मुंबई, भारत : 13 ऑक्टोबर 2026: भारत सरकारच्या इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या (एमईआयटीवाय ) पुढाकारातून कार्यरत असलेल्या एमईआयटीवाय स्टार्टअप हब (एमएसएच) आणि आयबीएम यांनी भारतातील डीप-टेक स्टार्टअप इकोसिस्टमला गती देण्यासाठी सामंजस्य करारावर (एमओयु) स्वाक्षरी केली आहे. या सहकार्याच्या माध्यमातून स्टार्टअप्सना आयबीएमचे तंत्रज्ञानविषयक कौशल्य, मार्गदर्शन , मोठ्या उद्योगांशी संपर्क व व्यवसायाच्या संधी, कौशल्य विकास कार्यक्रम तसेच स्टार्टअप इकोसिस्टमच्या विकासासाठीच्या विविध उपक्रमांचा लाभ मिळणार आहे.
या सहकार्यामुळे एमईआयटीवाय स्टार्टअप हबचे देशव्यापी नवोपक्रम नेटवर्क आणि आयबीएमचे एंटरप्राइझ एआय, हायब्रिड क्लाउड आणि क्वांटम कॉम्प्युटिंगमधील तज्ज्ञ ज्ञान एकत्र येणार आहे. यामुळे उच्च क्षमता असलेल्या स्टार्टअप्सना भारतासह जागतिक बाजारपेठेसाठी तंत्रज्ञान विकसित करणे, त्याची चाचणी व पडताळणी करणे आणि त्याचा विस्तार करणे शक्य होईल. हे सहकार्य भारतातील आयबीएम वेंचर्स ’ सुरू असलेल्या उपक्रमांना पूरक ठरणार असून, एंटरप्राइझ तंत्रज्ञान क्षेत्रातील स्टार्टअप्सना ग्राहक, गुंतवणूकदार आणि उद्योग क्षेत्रातील तज्ज्ञांशी संपर्क साधण्यासाठी अधिक संधी उपलब्ध करून देईल.
डॉ. पन्नीरसेल्वम मदनगोपाल, सीईओ, एमएसएच म्हणाले, “भारताची स्टार्टअप परिसंस्था तंत्रज्ञानातील नवोपक्रमासाठी जागतिक स्तरावरील प्रमुख शक्ती म्हणून उदयास येत आहे. आयबीएम सोबतच्या या सहकार्याच्या माध्यमातून देशांतर्गत डीप-टेक क्षमता मजबूत करणे, तंत्रज्ञानाच्या माध्यमातून उद्योजकतेला प्रोत्साहन देणे आणि नवोपक्रम करणाऱ्यांना भारताच्या विकसित भारताच्या दिशेने योगदान देणारी उपाययोजना विकसित करण्यासाठी अधिक संधी उपलब्ध करून देणे, हे आमचे उद्दिष्ट आहे.”
या सहकार्याच्या अंतर्गत, स्टार्टअप्सना व्यवसायातील विविध गरजा आणि समस्या सोडवण्यासाठी आयबीएमच्या एंटरप्राइझ तंत्रज्ञान आणि नवोपक्रम प्लॅटफॉर्मच्या पोर्टफोलिओचा वापर करता येणार आहे. यामध्ये पुढील तंत्रज्ञानांचा समावेश आहे: आयबीएम वॉटसनएक्स एंटरप्राइझसाठी तयार करण्यात आलेले एआय आणि डेटा प्लॅटफॉर्म.आयबीएम बॉब एंटरप्राइझसाठी तयार केलेला एआय कोडिंग एजंट. आयबीएम सॉवरेन कोर – डिजिटल सार्वभौमत्वासाठी तयार केलेला एआय-सक्षम सॉफ्टवेअर स्टॅक.आयबीएम हायब्रिड क्लाउड आणि क्वांटम कॉम्प्युटिंग याबाबत तांत्रिक मार्गदर्शन. तसेच सायबर सुरक्षा आणि ऑटोमेशन सोल्यूशन्सबाबत तांत्रिक मार्गदर्शन आणि आवश्यक सहाय्य. या माध्यमातून स्टार्टअप्सना त्यांच्या व्यवसायाशी संबंधित तांत्रिक गरजा समजून घेण्यासाठी, योग्य तंत्रज्ञानाची निवड करण्यासाठी आणि त्यांच्या उपाययोजना विकसित करण्यासाठी आवश्यक तांत्रिक मार्गदर्शन व सहाय्य मिळणार आहे.
या सामंजस्य कराराअंतर्गत (एमओयु),आयबीएम आणि एमईआयटीवाय स्टार्टअप हब (एमएसएच) स्टार्टअप्सच्या विकासाच्या विविध टप्प्यांना आणि बँकिंग, वित्त, सरकारी क्षेत्र, औद्योगिक क्षेत्र यांसह विविध क्षेत्रांतील स्टार्टअप्सना मदत करणारे उपक्रम संयुक्तपणे राबविण्याच्या शक्यता तपासणार आहेत. या सहकार्याचा मुख्य भर पुढील बाबींवर असेल: एंटरप्राइझ प्रूफ ऑफ कॉन्सेप्ट (पीओसी) विकसित करण्यासाठी मदत , सॉव्हरिन एआय क्षेत्रातील नवोपक्रमाला प्रोत्साहन ,ओपन-सोर्स इकोसिस्टमचा विकास ,स्टार्टअप संस्थापकांना मार्गदर्शन (मेंटॉरशिप) ,तांत्रिक कौशल्य विकास ,स्टार्टअप्सना मोठ्या कंपन्या आणि गुंतवणूकदारांसमोर आपली तंत्रज्ञानाधारित उत्पादने व उपाययोजना सादर करण्याच्या संधी याशिवाय, टियर-2 आणि टियर-3 शहरांमधील गुणवंत आणि आशादायी नवोपक्रम करणाऱ्यांचा शोध घेऊन त्यांना प्रोत्साहन देण्याला विशेष प्राधान्य दिले जाणार आहे. यामुळे भारतातील वाढत्या डीप-टेक परिसंस्थेतील संधी अधिकाधिक स्टार्टअप्स आणि नवोपक्रम करणाऱ्यांपर्यंत पोहोचविण्यास मदत होईल.
संदीप पटेल, मॅनॅगिंग डायरेक्टर, आयबीएम इंडिया आणि दक्षिण आशिया म्हणाले, “हे सहकार्य नवोपक्रमाला प्रोत्साहन देण्यासाठी आणि आपल्या देशातील डीप-टेक स्टार्टअप परिसंस्था मजबूत करण्यासाठी आमच्या सामायिक बांधिलकीचे प्रतिबिंब आहे. हे स्टार्टअप्स भारतासह जगाच्या तंत्रज्ञानाधारित विकासाचे भविष्य घडवण्यात महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. एमईआयटीवाय स्टार्टअप हबसोबत, आम्ही स्टार्टअप संस्थापकांना अधिक वेगाने नवोपक्रम करण्यास, जबाबदारीने आपल्या व्यवसायाचा विस्तार करण्यास आणि भारतासह जगासमोरील आव्हानांवर उपाय देणारी तंत्रज्ञानाधारित सोल्यूशन्स विकसित करण्यास मदत करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. यामुळे आशादायक नवोपक्रमांचे प्रत्यक्ष आणि प्रभावी परिणामांमध्ये रूपांतर करण्यास मदत होईल.”
या सामंजस्य करारामुळे भारतातील स्टार्टअप्स, उद्योजकता आणि नवोपक्रमाला पाठिंबा देण्यासाठी आयबीएम करत असलेल्या सातत्यपूर्ण प्रयत्नांना आणखी बळ मिळणार आहे. गेल्या अनेक वर्षांपासून आयबीएम ने स्टार्टअप संस्थापक, डेव्हलपर्स, शैक्षणिक संस्था आणि इकोसिस्टममधील भागीदारांसोबत जवळून काम केले आहे. स्टार्टअप्सना अत्याधुनिक तंत्रज्ञान, तांत्रिक मार्गदर्शन आणि कौशल्य विकासाच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी आयबीएम सातत्याने प्रयत्नशील आहे. यामध्ये आयबीएम वेंचर्स मार्फत सुरू असलेल्या उपक्रमांचाही समावेश आहे. आयबीएम वेंचर्स आपल्या कॅपिटल-प्लस मॉडेलद्वारे एंटरप्राइझ तंत्रज्ञानाची पुढील पिढी विकसित करणाऱ्या दूरदृष्टी असलेल्या संस्थापकांना पाठबळ देते. आयबीएम चे जागतिक नेटवर्क आणि तज्ज्ञांचा व्यापक समूह यांच्या माध्यमातून स्टार्टअप्सना आपल्या व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी आणि मोठ्या प्रमाणावर विकसित होण्यासाठी आवश्यक मदत केली
जाते.


