Tuesday, October 13, 2026
Google search engine
HomeUncategorizedपुढील २५ वर्षात आरोग्यदायी अन्नाचे सर्वात मोठे आव्हान* पद्मश्री पोपटराव पवार...

पुढील २५ वर्षात आरोग्यदायी अन्नाचे सर्वात मोठे आव्हान* पद्मश्री पोपटराव पवार ; श्री महालक्ष्मी मंदिर सारसबाग तर्फे अन्नदाता शक्ती : महिला शेतकरी व कृषी उद्योजिकांचा सन्मान

 

 

पुणे : प्लास्टिक नावाचा मोठा राक्षस आपण आणला आहे. जमिनीखाली पाणी जायचे बंद केले आणि जमिनीवर पाणी आणून ठेवले, ही उद्याच्या भविष्यकाळात सर्वात मोठी धोक्याची घंटा आहे. त्यामुळे पुढील २५ वर्षात आरोग्यदायी अन्नाचे सर्वात मोठे आव्हान आपल्यासमोर आहे, असे मत पद्मश्री पोपटराव पवार यांनी व्यक्त केले.

 

श्री महालक्ष्मी मंदिर, सारसबाग तर्फे सार्वजनिक नवरात्रोत्सवात मंदिरामध्ये ‘अन्नदाता शक्ती : महाराष्ट्राच्या विविध भागातील महिला शेतकरी व कृषी उद्योजिकांचा सन्मान’ करण्यात आला. यावेळी ट्रस्ट च्या विश्वस्त व उत्सव प्रमुख डॉ.तृप्ती अग्रवाल, भरत अग्रवाल, प्रविण चोरबेले, ऍड. प्रताप परदेशी यांसह विश्वस्त व पदाधिकारी उपस्थित होते.

 

महाराष्ट्राच्या विविध भागातील कृषी उद्योजिका सुनिताराजे पवार, पूजा बोडके, प्रिया जाधव, वैशाली भरणे, शेतकरी पूनम गावडे, अश्विनी ताजणे, सुरेखा माने, सुरेखा बनकर, वैशाली पवार, उद्योजिका डॉ.कृष्णा सोनी, हर्षदा टेमगिरे, श्रावणी बोडके यांचा सन्मान करण्यात आला. महावस्त्र, सन्मानचिन्ह देऊन महिलांना गौरविण्यात आले. तसेच त्यांच्या हस्ते देवीची आरती देखील झाली.

 

पोपटराव पवार म्हणाले, मातृत्व शक्ती आणि आपली भूमाता याकरिता आपण म्हणतो ‘इडा पिडा टळो व बळीचे राज्य येवो’, कारण बळी हाच सर्वांचा पोशिंदा आहे. पोशिंदा हाच या सृष्टीमध्ये सर्वश्रेष्ठ असतो. आदिमानवापासून आपण स्थलांतरित शेती आपण करत होतो. कालांतराने माणसाने संरक्षित पाण्याचा शोध लावला आणि सुरुवातीला नदीपात्रात वाळू मध्ये शेती सुरु झाली. त्यानंतर पाणी शोधून शेतात काम सुरु झाले. ही प्रगती होत गेली असली तरी देखील आपल्यासमोर आज अनेक आव्हाने आहेत, असेही त्यांनी सांगितले.

 

भरत अग्रवाल म्हणाले, शेती ही केवळ उपजीविकेचे साधन नाही. तर, ती आपली संस्कृती, परंपरा असून अर्थव्यवस्थेचा भक्कम आधार आहे. शेतीव्यवस्थेत महिलांचे मोठे योगदान आहे. ऊन, पाऊस सगळ्या संकटांवर मात करीत शेतकरी कार्यरत राहतात. त्यामुळेच या शेतकरी महिला व कृषी उद्योजिकांचा गौरव करणे अभिमानास्पद आहे. महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त परिस्थितीत महालक्ष्मी मंदिरातर्फे आम्ही निवडक १० गावांमध्ये पाण्याचे नियोजन आम्ही करीत आहोत, असेही त्यांनी सांगितले.

 

* फोटो ओळ : श्री महालक्ष्मी मंदिर, सारसबाग तर्फे सार्वजनिक नवरात्रोत्सवात मंदिरामध्ये ‘अन्

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments