Friday, October 16, 2026
Google search engine
HomeUncategorizedकोका-कोला इंडिया नवरात्री उत्सवात ग्राहकांना रिफ्रेशिंग पेयांचा आस्वाद देत उत्साहवर्धक उत्सवी अनुभव...

कोका-कोला इंडिया नवरात्री उत्सवात ग्राहकांना रिफ्रेशिंग पेयांचा आस्वाद देत उत्साहवर्धक उत्सवी अनुभव देणार

 

 

गुजरात, ऑक्टोबर १६, २०२६: नवरात्री उत्सवामध्ये संगीत, नृत्य आणि पारंपरिक रूढी-परंपरांच्या माध्यमातून सर्वजण एकत्र येऊन जल्लोषात उत्सव साजरा करतात, तसेच शहरे आणि गल्लीबोळांतील लोक एकत्र येऊन गरबा खेळण्याचा आनंद घेतात. या नवरात्रीत कोका-कोला इंडिया आपल्या विविध प्रकारच्या पेयांचा पोर्टफोलिओ मंडळे, गरबा मैदाने, स्थानिक बाजारपेठा आणि लोकप्रिय सार्वजनिक ठिकाणांवरील उत्सवी अनुभवांच्या माध्यमातून संपूर्ण गुजरातमधील ग्राहकांपर्यंत घेऊन येत आहे.

 

जगातील सर्वात मोठा गरबा महोत्सव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या युनायटेड गरबा महोत्सव आणि लक्ष्मी विलास पॅलेस (एलव्हीपी) हेरिटेज गरबा यांसारख्या प्रमुख उत्सवी ठिकाणी कोका-कोलाची उपस्थिती या उपक्रमाचे मुख्य आकर्षण असेल.

 

या उत्सवाचा उत्साह आणखी वाढवण्यासाठी कोका-कोला इंडियाने अहमदाबादमधील सर्वात लोकप्रिय गरबा मंडळ आदित्य गढवी यांच्या रंगमोरलासोबत बेव्हरेज पार्टनर म्हणून सहयोग केला आहे. कोक स्टुडिओच्या ‘खलासी’ या तुफान गाजलेल्या गाण्यासाठी ओळखले जाणारे आदित्य गढवी या उत्सवाच्या काळात संगीताचा आगळावेगळा रंग भरत आहेत. या मंडळामध्ये विविध पेयांचे स्टॉल्स, माझा मिक्सॉलॉजी स्टेशन आणि एक खास माझा सेल्फी झोन उभारण्यात येणार आहे, ज्याद्वारे संगीत, रिफ्रेशमेंट आणि उत्सवाचे अविस्मरणीय क्षण एकत्र अनुभवता येतील.

 

कोका-कोला गरब्याचा उत्साह शिगेला पोहोचत असताना ग्राहकांना सहजपणे थंड पेये उपलब्ध व्हावीत यासाठी प्रमुख उत्सवी ठिकाणी आपला कोक ऑन व्हील्स अनुभव घेऊन येणार आहे. तसेच, खास तयार करण्यात आलेले सेल्फी पॉईंट्स मित्र व कुटुंबांना त्यांचे उत्सवातील लूक आणि अविस्मरणीय क्षण कॅमेऱ्यात कॅप्चर करण्याची संधी देतील, ज्यामुळे नवरात्रीच्या अनुभवात अधिक उत्साहाची भर होईल.

 

माझा उत्सवाच्या प्रमुख ठिकाणी आपल्या खास उपस्थितीद्वारे ग्राहकांचे मनःपूर्वक आणि उत्साही स्वागत करेल. आदरातिथ्याची ही परंपरा पुढे नेत ब्रँड आपला ‘मिक्सॉलॉजी अॅक्ट’ सादर करणार आहे, ज्यामध्ये ग्राहकांना आस्वाद आणि आनंद घेण्यासाठी माझाने बनवलेले खास मॉकटेल पर्याय उपलब्ध असतील. हा अनुभव उत्सवात नवा आणि ताजेतवाना ट्विस्टची भर करेल, ज्यामुळे गरब्याच्या जल्लोषात ग्राहकांना क्षणभर थांबून काहीतरी नवीन आस्वाद घेण्याची उत्तम संधी मिळेल.

 

स्प्राइट नवरात्री उत्सवात आपला स्प्राइट X स्पायसी अनुभव घेऊन येत आहे, सणासुदीच्या काळात बाहेर खाण्यापिण्याचा आनंद घेताना झणझणीत पदार्थांना मिळणाऱ्या पसंतीचा उत्सव असेल. मैदानावर राबवल्या जाणाऱ्या आकर्षक उपक्रमांच्या माध्यमातून ब्रँड स्थानिक खाद्यपदार्थांच्या ठिकाणांमधील उत्साह अधिक वाढवेल. याद्वारे उत्सवाचा आनंद लुटणाऱ्या ग्राहकांसाठी खमंग, तिखट आवडत्या पदार्थांचा आस्वाद आणि ताजेतवाने क्षण एकत्र आणले जातील.

 

थम्स अप खाण्यापिण्याच्या आऊटलेट्सवर आपला थम्स अप X स्नॅकिंग उपक्रम सादर करेल, जो खमंग चव, आवडते स्नॅक्स आणि रिफ्रेशिंग पेयांच्या अनोख्या संयोजनावर आधारित आहे. तसेच, ब्रँड संवादात्मक खेळ आणि बक्षिसे जिंकण्याच्या संधींसह विविध ऑन-ग्राउंड उपक्रमांद्वारे ग्राहकांशी संलग्न होईल, ज्यामुळे उत्सवाच्या आनंदात अधिक भर पडेल.

 

मिनिट मेड पल्पी ऑरेंज या सणासुदीच्या काळात विशेष ऑन-ग्राउंड उपक्रमांद्वारे ग्राहकांशी थेट संवाद साधेल, ज्यामुळे लोकप्रिय सार्वजनिक ठिकाणी व्यक्तींना हे रिफ्रेशिंग फळांचे पेय सहज उपलब्ध होईल. हा उपक्रम ग्राहकांना उत्सवाच्या धावपळीत रिफ्रेशिंग ब्रेक घेण्याची उत्तम संधी देईल.

 

किन्ले प्रमुख उत्सवी ठिकाणी स्टॉल्स उभारून हायड्रेशनचे सुलभ पर्याय उपलब्ध करून देईल, ज्यामुळे ग्राहकांना सतत ताजेतवाने राहण्यास मदत होईल.

 

या उपक्रमाबाबत मत व्यक्त करत कोका-कोला इंडिया आणि साऊथवेस्ट एशियाचे इंटिग्रेटेड ऑपरेशन्सचे व्हाइस प्रेसिडंट संदीप बाजोरिया म्हणाले, “सणासुदीचा काळ पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या परंपरांच्या माध्यमातून कुटुंबे आणि समाजाला एकत्र आणतो. उत्सवाचे हे क्षण आमच्यासाठी ग्राहकांशी थेट जोडले जाण्याचे महत्त्वाचे माध्यम ठरतात, ज्यामुळे सणाचा आनंद लुटताना ते हायड्रेटेड आणि ताजेतवाने राहतील याची खात्री घेता येते. कोका-कोला इंडियामध्ये स्थानिक आवडीनिवडींचा अभ्यास आणि आमच्या प्रबळ वितरण, रिटेल तसेच बॉटलिंग परिसंस्थेच्या पोहोचसह आमच्या वैविध्यपूर्ण पेयांचा पोर्टफोलिओ एकत्र आणून हे नाते अधिक घट्ट करण्यावर आमचा भर आहे.”

 

कोका-कोला इंडियाचे गरबा रात्रींचा उत्साह आणि उत्सवी मेळाव्यांमधील आनंदापासून मित्र आणि कुटुंबासह रिफ्रेशिंग पेय पिण्याच्या साध्या क्षणांपर्यंत सणाला अधिक उत्साहत करणाऱ्या अनेक क्षणांचा भाग बनणे हेच नवरात्री उपक्रमांमागील उद्दिष्ट आहे. आपली पेये आणि अनुभव ग्राहकांच्या अधिक जवळ आणून कंपनी या सणासुदीच्या काळातील रंग, जवळीक आणि उत्सवी उत्साहात आणखी भर घालण्या

चा प्रयत्न करत आहे.

 

 

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments