आमच्या क्रिएटिव्ह फाउंडेशन ची परंपरा ही सातत्याने विविध संस्था, संघटना, मंदिर या ठिकाणी उपयुक्त साहित्याची मदत करण्याची आहे असे क्रिएटिव्ह फाउंडेशन चे अध्यक्ष संदीप खर्डेकर म्हणाले.
विशेषतः उत्सवाच्या काळात रोख वर्गणी पेक्षा उपयुक्त साहित्य दिल्याने त्याचा दीर्घकाळ उपयोग होतो त्यामुळे या पुढील काळात निधी चा व्यय हा जास्त करून दिव्यांग, ज्येष्ठ नागरिक,गरजू रुग्णांना रुग्णोपयोगी साहित्य,विशेष मुलं यांच्या साठी करण्याचा आमचा निर्धार आहे असे ही खर्डेकर म्हणाले.
नवरात्री च्या निमित्ताने अनेक ठिकाणी लोकोपयोगी साहित्य वाटप करण्यात आले. मात्र प्रामुख्याने वस्ती विभागातील अंगणवाडी सेविकांना ना. चंद्रकांतदादा पाटील वा नगरसेविका मंजुश्री खर्डेकर यांच्या हस्ते स्पीकर सेट भेट देण्यात आला.यावेळी अंगणवाडी सेविका संगीता वांद्रे, अरुणा तोंडे, सुनीता मुटकुळे, नम्रता दहिभाते,भाजपा महिला आघाडी अध्यक्ष मनीषाताई लडकत, कोथरूड महिला आघाडी अध्यक्ष अमृता देवगावकर उपस्थित होत्या.
नळस्टॉप येथील सेंट क्रिस्पीन होम च्या मुलींना नगरसेविका मंजुश्री खर्डेकर यांच्या हस्ते पेंटिंग किट देण्यात आले. यावेळी माधवी सॅम्युल, फाउंडेशन चे विश्वस्त प्रतीक खर्डेकर उपस्थित होते. असे आवडीचे गिफ्ट मिळाल्यामुळे मुलांच्या चेहऱ्यावर अवर्णनीय आनंद दिसून आल्याचे मंजुश्री खर्डेकर म्हणाल्या.
तसेच शीतळादेवी मंदिराला खुर्च्या भेट देण्यात आल्या. यावेळी अध्यक्ष कुणाल तोंडे,सागर तांगडे, उमेश धाडवे,शुभम वीर, गणेश गवारे, अनिकेत मचले उपस्थित होते.सर्वत्र साहित्य रूपाने मदत हीच आमची ओळख असल्याचे नगरसेविका मंजुश्री खर्डेकर यांनी स्पष्ट केले.


