Monday, October 19, 2026
Google search engine
HomeUncategorizedश्री महालक्ष्मी मंदिरातर्फे 'नारी तू नारायणी' सन्मान सोहळा* सुमेधा चिथडे, डायना...

श्री महालक्ष्मी मंदिरातर्फे ‘नारी तू नारायणी’ सन्मान सोहळा* सुमेधा चिथडे, डायना पंडोल, सत्यभामा देशमाने यांचा यथोचित सन्मान

 

 

पुणे : प्रत्येक स्त्री मध्ये श्री महाकाली, श्री महालक्ष्मी आणि श्री महासरस्वती या आदिशक्तीच्या त्रिदेवी स्वरूपाचा वास असतो. त्यामुळे समाजाच्या विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा ‘नारी तू नारायणी’ सन्मान देऊन गौरव करण्यात आला. आंतरराष्ट्रीय फेरारी महिला रेसर डायना पंडोल, ऑक्सिजन वुमन सुमेधा चिथडे, सामाजिक कार्यकर्त्या सत्यभामा बाबासाहेब देशमाने यांना श्री महालक्ष्मी मंदिरात सन्मानित करण्यात आले.

 

श्री महालक्ष्मी मंदिर, सारसबागच्या वतीने मंदिरात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी महापौर मंजुषा नागपुरे, ट्रस्टच्या विश्वस्त व उत्सव प्रमुख डॉ. तृप्ती अग्रवाल, विश्वस्त भरत अग्रवाल, अ‍ॅड. प्रताप परदेशी, प्रविण चोरबेले आदि मान्यवर उपस्थित होते. महावस्त्र, सन्मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप होते. कार्यक्रमानंतर मान्यवरांच्या हस्ते देवीची आरती करण्यात आली.

 

मंजुषा नागपुरे म्हणाल्या, अनेक स्त्रिया विविध प्रकारचे समाजोपयोगी कार्य करीत असतात. त्यांचे कार्य समाजासमोर आणून त्यांचा सन्मान करणे हा वेगळा उपक्रम आहे. यामुळे बाकीच्यांना यातून प्रेरणा मिळते. संघटन आणि शक्ती यातून राष्ट्रहितासाठी कार्य व्हायला हवे, असेही त्यांनी सांगितले.

 

सुमेधा चिथडे म्हणाल्या, राष्ट्रभक्ती, सेवा आणि प्रेम भावनेने देशासाठी कार्य करायला हवे. आपण नेहमी उत्सवांच्या आनंदात असतो. मात्र, त्यावेळी सैनिकांची आठवण देखील ठेवायला हवी. आपण किती पैसे कमावतो, यापेक्षा सैनिकांसाठी किती देतो, हे महत्वाचे आहे. समाजातील सगळ्या गरजू घटकांसाठी काम होते. मात्र, ज्या सैनिकांमुळे आपण आहोत, त्यांचा सन्मान ठेवण्याकरिता आपण पुढाकार घ्यायला हवा. आत्मकेंद्रित न होता, राष्ट्र केंद्रित होण्याकडे वाटचाल करायला हवी, असेही त्या म्हणाल्या. सत्यभामा बाबाराव देशमाने यांनी देखील मनोगत व्यक्ती करीत आपला खडतर प्रवास सांगितला.

 

सुमेधा चिथडे या ‘‘सोल्जर्स इंडिपेंडंट रिहॅबिलिटेशन फाऊंडेशन’’ च्या संस्थापक असून त्या ‘‘ऑक्सिजन वुमन’’ म्हणून ओळखलया जातात. भारतीय महिला कार रेसिंग ड्रायव्हर असलेल्या डायना पंडोल यांनी भारतीय मोटार स्पोर्टसच्या इतिहासात अनेक मोठे विक्रम रचले आहेत. तर, परभणीमधील सत्यभामा बाबाराव देशमाने या १०० मुलांची आजी आहे. स्नेहवन या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी मुलांना आपल्या लेकराप्रमाणे सांभाळले आहे. अशा या तीन वेगवेगळ्या क्षेत्रातील महिलांना ‘‘नारी तू नारायणी ’’ पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन युवराज लाहोटी यांनी केले.

 

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments