Wednesday, August 19, 2026
Google search engine
HomeUncategorizedवधूंना शुल्कात ५० टक्के सवलत, ब्राह्मण वधू वर मेळाव्याची जय्यत तयारी*

वधूंना शुल्कात ५० टक्के सवलत, ब्राह्मण वधू वर मेळाव्याची जय्यत तयारी*

 

पुणे दि. ७ (प्रतिनिधी)-

ब्राह्मण वधू वर मेळावा आता पंधरा दिवसांवर येऊन ठेपला आहे. दि. २१ एप्रिल रोजी होणाऱ्या या मेळाव्याला येण्यासाठी मुलींना प्रोत्साहन मिळावे म्हणून मुलींना शुल्कात ५० टक्के सवलत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती संयोजक ॲड. प्रज्ञा गिरधारी यांनी दिली.

 

रविवार, दि. २१ एप्रिल २०२४ रोजी सकाळी ९ वाजेपासून भक्ती गणेश मंदिर सभागृह ( काळा गणपती), जळगाव रोड, एन-१ सिडको, छत्रपती संभाजीनगर ( जुने नाव औरंगाबाद) येथे श्री समर्थ ब्राह्मण वधू वर सूचक केंद्रातर्फे हा ब्राह्मण वधू वर परिचय मेळावा आयोजित करण्यात आला आहे.

 

या मेळाव्याला विविध ठिकाणांहून चांगला प्रतिसाद मिळत आहे. मेळाव्याचे शुल्क रु. ६००/- असून, त्यात वधू/वर व त्यांच्यासमवेत अजून एक पालक असे दोघांना सभागृहात प्रवेश दिला जाईल. त्यात त्यांना पुरी भाजीचे जेवण आणि दोन वेळा चहा दिला जाईल. एक पेक्षा अधिक पालक असेल तर वेगळे रु. १००/- द्यावे लागतील.

 

आजकाल कुठल्याही समाजाच्या वधू वर मेळाव्यास मुलांपेक्षा मुलींची संख्या कमी असल्याचे चित्र बघायला मिळते. त्यामुळे या मेळाव्याला मुलींची संख्या मुलांच्या संख्येला पूरक असावी याचा विचार करून मुलींसाठी शुल्कात ५० टक्के सवलत देण्याचा निर्णय हा एक सकारात्मक पाऊल म्हणावे लागेल.

 

प्रवेश व अधिक माहितीसाठी खालील मोबाईल नंबरवर संपर्क साधावा :

 

*ॲड. प्रज्ञा गिरधारी*

संचालिका

श्री समर्थ ब्राह्मण वधू वर सूचक केंद्र.

 

*मो. 78757 88529*

*गुगल पे : 8482983055*

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments