वीकारतो.

डिजीटल माध्यमांचा वापर वाढतो आहे. पण त्याच्या वापरासंदर्भातील जनजागृती करण्याच्या दृष्टीकोनातून क्विक हिलने हे सर्वेक्षण अर्जूनी गावात केले. अर्जुनी गावाची लोकसंख्या अंदाजे १,४०६ इतकी आहे. एका बेसलाइन सर्व्हेमध्ये २७३ कुटुंबांचा समावेश करण्यात आला होता, ज्यामध्ये ५३९ स्मार्टफोन वापरकर्त्यांसह एकूण ६७५ मोबाइल वापरकर्ते आढळले. सर्व्हे केलेल्या कुटुंबांपैकी १९३ कुटुंबांनी दररोज इंटरनेट वापरत असल्याचे सांगितले, तर १५५ कुटुंबांनी नियमित किंवा अधूनमधून यूपीआय वापरत असल्याचे सांगितले. यामधून डिजिटल वापरात वाढ होत असताना सायबर साक्षरता मजबूत करण्याची गरज अधोरेखित होते. गावातील पुढील मूल्यांकनादरम्यान वापरकर्त्यांच्या नकळत डिवाईसेसमध्ये सुरक्षेतील त्रुटी आणि संवेदनशील माहिती उघड होत असल्याचे समोर आले. आर्थिक सायबर फसवणुकीची तक्रार नोंदवण्यासाठी महत्त्वाच्या असलेल्या पहिल्या तीन तासांबद्दल म्हणजे ‘गोल्डन विंडो’बद्दल माहिती अत्यंत मर्यादित होती, ज्यामुळे वेळेवर हस्तक्षेप आणि पैसे परत मिळण्याची शक्यता कमी होते. या त्रुटी दूर करणे हे सायबर शिक्षित गाव उपक्रमाचे उद्दिष्ट आहे.

क्विक हील फाऊंडेशनच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेले देवचंद कॉलेज, अर्जुनी येथील सायबर वॉरियर क्लबचे सदस्य या उपक्रमाच्या केंद्रस्थानी आहेत. हे तरुण स्वयंसेवक घरोघरी जाऊन संवाद साधत आहेत आणि संरचित जनजागृती सत्रे आयोजित करत आहेत, तसेच नागरिकांना त्यांच्या डिवाईसेस आणि खात्यांवर आवश्यक सुरक्षा उपाय लागू करण्यास मदत करत आहेत. त्यांच्या या सहभागामधून निदर्शनास येते की, सक्षम तरुण व्यक्तींच्या वर्तनात सकारात्मक बदल घडवून आणू शकतात आणि संपूर्ण समाजाचे रक्षण करू शकतात.

या सर्वेक्षणाच्या निष्कर्षानुसार, मोबाइल अँड डिजिटल सिक्युरिटी चेक-अप कॅम्पच्या माध्यमातून ५१९ मोबाइल डिवाईसेसचे नऊ सुरक्षा निकषांवर मूल्यांकन करण्यात आले. जवळपास ४४५ डिवाईसेसमध्ये पाच किंवा त्याहून अधिक सुरक्षा त्रुटी आढळल्या. अशा वेळी सायबर वॉरियर्सनी गावकऱ्यांना अॅप परवानग्या, प्रायव्हसी सेटिंग्स, खाते सुरक्षा, डिवाईस संरक्षण आणि सुरक्षित डिजिटल पद्धती अधिक मजबूत करण्यास मदत केली.

सामुदायिक सत्रांमध्ये ओटीपी, पिन व पासवर्ड सुरक्षा, यूपीआय आणि क्यूआर-कोड फसवणूक, बनावट केवायसी आणि कस्टमर-केअर स्कॅम्स, सोशल मीडिया आणि व्हॉट्सअॅप सुरक्षा, मुले व ज्येष्ठ नागरिकांची सुरक्षा, तसेच सायबर गुन्ह्यांची तक्रार नोंदवणे या विषयांचा समावेश होता. गावकऱ्यांना संशयास्पद हालचाली दिसल्यास घाई न करता थांबणे, खातरजमा करणे आणि तक्रार नोंदवणे, तसेच आर्थिक सायबर गुन्ह्याच्या बाबतीत तत्काळ १९३० या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले.

नागरिकांना मार्गदर्शन करण्यासाठी, तक्रार नोंदणीत मदत करण्यासाठी आणि स्थानिक स्तरावर प्रतिसाद समन्वयासाठी अर्जुनी ग्रामपंचायतींतर्गत गाव सायबर सुरक्षा समिती स्थापन करण्यात आली आहे. व्हॉट्सअॅप सायबर सेफ्टी नेटवर्कसह १० बॅनर्स आणि मोक्याच्या ठिकाणी लावण्यात आलेली ६ वॉल पेंटिंग्स संपूर्ण गावात सायबर सुरक्षेबाबत जनजागृती करत राहतील.

सायबर शिक्षित गाव उपक्रमाचे उद्दिष्ट डिजिटलदृष्ट्या जागरूक, सायबर-सुरक्षित आणि सायबर-सक्षम गाव निर्माण करणे हे आहे, जे गावकऱ्यांना त्यांचे डिवाईसेस आणि माहिती सुरक्षित ठेवण्यास, सुरक्षित ऑनलाइन व्यवहार करण्यास, फसवणूक ओळखण्यास आणि सायबर गुन्ह्यांना त्वरित प्रतिसाद देण्यास सक्षम बनवते. या उपक्रमाच्या माध्यमातून क्विक हील फाऊंडेशन सामाजिक कल्याणासाठी आणि अधिक सुरक्षित डिजिटल समुदाय घडवण्यासाठी आपल्या सायबर सुरक्षा ज्ञानाचा सातत्याने उपयोग करत आहे, असे क्विक हील फाऊंडेशनच्या (Quick Heal Foundation) चेअरपर्सन आणि क्विक हील टेक्नॉलॉजीस लिमिटेडच्या चीफ ऑफ ऑपरेशनल एक्सलन्स अनुपमा काटकर यांनी सां

गितले.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments