Friday, October 16, 2026
Google search engine
HomeUncategorized*फार्मर आयडीच्या आधारे स्वतंत्र शेतकरी ओळखपत्र तयार करण्यास मनाई* ...

*फार्मर आयडीच्या आधारे स्वतंत्र शेतकरी ओळखपत्र तयार करण्यास मनाई* *अनधिकृत ओळखपत्रांची निर्मिती व वितरण थांबविण्याचे कृषी विभागाचे आवाहन*

 

 

 

 

पुणे, दि. १६ (जिमाका, वृत्तसेवा) : अॅग्रीस्टॅक योजनेंतर्गत प्राप्त फार्मर आयडीच्या आधारे स्वतंत्र शेतकरी ओळखपत्र तयार करणे व त्याचे वितरण करणे अनधिकृत असल्याचे केंद्र शासनाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे राज्यातील सर्व कॉमन सर्व्हिस सेंटर (CSC) चालकांनी अशा प्रकारची कार्यवाही तात्काळ थांबवावी, असे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात आले आहे.

 

 

 

काही जिल्ह्यांमध्ये फार्मर आयडीच्या आधारे स्वतंत्र ओळखपत्रे तयार करून वितरित केली जात असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. शेतकऱ्यांनीही अशा अनधिकृत सेवांचा लाभ घेऊ नये व तयार करण्यात आलेल्या ओळखपत्रांना अधिकृत मान्यता असल्याचे समजू नये. केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांचे सर्व संबंधितांनी काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.

 

00000

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments